रविवार, २५ एप्रिल, २०१०

आठवण

आठवण आठवण काय असते?

गतकाळाची फिल्म असते

भल्या बुर्‍या सरल्या प्रसंगांची

तिखट गोड भेळपुरी आसते १



हिंदी चित्रपटांसारखे तिथे

भरपूर चढ उतार असतात

मिश्र भावनांच्या कथेचा मात्र

अंत नेहमीच दु:खद करतात २



आठवण हा एक सोहळा असतो

सुखद क्षणांना उजाळा असतो

काळ्या दु:खद क्षणांचा तो

अपरीहार्य मेळावा असतो ३



रसिका उर्फ सखी माझी

अत्यंत जिवलग मैत्रिण आहे

सख्खी बहीण काय लावेल

असा जीव लावत आहे ४



ही अति जिवलग मैत्रिण

मला नेहमीच म्हणत असते

सुखाचे क्षण आठवत रहा

दु:खाला दूर सारत रहा ५



मित्रा तू माझा जिवलग रे

दु:ख कसे तुझे पाहू रे

तुला बरे वाटले म्हणजे

माझे मन शांत होते रे ६



आठवणींच्या या सोहाळ्यात

मी बर्‍याचदा हरवून जातो

चांगल्या आठवणीत तरंगताना

दु:खाचे शेवाळं बाजूला सारतो ७



ते सहज कधीच जमत नाही

शेवाळ जलपर्णी एकत्र होतात

चांगल्या आठवणीतलं तुमचं

जगणं असह्य करून टाकतात ८



सखी मात्र नेहमी नेहमी

सदा मदतीला हजर असते

जलपर्णी वेढून घेत असता

हात धरून बाहेर काढते ९



सखीला सौ. माहित नाही

तिचे जाणे मात्र माहित आहे

माझे दु:ख तिला जाणवते

हे ही मला ठाऊक आहे १०



सखीची अतिव माया आहे

म्हणून तिला दु:ख जाणवते

माझ्यावर आपल्या मायेची ती

सदा पखरण करत असते ११



आठवणी विचारून येत नाहीत

नको त्या मागे रहात नाहीत

हव्या त्या कधीच येत नाहीत

वेळेची बंधने पाळत नाहीत १२



आठवणी नेहमी येतात त्या

भरतीसारख्या अंगावर येतात

सुखद मुंगीच्या पावलांनी जातात

दु:खद मात्र हत्तीची पावले घेतात १३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा