आजचे जीवन हे वेगवान जीवन आहे. आपण पाहतो कि , माहिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे, त्यांच्याशी निगडित उद्योग वाढू लागले आहेत. या उद्योगांचा एक पैलू पाहिलात तर असे लक्षात येईल की सकाळी जाण्याची वेळ ठरलेली असते, पण संध्याकाळची परत येण्याची वेळ निश्चित नाही. तुम्ही जितके जास्त वेळ काम कराल, जितका जास्त वेळ कंपनीत थांबाल, तेव्हधे तुम्ही अधिक निष्ठावंत, अधिक यशस्वी, अधिक कार्यक्षम असे सध्याचे गणित झाले आहे. य गणितीसूत्रात बसणार्यांवर मग पैशांचा, वेतनाचा वर्षाव होत असतो. आणि या वर्षावाकडे पाहून कामाचे तास किती याकडे काणाडोळा करण्याची वृत्ती निर्माण होते. व परीणाम म्हणजे शरीराकडे दुर्लक्ष! विश्रांतीचा आभाव आणि काम व पैसा याच्या शर्यतीत 'टॉप'ला येण्याची धडपड यात मनःस्वास्थ्य हरवत चालले आहे.
या धडपडीच्या, धकाधकीच्या जीवनात, विश्रांतीचा आभाव याचबरोबर आहार व व्यायामाकडे दुर्लक्ष हे अनेक रोगांचे मूलभूत कारण बनले आहे. साधी एक गोष्ट विचारात घ्यायची झाली तर सुमारे ४० वर्षांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात फरक आहे. कारणे काहीही असोत, पण आज कामामुळे मानसिक ताण वाधला आहे व त्यातून उच्च रक्तदाब, ह्रदयविकार मधुमेह असे विकार वाढण्याची प्रवृत्ती वाढली आहे.
आयुर्वेदांत ॠतुचर्या, दिनचर्या निरोगी जीवनासाठी सांगितली आहे. जरी क्षणभर गृहित धरलं की हजारो वर्षापूर्वीचे निकष आज लागू पडणार नाहीत. तरीही त्यातील निम्मा भाग हा त्यात कालानुरूप थोडाफार फरक करून आपल्या स्वास्थ्यासाठी वापरता येइल. आयुर्वेदात सांगितलेले आहार विहार आपण कालबाह्या समजून त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. दमनूक करणारे खेळ व दिशाहीन व्यायामप्रकार आज आपण महत्त्वाचे मानतो. प्राणायाम व योगासने या सारख्या शारीरीक आणि मानसिक विश्रांती देणार्या व्यामप्रकारांना तुच्छ लेखतो. "फास्ट फूड"लामहत्व येत चालले आहे. आणि याचे प्रमुख कारण कुतुंबातील प्रमुख व्यक्तींना उपलब्ध असणारा वेळ. आज दोघेही "मिया-बिबी" नोकरी करण्याच्या जमान्यात वरील गोष्टींना वेळच मिळत नाही. मग अजार, ताण तणाव, त्रास यांची मालिका सुरू होते. या दुष्टचक्रातून बाहेर पडले पाहीजे याची जाणिव मनाच्या कोपर्यात कोठेतरी होते. पन पैसा आणि काम याच्या दलदलीत पाय घट्ट रूतून बसलेला असतो. तो काही बाहेर निघता निघत नाही. आपण यात हळू हळू अडकत जातो. आणि या दुष्टचक्रातून बाहेर पडतो तेंव्हा चरकातून बाहेर पडणार्या उसासारखी आपली अवस्था होते.
जर चक्रातून बाहेर पडणारा उंस व्हायचे नसेल तर थोड्याश्या प्रयत्नाने काळ काम वेग यांच्या शर्यतीत राहून हे साध्य करता येऊ शकेल. त्यासाठी थोडा वेळ आणि प्रचंड मनोनिग्रहाची गरज आहे. यागोष्टी आपल्या दिनचर्येचा भाग झाल्या पाहिजेत. आपण रोज अंघोळ करतो हा एक आपल्या दिनचर्येचा भाग झाला. असं होत नाही की " आज अंघोळ केली आहे. आता चार दिवस नाही केली तरी चालेल." किंवा असेही होत नाही की, " काय बुवा, कामाच्या व्यापात आठवडाभर अंघोळीला वेळच झाला नाही." अंघोळ हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे.
हा शारीरीक ताण तणाव कमी होउन आप्लले "फास्ट" जीवन सुखी, सुसह्य आणि आनंदी करण्याचा हेतु या लेखमालेत आहे. रोजचा आहार-विहार, सर्वसामान्यांना सहज जमतील अशी पथ्ये, व्यायामप्रकार आणि योगासने यांच्या वापराने आपले दैनंदिन जीवन कसे सुखकर करता येईल हे सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न.
ही लेखमाला म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे. फक्ता एक दिशादर्शक असा त्याचा तारतम्याने वापर करायचा आहे. व्यक्ति तितक्या प्रकृती. एखादी गोष्ट मला योग्य आहे, ती दुसर्याला योग्य आहे म्हणजे ती तिसर्याला योग्य असेलच असे नाही. त्याच्या प्रकृतीनुसार त्याला ती योग्य-अयोग्य ठरणार आहे. पण तरीही इथे सांगितलेल्या गोष्टी, आसने, पथ्ये सामान्यपणे सर्वांना उपयुक्त ठरतील, सहज जमतील अशीच घेण्याचा प्रयत्न असेल. यात क्षणभर गृहित धरूया कि एखाद्याला उपयोग होणार नाही. पण अपायही नक्की होणार नाही. " अहो, तुम्ही सांगितले. आम्ही केले. पण उपयोग काय झाला? शून्य." असे होऊ नये यासाठी ही धोक्याची छोटीशी सूचना !!
पुढील भागात मानवी मन, मनाचे महत्त्व, त्याचे दैनंदिन जीवनातले स्थान व त्याच्या स्वास्थ्यासाठीचे प्रयत्न याविषयी थोडीशी चर्चा करू.
ॐ तत्सत
जय श्रीराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा