शनिवार, २० मार्च, २०१०

सॉरी

सॉरी

सॉरीचा अर्थ पाहिला तर

"सॉरी"ला वाईट वाटत असते

त्याची आगतिकता त्यातून

पूर्णपणे दिसतच असते १माफी किती सोपी असते

सॉरी म्हणून काम भागते

हल्लीच्या या आधुनिकतेत

सॉरीने सर्व जमून जाते २म्हणणारा पटकन म्हणून जातो

ऐकणारा संभ्रमात पडलेला असतो

"सॉरी"चा कधीच तोटा नसतो

झेलणारा मात्र आगतिक होतो ३"सॉरी"ने सॉरी म्हटल्या म्हटल्या

ऐकणाराच खरं तर सॉरी झाला

सॉरी म्हणणारा मात्र काठावरून

ऐकणार्‍याच्या गटांगळ्या पहात राहिला ४स्कूटरवाल्याने धक्का दिला

तो, सॉरी म्हणत निघून गेला

धक्का खाणारा हताश होऊन

कुठे लागलय ते शोधत राहिला ५सौ. कोमात गेलेली होती

काळ थांबून राहिला होता

पांढरा कोटवाला शांतपणे

पडद्याकडे बघत राहिला होता ६अखेर सौ.ची लढाई संपली

पांढरा कोट सॉरी म्हणाला

हे ऐकले आणि, यमदूत मात्र

खदा खदा हसत राहिला ७मनात हसत म्हणत राहिला

सॉरी म्हणणारा हुशार आहे

आणि ते ऐकणारा खरोखर

किती किती बिनडोक आहे ८दोघानाही हे माहित आहे कां?

गोष्टी कुणाच्या हातात आहेत?

दोघेही कळसूत्री बाहुल्यांसारखे

नियतीच्या तालावर नाचत आहेत? ९सॉरी म्हणणार्‍याला नेहमी

खरच सॉरी वाटते का?

ज्याला सॉरी वाटत असते

तो सॉरी सॉरी म्हणत राहतो का? १०

..........श्रीराम पेंडसे

1 टिप्पणी: