संस्कृती
खर तर हा विषय लिहीण्यासाठी, चर्चेसाठी घ्यायचा म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाने शिवधनुष्याला हात घालण्या सारखे आहे. म्हणजे या विषयावर लिहीण्याची माझी पात्रता आहे का हे मला माहीत नाही. पण धाडस करतोय. त्याबद्दल क्षमस्व. मला जेव्हढे माहीत आहे ते सांगतो. जिथे माझे चुकत असेल तर नसे नि:संकोच सांगावे.
प्रथम संस्कृती म्हणजे काय ते पाहूया. संस्कृती या शब्दाचा शब्दकोषातला अर्थ असा : "संस्कृती म्हणजे कल्पना, विचारधारा आणि दृष्टीकोन यांची त्या त्या समाजात रूजलेली परंपरा. संस्कृती म्हणजे मानवी ज्ञान, विश्वास आणि वागणूकी, ज्या सामाजिक विचारांवर अवलंबून आहेत त्यांची एकत्रित संरचना. संस्कृती हे एखाद्या विचाराचे समूहाचे, मूल्यांचे एकत्रिकरण आहे जे त्या गटाचे प्रतिनिधित्व करते." वाचूनच दम लागला ना? म्हणून मग मी त्याचा साधा सोपा असा अर्थ लावला की संस्कृती म्हणजे "धर्म". धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे नव्हे. ही वर सांगितलेल्या विचारधारांची मानवाने त्याच्या सोयीसाठी ठेवलेली नावे आहेत. आता धर्म या शब्दाची एक मजेदार व्याख्या पहा. "धर्म म्हणजे A natural physiological behavioural pattern of a specie. जसे शिकार करणे ही वाघाची नैसर्गिक कृती आहे. म्हणून तो त्याचा धर्म आहे. संस्कृती या शब्दाचा संधी हा "सं + कृती" असा करता येइल. इथे "कृती' म्हणजे समाजातले वागणे, बोलणे, राहणीमान, पोषाख यांच्या आचरण्याच्या पद्धती. "सं" याचा मी घेतलेला अर्थ म्हणजे संतुलीत, संस्कारीत असे म्हणता येइल. अगदी साधा सोपा अर्थ घ्यायचा झाला तर संस्कृती म्हणजे संस्कारीत कृती. A balanced or processed Action. आता संस्कार म्हणजे काय ते पहा. संस्कार म्हणजे एखाद्या गोष्टीचे, प्रथेचे एखाद्या व्यक्तीवर, त्याच्या व्यक्तिमत्वावर झालेले परीणाम. ही गोष्ट समजण्यासाठी एक छोटेसे उदाहरण देतो. पोळी करण्यासाठी प्रथम गव्हाच्या पिठात पाणी घालतो व कणिक मळतो. म्हणजे त्यावर पाण्याचे संस्कार झाले. म्हणजेच त्या पिठाचे कण त्या पाण्यामुळे एकत्र आले, एकमेकाना बांधले गेले. नंतर पोळी लाटतो. म्हणजेच त्या मळलेल्या पिठावर वजनाचे, दाबाचे संस्कार झाले. नंतर ती पोळी तव्यावर टाकतो. नुसती तव्यावर टाकून चालणार नाही. त्याखाली उष्णता हवी. त्याशिवाय पोळी तयार होणार नाही. म्हणजे त्यावर उष्णतेचे संस्कार आले. तसे हे आहे. नुसती कणिक, पाणी, आणि शेगडी किंवा गॅस असे शेजारी शेजारी ठेऊन पोळी तयार होईल का? नाही. हे तीनही संस्कार झाल्याखेरीज ती पोळी तयार होणार नाही. ते परिणाम कसे आहेत म्हणजे चांगले की वाईट हा वेगळा मुद्दा आहे. कारण चांगले आणि वाईट या सापेक्ष गोष्टी आहेत. कशापेक्षा चांगले, वाईट हे कोण ठरवणार? म्हणून चांगले की वाईट या वादात न पडता संस्कारीत कृती म्हणजे काय ते समजून घ्यावे.
आता हे संस्कार आले कुठून? कसे आले? तर मानवाच्या या पृथ्वीवरील अस्तित्वापासून याचा उगम आहे. मनुष्य जन्माला आल्यापासून शिकत असतो. तो जे काही शिकतो ते पाहून पाहूनच शिकतो. म्हणजे असे पहा की त्याची आई सतत त्याच्याशी बोलत असते. मग त्याची वाणी विकसीत झाली कि तो आपल्या आईचे शब्द म्हणायला शिकतो. ते मूल जसजसे वाढत जाते, त्याची बुद्धी विकसित होते तसतसे ते मूल आजूबाजूच्या व्यक्ती कश्या बोलतात, ते पाहून त्यांची नक्कल करू लागते. अगदी सहज लक्षात येणारी गोष्ट म्हणजे पूर्व प्राथमिक वर्गातली मुले त्यांच्या बाईंची नक्कल करतात. घरी आल्यावर "शाळा शाळा" खेळतात. नंतर ते मूल मोठे होते. पहिली ते पांचवीपर्यंतच्या काळात त्याच्या ज्ञान मिळवण्याच्या कक्षा वाढत जातात. म्हणजे आता तो फक्त आईकडूनच शिकत नाही तर आता शिक्षक, मित्र, मित्र मैत्रिणींचे पालक या सगळ्यांचे अनुकरण करायला सुरूवात होते. आणि मग पांचवीच्यापुढे दहावीपर्यंतचा काळ हा या सर्वांचे संस्कार मनावर, शरीरावर, व्यक्तिमत्वावर कोरले जाण्याचा, पक्के रूजण्याचा काळ असतो. आणि म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात हा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात झालेले संस्कार पुसले जात नाहीत. बदलू म्हटले तरीही बदलले जात नाहीत. म्हणून हा काळ फार महत्त्वाचा आहे.
माणूस पृथ्वीवर अस्तित्वात आल्यापासून प्रगती करत आहे. निरनिराळ्या गोष्टी शिकत आहे. निरनिराळे शोध सतत लावत आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसागणीक माणूस प्रगतच होत आहे. आधुनिक युगात विज्ञानाच्या सहाय्याने माणसाने आपले आयुष्य सुलभ व कष्टहीन बनवले आहे. एकविसाव्या शतकात कष्टहीनतेच्या नादात सांस्कृतीक बदल होणे अपरिहार्य आहेत. परंपरागत चालत आलेल्या चाली रीती बदलणार नाहीत. बदलेल ते त्यांचे सादरीकरण. पूर्वीच्या काळी देवाची पूजा अर्चा यांचे खूप प्रस्थ असे. आता कालानुरूप त्याचा कालावधी कमी झालाय. पूर्वी गुरूजी पूजा सांगत असत. आता त्यांची जागा स्त्री पुरोहितांनी घेतली आहे. पूजेतल्या क्रियांचा अर्थ माहीत नसे. गुरूजींनी सांगितले की पाणी हातावरून सोडा की आपण ते सोडतो. पण ते का तसे सोडायचे हे माहीत नसते. त्याचा आता अर्थ सांगितला जातो. अनादी काळातल्या धार्मिक उपचारातला त्याकाळी गरजेचा असलेला पण आताच्या युगात अनावष्यक असलेला भाग गाळून त्यात सुटसुटीतपणा आणला गेला आहे. अर्थात त्यामागे वेळ नाही हे कारण प्रमुख आहे. अजूनही वेळ नसण्याच्या आजच्या आधुनिक संगणकाच्या युगातही आपणाला पूजा वगैरे उपचार करावेसे वाटतात हे संस्कारांचे लक्षण आहे. मग त्याच्या पद्धतीत बदल करतो. हल्ली गुरूजी मिळत नाहीत ही खंत आहे. कारण आता पाठांतराचा जमाना राहीला नाही. त्यातून आंग्लाळलेल्या संस्कृतीत संस्कृत भाषा म्हणजे आणखी अवघडच काम. शब्दोच्चाराचीच पंचईत. त्यामुळे पौरोहित्य हा प्रकार दुर्मिळ होत चालला आहे. पण संस्कार मनावर ठसलेले असल्याने पूजादि कार्ये आणि विधी करायचे तर असतात. मग यजमानानेच पोथी वाचून पूजा सांगणे हे आलं. त्यासाठी सुलभ पोथ्या तयार झाल्या. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी या संस्थेने त्या त्या पूजेचे, संस्काराचे सुटसुटीकरण केले. कालानुरूप कालबाह्य झालेले उपचार गाळले. आजच्या काळाला अनुसरून योग्य ते उपचार ठेवले. त्यापुढेही जाऊन त्या त्या पूजेच्या कॅसेट, सी,डी, निघाल्या कि ज्यावरून पूजा सांगितली जाऊ लागली. गुरूजींची गरज संपली. पण परंपरा नाही संपली. संस्कार नाही लोप पावले. त्यांचा प्रभाव कमी नाही झाला. काळाप्रमाणे त्याचे अनुसरण्याचे मार्ग बदलले.
तिच गोष्ट इतर चाली रीतींबद्दल आहे. पोषाखाचे पहा. कसा काळानुरूप पोषाख बदलत गेला. मला आठवतय की मी कॉलेजमधे असताना म्हणजे सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी मुली साड्या नेसून येत असत, मुले मोठ्या बॉटमच्या किंवा बेल बॉटम पँट आणि शर्ट वापरत असत. आता आज साडी अदृश्य झाली आहे. तिचे स्थान आता लग्न समारंभापुरते सीमित राहिले आहे. झब्बा, कुडता , शेरवानी, धोतर, फेटे हे प्रकारसुद्धा लग्न समारंभापुरते मर्यादित राहिले आहेत. हा संस्कृतीतला बदल आहे का? नाही. माझ्या मते हा काळानुरूप झालेला सादरीकरणातला बदल आहे. आपल्या संस्कृतीवरचे हे पाश्चात्य संस्कृतीचे हे आक्रमण आहे हे मात्र नक्की. आपण आंग्लाळलो आहोत. त्याचे हे परीणाम आहेत. पण तरीही काही भागात जिथे या पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडलेला नाही अश्या भागात अजूनही आपली परंपरा पाळली जाते. अगदी साधे एक उदाहरण देतो. मला आठवतय कि माझ्या लहानपणी संध्याकाळी देवापुढे तेलाचा दिवा लावत असत. नंतर परवचा म्हटला जाता असे. म्हणजे, रामरक्षा, मारूती स्तोत्र, "शुभंकरोती...." म्हटले जात असे. पाढे पाठ करून ते यावेळी म्हणायची पद्धत होती. आणि हे सगळे केले नाही तर जेवायला मिळत नसे. आज हे होत नाही. कारण याची ना मुलांना गरज भासते ना त्यांच्या आई वडिलांना. मग मुले साधी साधी बेरजा वजाबाकीची गणिते कॅलक्युलेटरवर सोडवतानाची केविलवाणी दृश्ये बघायला मिळतात. पाहून खेद होतो, कधी कधी राग येतो.
व्यक्तीवरच्या संस्काराचे अजून एक उदाहरण घेउया. लहानपणापासून आपल्यावर म्हणजे माझ्यावरतरी असे संस्कार झाले आहेत की आपल्यापेक्षा वडिलधार्या व्यक्तींना खाली वाकून नमस्कार करावा. अगदी पायाला हात लावून नमस्कार करावा. त्यांना मान द्यावा. त्यांच्याशी आदबीने बोलावे. वडिलधारी व्यक्ती म्हणजे फक्त वयाची वडिलकी असे नसून, एखादी व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने लहान असली तरी जर ज्ञानाने मोठी असली, तरीही त्या व्यक्तीला वडिलधारेपणाचा मान द्यावा अशी आम्हाला मिळालेली शिकवण. पण ही विचारधारा कुठेतरी लोप पावत चालली आहे असे उगाचच वाटून गेले. कारण आजा काल मुले घरात मुक्त वातावरण असल्याने कधी कधी उलटही बोलताना दिसतात. आणि ते पालकांकडून कौतुकमिश्रित हसण्यावारी नेले जाते. आणि मग असे लक्षात आले की हे कालानुरूप बदल झाले असू शकतील. इथे तुम्ही तुमच्या मुलांवर कसे संस्कार करता त्यावर हे अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्या स्वतःच्या आचार विचार, वागणूक याना फार महत्त्व आहे. कारण तेच पुढची पिढी उचलणार आहे. माझी प्राजक्ता नावाची एक मानलेली आणि अभिमानास्पद व्यक्तीमत्वाची मुलगी अमेरिकेत आहे. तिने तिच्या मुलावर योग्य आणि चांगले संस्कार केले आहेत. संस्कार केले म्हणजे काय केलय? असं कर, तसं कर, हे कर ते कर, म्हणून ती त्याच्या मागे लागली नाही. तिने कोणतीही गोष्ट मुलाला आग्रहाने किंवा मारून मुटकून शिकवली नाही. तर तिने स्वतःच्या वर्तनाचा वस्तुपाठ त्याच्यासमोर ठेवला. ती स्वतः आपल्या आई बाबाना, आजी आजोबांना, सासू सासर्यांना खाली वाकून नमस्कार करते. त्याप्रमाणे तो मुलगा आईचे बघून रोज देवाला नमस्कार करतो, रामरक्षा वगैरे स्तोत्रे म्हणतो. अमेरिकेत जाऊनही त्या मुलीने आपली संस्कृती सोडलेली नाही. ती आंग्लाळलेली नाही. ती स्वत: मनाने भारतीयच आहे, तिच्या सूक्ष्म मनाच्या गाभार्यात आपली संस्कृती घट्ट रूजलेली आहे, रूतलेली आहे. मी मागे म्हटलं आहे की आपण वागू त्याचे आपली मुले अनुकरण करतात. आपली वाणी आणि आपली कृती या एकमेकांना पूरक असायला हव्यात. तो चांगला नागरीक व्हावा म्हणून जे संस्कार करायला हवेत ते त्याचे आई वडिल जाणून बुजून आपल्या स्वतःच्या वागणूकीतून करतात. अर्थात ही गोष्ट खरी की त्या मुलांनाही ते घ्यावेसे वाटले पाहीजे. आणि एक गोष्ट नक्की की मुले वाईट गोष्टी चटकन उचलतात. म्हणून संस्कार कोणाचे याला खूप महत्त्व आहे. संस्कार हे चांगले किंवा वाईट असे नसतात. संस्कार हे संस्कारच असतात. ते जिथे रूजणार आहेत ती माती सक्षम हवी. सुपिक हवी. तरच येणारी फळे चांगली असतील. खडकावर बीज रूजणं हा फक्त दैवी चमत्कारच असतो. आणि जर हल्लीच्या काळात जर संस्कारांचे विडंबन झाले असेल तर त्याला प्रामुख्याने दूरदर्शनच सर्वस्वी जबाबदार आहे असेच मी म्हणेन. मग हे आपण बदलू शकत नसू तर "कालाय तस्मैनमः' असे म्हणून मी सोडून द्यायला शिकलोय. असो. मुद्दा हा आहे की आपण अजून संस्कृती सोडली नाहीये. आपण सवलती घेतो आहोत. कधी कधी त्याचा अतिरेक होतो.
संस्कृती संस्कृती म्हणत असताना, सुसंस्कृत असणं म्हणजे काय असाही प्रश्न बर्याचवेळा पडतो. सुसंस्कृत असणं याचा अर्थ पाहिला तर त्याला इतर अनेक कंगोरे आहेत. नुसतं लिहायला वाचायला येणं म्हणजे सुशिक्षित असणं. पण सुशिक्षित असलेला सुसंस्कृत असेलच असं नाही. दोन्ही मध्ये एक पुसटशी सीमारेषा आहे. उच्च विद्याविभूषित असणारा, मोठ्या हुद्द्यावर काम करणारा, गलेलठ्ठ पगार घेणारा मनुष्य सुसंस्कृत असेलच असे नाही. भलेही तो घरी देवाधर्माचं करत असेल, परंतु माणसाशी माणूस म्हणून वागणं जर त्याला जमत नसेल तर तो सुसंस्कृत आहे असं मी म्हणणार नाही. हेच.. एखादा अडाणी, शेतमजूर.. मिळणारे पैसे देवाधर्माच्या नावाखाली न घालता, जर एखाद्या गरजूला देत असेल, बायको-मुलांना सुखी ठेवण्यासाठी धडपडत असेल तर तो सुसंस्कृत आहे असे माझे मत आहे. समाजाला (यामध्ये कुटुंबिय, नातेवाईक, शेजारीपाजारी, आणि इतर समाज हे सगळेच आले) कोणत्याही प्रकारे त्रास होईल असं वर्तन न करणारा म्हणजे सुसंस्कृत अशी व्याख्या मी माझ्या पुरती केली आहे.
शेवटी संस्कृती संस्कृती म्हणजे आहे तरी काय....?? "जुने ते सोने.." असा सूर न लावता काळानुरूप जे योग्य ते उपयोग्य असे मानले तर सामाजिक जाणिवेची संस्कृती जपणं म्हणजे संस्कृती !! "कालाय तस्मै नम:" म्हणताना आपणही त्या बदलत्या काळाचा एक भाग आहोत हे विसरून कसं चालेल? बरोबर ना?
रविवार, २० सप्टेंबर, २००९
आरोग्यम् धनसंपदा - १० : पाठ दुखी
मागच्या लेखात आपण दमा किंवा श्वासाचा विकार पाहिला होता. आजच्या वेगवान आणि वेळेचा विचार न करता काम करण्याच्या युगात आणखी नेहमीच आढळणारी व्याधी म्हणजे पाठ, कंबर दुखी, मान दुखी. विषयाचा आवाका तसा मोठा आहे. त्यामुळे या भागात आपण पाठ व कंबरदुखी याचे स्वरूप कारणे याचा विचार करू. (मानदुखी याचा विचार नंतर स्वतंत्ररीत्या करू.) यावरचे योगावर आधारलेले उपचार आणि इतर उपचार याचा विचार पुढच्या भागात करू.
आपल्या कामाची पद्धत, आपली बैठक, त्या अवस्थेत किती वेळ बसून राहतो यावर त्या व्याधीची तीव्रता अवलंबून असते. आजच्या युगात सर्वसामान्यपणे आढळणारी ही व्याधी आहे. या लेखात आपण पाठदुखी/कंबर दुखी याचा विचार करू, आणि मानदुखी यावर नंतर पाहू. पाठदुखीवरचे उपचार पाहण्यापूर्वी प्रथम पाठदुखी म्हणजे नक्की काय ते पाहू. ढोबळमानाने पाठदुखी म्हणजे छातीचा मागचा भाग, कंबर कुल्ले या अवयवात सतत किंवा अधून मधून वेदना होणे. पाठदुखी किंवा वेदना म्हणजे तरी काय? तर त्या ठिकाणचे स्वास्थ्य बिघडणे. तिथे काहीतरी बिनसल्याची जाणिव होणे.
पाठीच्या कण्याला दुखापत होणे हे महत्त्वाचे कारण आहे. बर्याचवेळा काय कारणाने पाठ दुखायला लागली ते कळतही नाही. आपपण वाहन चालवताना खड्ड्यातून वाहन गेले तर पाठीच्या मणक्याला दुखापत होऊ शकते. काही काही रस्त्यांवर स्पीड ब्रेकर्सचा अतीरेक असतो. हे स्पीड ब्रेकर्स हे "बॅक ब्रेकर्स" आहेत. खेळाडूना पाठीची दुखापत लवकर होण्याचा संभव असतो. उदाहरणार्थ क्रिकेटमधे वेगवान गोलंदाजाना पाठीचे दुखणे लवकर लागू शकते.
काम करताना आपली बसण्याची पद्धत ही सुद्धा बर्याचदा कारणीभूत असते. आपण बसताना पोक काढून बसतो. कारकून खुर्ची आणि टेबल यांच्या उंचीचे प्रमाण कधी कधी योग्य नसते. त्यामुळेबसण्याची वेडीवाकडी स्थिती होते. संगणकासमोर बसून काम करताना बर्याच वेळा खुर्ची गोल फिरणारी असते. किंवा खुर्चीत बसून काम करताना एखादा कागद किंवा काहीही वस्तू हवी असल्यास ती खुर्चीवरून न उठता वेडे वाकडे हात वारे करून घ्यायची सवय लागते. किंवा काही वेळा आपण बसलेलो असताना एखादी वस्तू वार्याने म्हणा किंवा इतर कारणाने पडायला लागली असताना आपण अचानक घाई घाईने हालचाल करतो. आणि हात वळवून ती वस्तू चटकन धरण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी स्नायूंची वेडी वाकडी हालचाल झाल्याने ते लचकतात. एखादी जड वस्तू उचलताना ती योग्य पद्धतीने उचलली गेली नाही तर पाठीत उसण भरू शकते. आपण उत्साहाच्या भरात उचलायला जातो. वजन उचलायचे असल्यास किंवा ढकलायचे असल्यास ते एका विशिष्ट पद्धतीनेच उचलावे लागते. तरच पाठीच्या कण्याला त्रास होत नाही. अन्यथा पाठीच्या कण्याला दुखापत होते. मणका सरकणे, त्यातील अंतर कमी होणे वगैरे प्रकार होतात.
पाठदुखी आणि कंबरदुखी यावरईल उपचार पाहण्या पूर्वी त्यामागचे शरीरशास्त्र पाहूया. आपण कोणत्याही स्थितीत असलो तरी गुरूत्वाकर्षणामुळे आपल्या शरीरावर दाब पडत असतो. त्यात पाठीच्या कण्यावर येणारा दाब हा उभ्या, बसलेल्या आणि झोपलेल्या अवस्थेत निरनिराळा असतो. झोपलेल्या अवस्थेत ७ कि. ग्रॅ. दर चौ. सें.मी, उभे असताना १० कि. ग्रॅ. दर चौ. सें.मी आणि बसलेल्या अवस्थेत १५ कि. ग्रॅ. दर चौ. सें.मी असा असतो. म्हणजेच बसलेल्या अवस्थेत दाब सर्वाधिक असतो. हल्लीच्या आधुनिक जीवनात बैठे काम अधिक असते. आणि म्हणून ज्यांना बैठे काम अधिक करावे लागते त्यांना पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता सर्वाधिक असते. आणि म्हणून हल्ली पाठदुखीचे प्रमाण अधिक वाढले आहे. आपल्या पाठीच्या कण्यात एकूण ३३ मणके आहेत. ते एकमेकांवर एखाद्या लगोरीसारखे रचलेले असतात. आणि ते स्नायुंच्या सहाय्याने पक्के बांधलेले असतात. त्याची सहजा सहजी मोड तोड होत नाही. आपल्या मानेत सात मणके, छातीत बारा मणके, कमरेत पांच, कटीबंधात पांच तर शेपटात चार मणके असतात. उत्क्रांतीच्या ओघात शेपूट गळून गेली. आणि त्यामुळे शेपटीतले मणके हे एकमेकांना जोडले गेले. आता यात कमरेतले पांच मणके हे रूंद आणि मोठे असतात. त्यामुळे ते जास्तीत जास्त दाब सहन करू शकतात. वजन पेलू शकतात. तिथली हालचाल ही वळणे, वाकणे अशा प्रकारची असते. म्हणून पाठ दुखत असताना डॉक्टर सांगतात की, "फार वळू नका, पुढे वाकू नका" छातीतले मणके मध्यम आकाराचे असतात. त्यामधे त्यामानाने वळण्याची हालचाल जास्त आहे. मानेतले मणके हे सर्वात लहान. त्यामुळे त्यात हालचाल मुक्त असते. पण मग ते तसे नाजूकही असतात. जेंव्हा मूल जन्माला येते तेंव्हा त्याचा पाठीचा कणा हा एखाद्या दोरीसारखा सरळ असतो.पण नंतर मूल जसे डोके वर उचलू लागते तस मानेत कणा पुढील बाजूने वक्र व्हायला लागतो. आणि अशा तर्हेने वय वाढायला लगले की कणा पूर्णपणे विकसित होताना छातीच्य भागात पुढील बाजूने आंतर्वक्र व कमरेच्या भागात पुढील बाजूने बहिर्वक्र होतो. दोन मणक्यामधे एक रबरी चकती सारखी वस्तू असते. ती चकती एखाद्या शॉक ऍबसॉर्बरसारखे काम करते. त्यामुळे धक्के अधिक चांगल्या प्रकारे सहन केले जातात. या मणक्यातील छिद्रातून चेता बाहेर पडत असतात. आता हा पाठीचा कणा मांडीतल्या हाडामधे म्हणजेच खुब्यातल्या सांध्यामधे एखाद्या उलट्या लंबकासारखा आहे. त्यामुळे यात पुढे वाकणे ही क्रिया नैसर्गिक आहे. मागे वाकणे ही क्रिया मर्यादीत आहे.
आधुनिक जीवनशैलीत आपाण या खुब्याच्या सांध्यात असलेली हालचाल, तिथले स्थितीस्थापकत्व घालवून बसलो आहोत. सर्व सामान्यपणे असे दिसून येईल की पुढे वाकताना आपण कमरेतून वाकण्याच्या ऐवजी गुढघ्यातून वाकतो. कंबर स्थिर ठेवून संपूर्ण कणा पुढे किंवा मागे नेणे हे होत नाही.कण्याच्या व्याधी सुरू होण्याचे मुख्य कारण म्हणजे कण्याची हालचाल जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. वाकडी तिकडी करतो. उदहरणासाठी आपण असे पाहूया की एक व्यक्ती बँकेत कारकून आहे.त्या व्यक्तीला सतत उजवा हात पुढे घेउन काम करावे लागत आहे. असे झाले की खांदे आणि पाठीचा कणा यत असणार्या तराजूसारख्या रचनेचा तोल बिघदतो. ती व्यक्ती असे वर्षानुवर्षे काम करत राहीली की त्याकण्याची वाकडी स्थिती व्हायल लागते. तोअल धळतो. दोन मणक्यामधे सूज यायला लागते. आणि अशी सूज आली की हालचाल बंद होते. ही हालचाल बंद होणे ही शरीराने केलेली संरक्षणाची नैसर्गिक व्यवस्था आहे. पण आपन काय करतो की अशी हालचाल बंद झाली की जबरदस्तीने हालचाल करतो. कारण अशी हालचाल बंद होणे हे परवडण्यासारखे नसते. मग तात्पुरत्या वेदनाशामक औषधे घेऊन काम पुढे सुरू ठेवतो. पण त्याने मूळचे कारन दूर होत नाही. बरे वेदनाशामक औषधांना मर्यादा असतात. ती फार काळ घेता येत नाहीत. आणि मग अशी स्थिती येते की त्या औषधांचा उपयोग होईनासा होतो. हळूहळू वरचा मणका खालच्यावरून सरकायला लागतो, त्यात 'गॅप' पडायला लागते. वेड्या वाकड्या स्थितीमुळे चकतीवर असमतोल दाब पडून ती झिजायला लागते. किंवा ती मागे ओढली जाते आणि माग दुखण्याची न संपणारी मालिका सुरू होते. कधी कधी अतिरेक झाला तर मज्जारज्जूलाही ईजा पोहोचण्याच संभव असतो. स्पर्श, दाब, वेदना यातून निर्माण होणारा दाह हे एक दुष्टचक्र आहे. मग ती व्यक्ती आपल्याला दुखणार नही अशी स्थिती धारण करण्याचा प्रयत्न करते.व त्याने शरीराला वक्रता येते. पुढे पुढे हालचाल मंदावते. कण्याच्या नैसर्गिक वक्रतेत बदल होतो. हालचालींवर बंधने येतात.स्नायूंचा आकार आणि लांबी यात बदल होतो. व शेवटी आपल्या पायवर त्याला उभे राहणे अशक्य होते. आणि मग सर्वसामान्य दृश्य असे दिसते की आता आपण गांभिर्याने यावर विचार करायला लागतो. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते, किंवा उशीर झालेला असतो.आणि हा दु:खद प्रवास शस्त्रक्रियेशी येऊन थांबतो.परंतु अश्या शस्त्रक्रियेनंतरहि दुखणे जाईल याची खात्री डॉक्टर देतीलच असे नाही. आणि मग रूग्ण हतबल होतो.
या दुखःद अवस्थेतून सहिसलामत बाहेर येणे शक्य आहे. त्यासाटी प्रयत्नपूर्वक वेळ देणे आणि बर्याच मनोनिग्रहाची गरज आहे. या पुढिल लेखात यावर यशस्वी मात करण्याचे उपाय पाहूया. यात दिनचर्या, औषधे, योगोपचार याचा समावेश असेल.
ॐ तत्सत्
श्रीराम पेंडसे

आरोग्यं धनसंपदा-९
॥ आरोग्यं धनसंपदा ॥
मागल्या लेखात आपण दिनचर्या यावर पाहीले होते. त्यात काही आसने पाहिली होती. ती आसने ही विशिष्ट रोगांवर उपयोगी होती. तसेच सर्वसामान्य लोकांनाही की ज्यांना काहीही झालेलेनाही अशांनाही ती उपयोगी पडतील असे मी म्हटले होते. आज आपण आता पुन्हा दिनचर्या यावर चर्चा करू. आपण पाहत आहोत की सध्या स्वाईन फ्लूने थैमान मांडले आहे. आणि हा श्वासाशी संबंधतीत विकार आहे. आपण जर नीट लक्ष देऊन पाहिलेत तर असे लक्षात येईल की स्वाईन फ्लूने दगावलेले सर्वजण किंवा अत्यवस्थ असलेले सर्व हे श्वास अडकल्याने, श्वास कमी पडल्याने अत्यवस्थ झाले आणि दगावले. हे सर्वजण "व्हेंटीलेटर"वर होते. म्हणून आज आपण दमा किंवा अस्थमा यासंबंधी पाहूया. दमा याला आयुर्वेदात तमक श्वास असे म्हणतात. तम म्हणजे अंधार. जो विकार अंधारात आपले गुण उधळतो म्हणजेच अंधारात, रात्री अधिक त्रासदायक असतो म्हणून त्याला तमक श्वास असे नाव आहे. यात रूग्णाला श्वासाला अडथळा निर्माण होतो, श्वास अडल्यासारखे वाटते. अर्थात छातीशी संबंधीत किंवा हृदयाशी संबंधीत लागणारा दम इथे याचा इथे विचार केलेला नाही. कारण त्याच्या चिकित्सेची दिशा ही पूर्णतया निराळी आहे. याला आधुनिक वैद्यकशास्त्रात "कार्डिऍक अस्थमा" म्हणतात.
आता याची कारणे पाहू. साधारणपणे दमा हा एक ऋतू संपताना आणि दुसरा सुरू होताना होतो. थंडी पावसाळ्यात याचा जोर अधिक असतो. हवेतील आर्द्रता, ढगाळ वातावरण यात हा तीव्रतेने आढळून येतो. या शिवाय दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रदूषण. यामुळे होणार्या दम्याला आधुनिक वैद्यकात "ऍलर्जिक ब्राँकायटिस" म्हणतात. यात टायरचा वास, धूर, धूळ, विशिष्ट मेणाचे वास, कारखान्यातून बाहेर पडणारा धूर व विषारी वायू, कचरा पेटीतील वास आणि नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहनांच्या संख्येमुळे होणारे, वायू प्रदूषण यामुळे फुफ्फुसांच्या क्षमतेवर परीणाम होतो आणि दम लागणे, श्वास अडकणे असे त्रास सुरू होतात. ऍलर्जी असल्यानेही श्वासाचा त्रास होउ शकतो. सामान्यपणे पपई, आंबा, संत्रे, केळं, चिक्कू, पेरू,अननस, कलिंगड तसेच काकडी, टॉमेटो, फळांचे थंड रस, किंवा मिल्क शेक्सफळभाज्या फ्रीजमधले पाणी अश्या अनेक गोष्टींची ऍलर्जी होऊ शकते. म्हणून या सर्व वस्तूंचा वापर हा तारतम्याने करावा. यापैकी आपणच आपणास कशाची ऍलर्जी आहे हे पाहून त्याप्रमाणे त्या त्या वस्तूचा वापर टाळल्यास या रोगावर विजय मिळवणे शक्य आहे.
इतर कारणांत सतत गारव्यात काम करणे म्हणजे ए.सी. मधे बराच वेळ काम करून लगेचच गरम वातावरणात बाहेर येणे, जेवणानंतर दूध, फळांचा ज्युस, आईसक्रीम खाणे, वारंवार फ्रीजचे पाणी पिणे, वारंवार जेवणात फळांचा वापर करणे ही कारणे आहेत. तसेच रोजच्या जेवणात डालडा आणि रिफाईंड तेलाचा वापर हेही कारण असते. आजच्या युगात रोजच्या जेवणात डालडाचा वापर खूपच कमी असतो. पण बाहेरच्या हॉटेलमधील पदार्थात तो वापर बराच असतो. त्यामुळे नेहमी नेहमी बाहेरचे खाण्याची वेळ ज्यांच्यावर येते त्यांना हा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा अतिरेकी वापर, शिळी मिठाई, शिळे अन्न तसेच अतिप्रमाणात बटाटा वांगे, अळू खाण्यानेही याचा त्रास होऊ शकतॉ. अर्थात सर्वांना त्रास होइलच असे नाही. पण ही कारणे असू शकतात हे लक्षात ठेवावे. म्हणजे आपणास कशाने त्रास होतो आहे हे समजले तर त्याप्रमाणे उपाययोजना करता येऊ शकते.
दम्याच्या लक्षणांचा विचार करायचा झाला तर त्यात वारंवार होणारी सर्दी, वेळी अवेळी तोंडातून पडणारे कफाचे बेडके, ताप, कणकण, शिंका येणे, डोकीदुखी, डोळे लाल होणे, डोळ्यातून पणी येणे अश्या लक्षणांचा समावेश आहे. तसेच इतर आण्खी लक्षणात छातीत गच्च होणे, श्वास लागणे, श्वास कमी असल्याची जाणिव होणे, छातीतून आवाज येणे अशी लक्षणे असतात. आणखी एक प्रमुख गोष्ट म्हणजे यात झोपल्यावर त्रास वाढतो, पण उठून बसल्यावर बरे वाटते. पण दमा छातीच्या विकाराने, हृदयाच्या त्रासाने असेल म्हणजेच "कार्डिऍक अस्थमा" मुळे दम लागत असेल तर मात्र झोपल्याने, विश्रांतीने बरे वाटते. शिवाय इतर किरकोळ कारणात शिंकेचा अवरोध केल्याने दम लागणे कृमी, जंत मल मूत्रप्रवृत्तीचा अवरोध यांचा समावेश आहे.
आता याच्या चिकित्सेचा विचार करूया. यात चिकित्सेच्या तीन दिशा आहेत. एक म्हणजे औषधविना चिकित्सा, घरात उपलब्ध असणारी द्रव्ये वापरून केलेली चिकित्सा आणि ग्रंथोक्त चिकित्सा. सर्वप्रथम औषधविना चिकित्सा पाहूया. यात दीर्घ श्वसन आणि प्राणायाम याचा समावेश आहे. जवळ कोणते औषध नसेल तर गरम पाणी सतत पीत राहवे. त्याने श्वासनलिका प्रसरण पावतात व फुफ्फुसातला वायू मोकळा होतो. तसेच त्रास असताना सतत लवंग चघळत राहवी. दीर्घ श्वसनात हवा हळू हळू आताघेऊन हळू हळू सोडावा. आणखी एक गोष्ट आवर्जून करावी. ती म्हणजे संध्याकाळी लवकर जेवावे. सूर्यास्ताच्या सुमारास जेवावे. संध्याकाळी ६ ते ६.३० नंतर जेवायचे नाही असा निश्चय करावा. साधी सहज उपलब्ध असणारी द्रव्ये वापरून उपचार करताना लवंग चघळावी असे मगाशी सांगितले आहेच. दूध प्यायचे असल्यास पिंपळी सिद्ध किंवा लसूण सिद्ध दूध प्यावे. ते बाधत नाही. व त्याने कफवृद्धी होत नाही. हे दूध तयार करताना एक कप दूध आणि एक कप पाणी एकत्र करावे. त्यात लहान मुलांसाठी करायचे असल्यास ३ ते ४ पिंपळ्या आणि मोठ्या माणसांसाठी १०पिंपळ्या किंवा लसणीच्या ४-५ पाकळ्या त्यात मिसळून ते मिश्रण एक कपाइतके उरवावे. त्यात चवीप्रमाणे पत्री खडीसाखर मिसळून असे दूध प्यायला हरकत नाही. इथे एक खुलासा करतो. पिंपळी आणि पिंपळ वृक्ष याचा काहीही संबंध नाही. पिंपळी हे मिरे किंवा नागवेल या कुलातले असून त्याचा वेल असतो. मिर्यासारखी फळे याला येतात. फरक इतकाच की मिरे साबुदाण्यासारखे गोल असतात तर पिंपळी ही लांबुळकी असते. म्हणून याला "लेंडी पिंपळी" असेही म्हणतात. पिंपळी हे निसर्गातले श्वासाच्या अवरोधावरचे सर्वोत्तम औषध आहे. अवरोध म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास कमी पडणे. त्रिकटू चूर्ण दोन चिमूट चूर्ण पाण्यात उकळून गार करून घेणे. त्रिकटू म्हणजे सुंठ, मिरे आणि पिंपळी यांचे समभाग चूर्ण असते. सहज उपल्ब्ध असणार्या वनस्पतीत तुळशीची १० पाने रोज चावून खावीत. कोरफडीचा गर मिरपूड लावून खावा.
आता आपण ग्रंथोक्त उपचार काय आहेत ते पाहू. यात सांगितलेली औषधे सामान्यपणे बाजारात "रेडी मेड" उपलब्ध असतील. एखादे औषध न मिळाल्यास पुण्यात शनीवार पेठेत "हरी परशुराम औषधालय" इथे मिळू शकतील. अर्थात ही औषधे घेताना तज्ञांचा सल्ला घेतल्याखेरीज वापरण्याचा विचार करू नये. तज्ञांचा सल्ला इतक्यासाठीच घ्यायचा की रूग्णाच्या अवस्थेनुसार रोगाच्या त्रासाच्या तीव्रतेनुसार त्या औषधांची मात्रा, घेण्याचे प्रमाण, व घेण्याच्या वेळा बदलतील.
ज्यावेळी वेग जास्त असेल म्हणजेच आजार अधीक तीव्र असेल तेंव्हा कनकासव १ ते २ चमचे तितक्याच पाण्याबरोबर देणे. मात्र कनकासवात धोत्रा असल्याने त्याचा वापर अगदी गरज असेल तेंव्हा करावा. खोकल्याचा त्रास कमी झाल्यावर थांबवावे. त्रास जास्त असेल तर चौसष्ट पिंपळी चूर्ण मधातून चाटवावे. साधारण हरभर्याच्या दाण्याइतके चूर्ण चार पांच वेळा मधातून चाटवावे. रजन्यादिवटी सतत चघळत राहणे. हा हळद, कोरफड आणि कडू जिरे याचा पाठ आहे. अगदीच "इमर्जन्सी" आली तर श्वासकुठार २ गोळ्या कुटून मधातून घ्याव्यात. दिवसातून तीन चारवेळा हरकत नाही. पण श्वासकुठारचा वापर जितका कमीत कमी करता येईल तितका करावा. कारण यात मनशीळ यासारखी काही द्रव्ये आहेत ज्यांच्या अतीवापराने वाईट "साईड इफेक्ट्स" होऊ शकतात. आजाराचा जोर तीव्र असण्याच्या काळात छातीस महानारायण तेलाने मर्दन करावे. साधे तिळाचे तेल घेऊन त्यात थोडेसे मीठ टाकून किंचीत कोमट करावे आणि त्यातेलाने छाती चोळल्यासही चालेल. आणि असे छाती चोळल्यावर ती गरम पाण्याने शेकावी. व्याधीची तीव्रता असताना वापरण्याची आणखी दोन औषधे आहेत. त्यपैकी एक म्हणजे सुवर्णबृहत् वातचिंतामणी. याच्या दोन गोळ्या वेगावस्थेत घ्याव्यात. आणि दुसरे म्हणजे अभ्रक भस्म. हे शेंगदाण्याइतके घेउन मधात मिसळून ठेवावे. आणि दिवसातून चार वेळा द्यावे.
आता त्रासाची तीव्रता थोडीशी कमी झाली कि दमा गोळी, ज्वरांकुश, लक्ष्मीनारायण या गोळ्या प्रत्येकी ३ घ्याव्यात, एकत्र कुटून त्या पाण्याबरोबर सकाळी आणि संध्याकळी घ्याव्यात. शिवाय २०० मि.ली. खोकला काढ्यात ५ ग्रॅ. पिंपळी चूर्ण मिसळून दोन्ही जेवणानंतर ४-४ चमचे तितक्याच पाण्याबरोबर घ्यावे. पोट साफ नाही असे वाटत असेल तर गंधर्व हरितकी १ च्मचा चूर्ण गरम पाण्याबरोबर रात्री जेवणानंतर घ्यावे. किंवा १०-१५ मनुका पान्यात भिजवून थेवून ते पाणी घ्यावे. लहान मुलांना बाहवा मगजाचा काढा द्यावा. ५ ते १० ग्रॅ. बाहवा मगज एक कप पाण्यात टाकून त्याचा अर्धा कप उकळवावा. यात अंगात ताकद राखून कफाचे विलयन करण्याची याची क्षमता आहे.
आता हे होऊ नये म्हणून काही करता येईल का? याला आयुर्वीदात अपुनर्भव चिकित्सा म्हणतात. यात वारंवार कफ होऊ नये, कायम फुफ्फुसे स्वच्छ आनी मोकळी राहवीत, हृदयाला बल मिळावे म्हणून अभ्रक भस्म १ भाग, घौसष्ट पिंपळीचूर्ण २ भाग, मृगशृंग भस्म १ भागा आणि अस्सल वंशलोचन १ भाग एकत्र करून दिवसातून दोन वेळा घ्यावे. लहान मुलांना हरभर्याच्या दाण्याइतके आणि मोठ्याना त्याच्या दुप्पट मधातून किंवा गरम पाण्यातून द्यावे. हेच वासापाक बरोबर घेतल्यास अति उत्तम. वासापाकाबरोबर चौसष्ट पिंपळी चूर्ण घ्यावे.
लहान मुलांना जंत कृमी यामुळे दमा होऊ शकतो. हे कायमचे काढण्यासाठी सतापा काढा २-२ चमचे पाण्याबरोबर द्यावा. मोठ्यांनी ४-४ चमचे दोन्ही जेवणानंतर घ्यावा. शिवाय कृमीनाशक वटी सकाळ आणि संध्याकाळी ३-३ गोळ्या कुटून पाण्यासह घ्याव्यात. आणि कपिलादीवटी ६ गोळ्या रात्री निजताना बारीक करून पाण्यासह घ्याव्यात. लघुमालिनीवसंत हे तापावरचे अगदी सोपे औषध आहे.
आणि समारोप करताना एक सूचना द्यावीशी वाटते ती ही की वारंवार होणारी सर्दी, खोकला, ताप याची परिणीती अनियंत्रीत दमा होण्यात होऊ शकते. यासाठी सर्दी खोकला हा आटॉक्यात राहील याची काळजी घ्यावी. म्हणजे दमा हा त्रासदायक ठरणार नाही आणि त्यावर नियंत्रण मिळवता येईल.

गुरुवार, ३० जुलै, २००९
माझा मी
वयाची नुकतीच साठी उलटली
एक पर्व पार पडलं
आता यानंतर पुढे काय
हे मात्र नाही उमगलं १
इथे मागे वळून पाहताना
मनात विचारांचं आंदोलन आलं
षट-दशकांच्या या आयुष्यात
काय कमावल, काय गमावलं? २
आत्तापर्यंतचं सारं आयुष्य
वाळूसारखं निसटून गेलं
आता हाती कणही नव्हता
जीवन सारं सुनं झालं ३
मित्र नाहीत, सखे नाहीत
वर्षे कशी सरत गेली
नाती, नातलगांची लेणी मात्र
आयुष्यभर बोचत राहीली ४
आता जीवनाच्या उतरणीवर
एक मात्र अप्रूप घडलं
जे जिवलग कधी भेटले नाहीत
त्यांचं मनोरम दर्शन घडलं ५
कोण कुठला, कोण कुठली
कशी अनामिक मैत्री झाली
पुन्हा एकदा मन-चित्ताची
सतार सुरात झंकारू लागली ६
शब्द जमले, तारा जुळल्या
विचारांच्या धारा जुळल्या
विद्ध नाते-संबंधाच्या ही
खोल खोल जखमा भरल्या ७
कुणी म्हणे दादा, कुणी बाबा,
कुणी म्हणे दोस्ता, तर कुणी आजोबा
आणि तरीही सर्व सुहृदांचा
जमला मनोहर निर्मळ घरोबा ८
हे चित्र दिसत होतं कसं?
की ऒल मायनस नो प्लस
जगाकडे पहायची वृत्ती बदलली
तर असेल सर्व प्लसच प्लस! ९
तुम्ही आलात तुम्ही बोललात
तुम्हाला भेटून छान वाटलं
नाही आलात नाही बोललात
कार्यबाहुल्यामुळे नसेल जमलं १०
तरीही मन अस्वस्थच होतं
एक गोष्ट टोचत होती
आपल्यासाठी कुणाला वेळ नाही ही
हिरवळीतल्या कांट्यासारखी बोचत होती ११
मी वाट पाहतोय त्या क्षणाची
बोचणारा कांटा निघून जाण्याची
आणि तो कांटा निघून गेल्यावर
मिळणार्या चित्त समाधानाची १२
पण कांटा निघून गेला तरी
मनाची बोच जाईल का?
भरल्या जखमेच्या व्रणासारखी
नंतर ती त्रास देईल का? १३
एक पर्व पार पडलं
आता यानंतर पुढे काय
हे मात्र नाही उमगलं १
इथे मागे वळून पाहताना
मनात विचारांचं आंदोलन आलं
षट-दशकांच्या या आयुष्यात
काय कमावल, काय गमावलं? २
आत्तापर्यंतचं सारं आयुष्य
वाळूसारखं निसटून गेलं
आता हाती कणही नव्हता
जीवन सारं सुनं झालं ३
मित्र नाहीत, सखे नाहीत
वर्षे कशी सरत गेली
नाती, नातलगांची लेणी मात्र
आयुष्यभर बोचत राहीली ४
आता जीवनाच्या उतरणीवर
एक मात्र अप्रूप घडलं
जे जिवलग कधी भेटले नाहीत
त्यांचं मनोरम दर्शन घडलं ५
कोण कुठला, कोण कुठली
कशी अनामिक मैत्री झाली
पुन्हा एकदा मन-चित्ताची
सतार सुरात झंकारू लागली ६
शब्द जमले, तारा जुळल्या
विचारांच्या धारा जुळल्या
विद्ध नाते-संबंधाच्या ही
खोल खोल जखमा भरल्या ७
कुणी म्हणे दादा, कुणी बाबा,
कुणी म्हणे दोस्ता, तर कुणी आजोबा
आणि तरीही सर्व सुहृदांचा
जमला मनोहर निर्मळ घरोबा ८
हे चित्र दिसत होतं कसं?
की ऒल मायनस नो प्लस
जगाकडे पहायची वृत्ती बदलली
तर असेल सर्व प्लसच प्लस! ९
तुम्ही आलात तुम्ही बोललात
तुम्हाला भेटून छान वाटलं
नाही आलात नाही बोललात
कार्यबाहुल्यामुळे नसेल जमलं १०
तरीही मन अस्वस्थच होतं
एक गोष्ट टोचत होती
आपल्यासाठी कुणाला वेळ नाही ही
हिरवळीतल्या कांट्यासारखी बोचत होती ११
मी वाट पाहतोय त्या क्षणाची
बोचणारा कांटा निघून जाण्याची
आणि तो कांटा निघून गेल्यावर
मिळणार्या चित्त समाधानाची १२
पण कांटा निघून गेला तरी
मनाची बोच जाईल का?
भरल्या जखमेच्या व्रणासारखी
नंतर ती त्रास देईल का? १३
शनिवार, २५ जुलै, २००९
मैफल
" अगा वैकुंठीच्या राया....."
भीमसेनी स्वर मंडपात घुमले आणि सवाई गंधर्व महोत्सवाचा मंडप एकदम चित्रासारखा स्तब्ध झाला. जवळ जवळ १२००० श्रोते पुतळ्यासारखे बसून कानात प्राण आणून ऐकत होते. भान विसरले होते. त्या सुरात ताकदच इतकी जबरदस्त होती की मंडपाबाहेर चहाच्या स्टॉलवरची वेळ घालवणारी, रेंगाळणारी मंडळीही लहान मुलांच्या "स्टॅच्यू"च्या खेळासारखी, आहेत तशी स्तब्ध झाली. भीमसेनजी भान हरपून गात होते आणि श्रोतेही तितकेच भान विसरून ऐकत होते. मी नेहमी जे माझ्या मित्रांना म्हणत आलोय आणि अजूनही म्हणतो त्याचा प्रत्यय आला, की भीमसेनांचे सर्वोत्कृष्ट गाणे ऐकायचे असेल तर फक्त सवाई गंधर्व महोत्सवामधले गाणे ऐकावे. मला वाटते की त्याचे कारण असे असावे की ते श्रोत्यांच्या टाळ्यांसाठीचे, "वन्समोअर"चे गाणे नव्हते, तर ती गुरुंना वाहिलेली श्रद्धांजली होती. ती तिकीट लावून केलेली लक्ष्मी क्रीडा मंदीर किंवा टिळक स्मारक मधली मैफल नव्हती, तर ती गुरूची सेवा होती. या महोत्सवाला नुसते प्रसिद्धीचे वलय नसते तर यातील वातावरण भारीत असते. निराळेच असते. मुंबईचे गुणिदास संमेलन घ्या, दिल्लीच्या इंडिया गेटवरचा कार्यक्रम घ्या, किंवा कलकत्त्याचा आय.टी.सी. महोत्सव घ्या, सवाईचे भारीत वातावरण तिथे नसते. आणि म्हणून बडे बडे कलाकार इथे येण्यात बहुमान समजतात. उत्सुक असतात. पंडितजींच्या आमंत्रणाची वाट बघत असतात. मानधनाचा विचार न करता केवळ पंडितजींच्या शब्दासाठी येणारे कलाकार आहेत. वसंतराव देशपांडे तर घरचे कार्य असल्यासारखे सवाईत वावरत असत. यावातावरणातल्या प्रसन्नपणाची एक मजेदार गोष्ट सांगतो. त्यावेळी कार्यक्रम रेणूका स्वरूप शाळेच्या पटांगणावर होत असे. प्रत्येक रात्री श्रोत्यांवर गुलाब पाण्याचा फवारा उडवला जात असे. संपूर्ण मंडपभर.
वसंतराव आणि पु. ल. देशपांडे यांची मैत्री तर सर्वश्रुत आहे. १९७० किंवा १९७१ चा सुमार असावा. नक्की सन आठबत नाही. सवाई गंधर्व महोत्सवाच्या काळात पु. ल. यांचे "बटाट्याची चाळ" आणि "असा मी असामी" चे पुण्यात प्रयोग होते. रात्रीचा प्रयोग झाला की पु. ल. सवाईच्या मंडपात येउन बसत असत. महोत्सवाचा शेवटचा दिवस होता. शेवटी भीमसेनांचे गाणे आणि त्याआधी वसंतराव. त्यादिवशी पु. ल. वसंतरावांना हार्मोनियमच्या साथीला बसले. दीड तास वसंतराव अफाट गायले. नंतर भीमसेनांचे गाणे होते. पु. ल. मुकाट्याने उठून प्रेक्षकात जाऊन बसले. भीमसेन स्वरमंचावर आले. इकडे तिकडे पाहिले. प्रेक्षकात पु. ल. दिसल्यावर, भीमसेन स्वरमंचावरून खाली आले, पु. लं चा हात धरून त्याना सन्मानाने स्वरमंचावर घेउन आले आणि हार्मोनियमवर साथ करण्याची विनंती केली. नंतर भीमसेनांचे जवळ जवळ पावणे दोन तास अफलातून गाणे. गाणे संपल्यावर छप्पर फाटेल असा टाळ्यांचा झालेला कडकडाट आजही माझ्या कानात घुमतो आहे.
भीमसेन या महोत्सवाचा प्राण आहेत. खरेतर भीमसेन हे भारतीय संगीताचा प्राण आहेत. मी १९६१-६२ च्या सुमाराला गाणे ऐकायला सुरूवात केली. मी तेंव्हा मुंबईत राहत होतो. वडिलांच्या आग्रहावरून विलेपार्ल्याला लोकमान्य सेवा संघात भीमसेनांची मैफल प्रथमच ऐकली. आणि त्यावेळीही शास्त्रिय संगीतातले शून्य कळण्याच्या काळात जे ऐकले ते भन्नाट वाटले. आजही काही कळतय आहे असे नाही. त्यावेळी जितके कळत होते, किंबहुना जितके कळत नव्हते, तितकेच आजही कळत नाहीये. पण तेंव्हा एक गोष्ट लक्षात आली होती ती ही की, मंत्रमुग्ध होण्यासाठी संगीत कळण्याची जरूरी नाही. आणि हे माझे मत आजही कायम आहे. यमन कल्याण किंवा तोडीचा आनंद घेण्यासाठी, हंसध्वनी किंवा शुद्ध कल्याणसारख्या मन प्रसन्न करणार्या मैफलीचा आनंद घेण्यासाठी त्या रागाची सरगम किंवा स्वरमांडणी माहित असण्याची गरज नाही. उत्कृष्ट श्रीखंडाचा आस्वाद, आनंद, हा चक्क्यातले "फॅट" % कळले तरच घेता येतो का? नाही. " वा वा. श्रीखंड फारच मस्त झालय" असं आपण म्हणतो. पण त्याचबरोबर " चक्क्यात फॅट % किती आहे हो?" असे विचारत नाही. श्रीखंड खाण्याने मिळणारा आनंद पुरेसा असतो. तसे आहे हे.
आणि मग ऐकायची भूक वाढत गेली तसतसे इतर कलाकारही ऐकायला लागलो. त्यात वसंतराव देशपांडे हा अवलिया कलाकार भरभरून ऐकला. वसंतराव हे एक अजब रसायन आहे. ख्याल, नाट्यसंगीत, ठुमरी, दादरा, गझल, भावगीत, सिनेसंगीत वगैरे सर्व क्षेत्रात मुक्तपणे आणि तितक्याच समर्थपणे संचार करणारे हे कलंदर व्यक्तिमत्व. वसंतराव खरे नावारूपाला आले आणि लोकप्रिय झाले ते " कट्यार..."मुळे. इतके दिवस फक्त गायक म्हणून श्रोत्यांना ठाऊक असलेले वसंतराव, नट म्हणून प्रेक्षकांपुढे "कट्यार काळजात घुसली" मधून आले. आणि प्रचंड गाजले. त्यांचे "कट्यार ...." लोकानी डोक्यावर घेतले. पण तरीही वसंतरावांच्या अफाट कर्तृत्वाला योग्य ती प्रसिद्धी मिळाली नाही. म्हणून मी त्यांना "शापित गंधर्व" म्हणतो. बडी बडी टीकाकार म्हणवणारी मंडळी या सिद्धहस्त कलाकाराला गायक मानायला तयार नव्हती. इतकच काय तर आकाशवाणीनेही त्याना गायक म्हणून मान्यता दिली नाही. पुणे आकाशवाणीतल्या एका निवृत्त अधिकार्यांना भेटायचा योग आला होता. ते आकाशवाणीचे "राजापेक्षा राजनिष्ठ" नोकर होते. वसंतरावांचा विषय निघाला. वसंतरावाना आकाशवाणीने मान्यता का दिली नाही असे विचारता त्यांचा चेहेरा एरंडेल प्यायल्यासारखा झाला. तेंव्हाच त्यांची आकाशवाणीवरची "राजनिष्ठा" लक्षात आली. त्यानी अंगावरून झुरळ झटकावे तसा तो विषय झटकून टाकला. फक्त इतकेच गुळमुळीत उत्तर दिले की त्यांचे स्वर शुद्ध नव्हते. गाणे तुटक तुटक असे. मी त्यावर म्हणालो की "मग कुमारजी सुद्धा तुटक तुटकच गातात की". पण त्या गृहस्थांना, ते निवृत्त का होईना पण सरकारी सेवक असल्याने माझे म्हणणे आवडले नाही. त्यांच्याकडे त्याचे समाधानकारक उत्तर नव्हते. राजनिष्ठ नोकर असल्याने आकाशवाणी म्हणते ते बरोबरच असले पाहिजे इतकेच त्यांना ठाउक होते. म्हणून मग त्यांनी "कुमार गंधर्वांची गोष्ट वेगळी आहे. त्याना एकच फुफ्फुस आहे. म्हणून त्यांचे असे होते." वगैरे थातुर माथुर म्हणून वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. आणि मीसुद्धा "हो का? असेल असेल" असे म्हणून उगाच न संपणारा वाद नको, म्हणून तिथून काढता पाय घेतला.
पंडीत जसराजही खूप ऐकले आहेत. जसराजांचा आवाज अतिशय मुलायम. अंगावरून मोरपिस फिरवल्यासारखे वाटावे असा. श्रोत्यांना बांधून ठेवण्याची जबर शक्ती त्या आवाजात आहे. मला आठवतय कि १९७४/७५चा सुमार असावा. सन नक्की आता आठवत नाही. पंडीतजी काही वर्षाच्या अनुपस्थितीनंतर सवाईत गात होते. नुकतेच जीवघेण्या दुखण्यातून बाहेर आले होते. त्यावर्षी ते अफाट गायले. मला वाटते ते "दरबारी" गायले होते. द्रुतची बंदिश "अजब तेरी दुनिया मालिक" संपवली आणि प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. आणि त्यानंतर जसराज आणि सवाई गंधर्व महोत्सव हे समीकरण बनले. जोग, गोरख कल्याण, अहिर भैरव, नट भैरव, भैरव, जयजयवंती. आणि गेल्या वर्षी तर शुद्ध सारंग. किती किती मैफली. त्यात झाकिर तबल्याच्या साथीला असेल तर मग जसराज अधिकच खुलायचे.
मी गाणे ऐकायला सुरूवात केल्यानंतरच्या काळात म्हणजे १९६० ते १९८५ या दोन तपात भारतिय शास्त्रिय संगीतावर भीमसेन, जसराज, कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे या चार महान कलाकारांचा जबरदस्त प्रभाव होता. किशोरी आमोणकर, मालिनी राजूरकर, बेगम परवीन सुलताना, उस्ताद अमीरखानसाहेब ही महान मंडळी होती. उ. सलामत अलीखान नझाकत अली खान हेही त्या काळात लोकप्रिय होते. पण त्यांचे कार्यक्षेत्र पाकिस्तानात होतं. रवी शंकर, विलायत खान, हरीप्रसाद चौरासिया, शिवकुमार शर्मा वगैरे वाद्य संगीत-दिग्गज मंडळी होती. यांचे महत्त्वा अजीबात कमी होत नाही. पण ही सर्व भारताबाहेर जास्त रमत असत. परदेशात हे कलाकार भारतापेक्षा अधिक लोकप्रिय होते. पण भीमसेन, वसंतराव, जसराज, आणि कुमारजी हा भारतीय संगीताचा प्राण होता असे मला वाटते. चौखांबी तंबू होता जणूकाही. मी म्हणतो त्या काळात या चॉघांनी शास्त्रिय संगीताची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहीली होती.
मला असे वाटते की भीमसेनांचे व्यक्तिमत्व आणि गाणे हे एखाद्या कुटुंबप्रमुखासारखे आहे. सर्व कुटुंबाला दिशादर्शक, मार्गदर्शक, आणि कडक शिस्तीचे. सर्वांना संभाळून घेणारे. प्रसंगी कुटुंबप्रमुखाप्रमाणे कानपिचक्याही देणारे. शिस्तीच्यासंदर्भात पंडितजींचा एक मजेदार किस्सा आठवला. मुंबईत एक कार्यक्रम होता. एक मोठे मंत्री दर्जाचे नेते येणार होते. मंत्रीजींना नेहमीप्रमाणे पाऊण तास उशिर झाला. त्यानंतर संयोजकांचे तासभर भाषण झाले. त्या भाषणात त्यांनी पंडितजींचा "आजचे प्रमुख कलाकार पं भीमसेन जोशी आहेत." इतकाच उल्लेख केला. बाकी सर्व मंत्रीस्तुती होती. पंडितजींना फक्त २० मिनिटे दिली होती. पंडितजी बरोबर २० मिनिटे गायले. अफाट गायले. त्यानंतर प्रेक्षकांनी आरडा ओरडा केला की अजून गा. पंडितजी जाग्यावरून उठले आहीत. मग मंत्रीजी जाग्यावरून उठले. पंडितजींच्याकडे गेले. त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले की, "सर्व प्रेक्षकांची इच्छा आणि आग्रह आहे तरी आपण अजून गावे." पंडितजींनी काय केले असेल? पंडितजींनी आपले घड्याळ मंत्रीजींना दाखवले आणि म्हणाले, "मला २० मिनिटांचा वेळ दिला गेला होता. त्याप्रमाणे गायलो. वेळेची बंधने ही पाळली जावीत असे मला वाटते. आता आणखी गाणे योग्य होणार नाही." असे म्हणून त्यांनी नम्रपणे नकार दिला. आणि ते गायले नाहित. पंडितजींनी आपल्या गाण्यात फारसे धाडसी प्रयोग केले नाहीत. "धोपट मार्गा सोडू नको" असे त्यांचे गाणे असे. त्यांना कधीतरी विचारले गेले होते की तुम्ही तेच तेच राग मैफलीत का सादर करता? तेंव्हा त्यांनी उत्तर दिले होते की श्रोते मला काय येतय हे पहायला येत नाहीत. माझ्या गाण्याचा आनंद घेण्यासाठी येतात. श्रोत्यांना आनंद देणे महत्त्वाचे. त्यामुळे त्यांना समजेल, आवडेल असे मी गातो.
त्याउलट वसंतरावांचे गाणे आक्रमक. साहसी. त्यांच्या गळ्यातून अश्या काही मुश्किल स्वरावली बाहेर पडत असत, आणि या जागा ते इतक्या सहजतेने घेत असत कि ऐकणारे चकित होउन जात. वसंतरावांचे व्यक्तिमत्व किंचितसे खोडकर. किंवा शाळेतल्या अतिशय हुशार पण व्रात्य मुलासारखे. जाता जाता टपली मारणारे. खोड्या काढणारे. त्यांच्या गाण्यात आव्हान असे कि "पहा मी किती सहज गातोय ते. तुम्हाल येइल का असे?" किंवा हुशार मुलगा म्हणतो ना की " अरे इतके सोपे गणित येत नाही? पहा कसे सोडवायचे ते." भीमसेनांचे गाणे हे कसोटी क्रिकेट सारखे आहे, तर वसंतरावांचे गाणे हे एकदिवसिय सामन्यासारखे आहे. त्या सामन्याचा जीव फक्त ५० षटकांचा. पण तरीही त्यात क्रिकेटचे तंत्र आत्मसात नसले तर खेळाडू अपयशी ठरेल. तसे वसंतरावांची मैफल ही दीर्घ नसली तरीही तांत्रिकदृष्ट्या अतिशय परीपूर्ण असते. ताना अणि सरगम हे वसंतरावांचे बलस्थान. आणि म्हणूनच वसंतरावांच्या ताना आणि सरगम ही श्रोत्यांना नागाप्रमाणे डोलवत असे. पण वसंतराव फारसे ख्याल गायनात रमत नसत. त्यांचा ख्याल हा जेमतेम ३५ ते ४० मिनिटांचा असे. ते नाट्यगीते, ठुमरी, दादरा, भावगीत अश्या उपशास्त्रिय प्रकारात अधिक खुलायचे. मला या संदर्भात त्यांची न्यूयॉर्कमधली एक मैफल आठवतीये. मी हजर नसलो तरी माझ्याकडे ध्वनिमुद्रण आहे. त्यात वसंतराव जेमतेम अर्धातास "भीमपलास" गायले आहेत. नंतर श्रोत्यानी आग्रह केला "नाट्यगीत म्हणा". त्यावर ते नेहमीच्या त्यांच्या अनुनासिक आवाजात म्हणाले, "नाट्यगीतेच म्हणायची आहेत ना? म्हणतो. पण त्याआधी मी तुम्हाला आमच्या संगीत नाटकाबद्दल सांगितले तर चालेल का?" "हो हो. चालेल चालेल." "तुम्हाला आमच्या नाटकातले संगित कसे असते ते सांगतो व त्याची झलक दाखवतो. आणि मग जसा वेळ असेल तशी काही नाट्यगीते म्हणतो. चालेल?" "हो. चालेल चालेल." " ठीक आहे. मी यासाठी पांच प्रमुख संगित नाटके आधार म्हणून घेणार आहे. की जी मराठी संगित नाटकाचा प्राण समजला जातात. सॉभद्र, मानापमान, शाकुंतल,शारदा आणि मृच्छकटिक. ही ती नाटके." आणि असे म्हणून त्यानंतर वसंतराव तासभर गाण्यासह बोलले आहेत. इथे एक उल्लेख जाताजाता करायचा आहे तो असा कि, पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे या दोघांनी वसंतरावांच्या स्वतंत्र मुलाखती घेतलेल्या आहेत. मुलाखतकाराने कमीतकमी बोलून कलाकाराला अधिकाधिक कसे बोलू द्यायचे असते याचा या मुलाखती म्हणजे आदर्श वस्तुपाठ आहेत. यापैकी वपुंनी घेतलेली मुलाखत ही आलुरकरांनी "मराठी संगीत नाटकाची वाटचाल" या नावाने दोन भागात प्रसिद्ध केलेली आहे. वसंतप्रेमींनी ही मुलाखत जरूर ऐकावी.
कुमार गंधर्वांचे गाणे हा वेगळाच विषय आहे. त्यांचे गाणे हे कानाला अतिशय गोड, सुरेल लागते. पण गूढ. जी.ए. कुलकर्णींच्या गोष्टींसारखे. फ्रेंच भाषा समजत नाही पण ऐकायला गोड. समजायला अतिशय कठिण. तसे. अफाट प्रतिभासंपन्न गाणे. अतिशय सुबक मांडणी. आपल्याला काय सादर करायचे आहे याचा मुद्देसूद आराखडा डोक्यात तयार असावा असे सादरीकरण. त्यांची निर्गुणी भजने लोकांनी डोक्यावर घेतली. त्यांनी काही रागांची निर्मितीही केली आहे. त्यांचे "अनुपरागविलास" हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी निर्माण केलेल्या रागांबद्दल तांत्रिक माहिती आणि त्या रागातल्या चीजा त्यांनी दिल्या आहेत. शास्त्रिय संगिताचा अभ्यास करणार्यांनी हे पुस्तक जरूर अभ्यासावे. पण त्यांच्या गाण्यावर त्यांच्या साथ न देणार्या प्रकृतीचे सावट होते. त्यांच्या ताना थोड्याश्या तुटक तुटक असायच्या. पण असामान्य प्रतिभेच्या जोरावार त्यांनी या त्रुटींवर समर्थपणे मात केली. इतकी कि या गोष्टी, त्यांचे गाणे ऐकताना लक्षातही येत नसत. त्यांचा अतिशय गोड स्वर कानावर पडला की श्रोते भान विसरत असत. गाणे ऐकण्याच्या सुरूवातीच्या काळात त्यांचे गाणे मी ऐकले तेंव्हा मला त्यांचे गाणे शाळेच्या हेडमास्तरसारखे वाटायचे. मुलांना हेडमास्तरांची नेहमी भीति वाटते. पण त्याचबरोबर शिस्त आणि बुद्धिमत्तेचा आदरही असतो. तसे कुमारांचे गाणे ऐकताना मला वाटायचे.
आणि जसराजजींच्या गाण्याबद्दल काय बोलायचे? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचे गाणे अंगावर मोरपीस फिरवल्यासारखे. अतिशय सुरेल व गोड गळा. तितकेच प्रसन्न व्यक्तीमत्व. गातानाच्या त्यांच्या भावमुद्रा अतिशय लोभसवाण्या असत. वसंतरावांप्रमाणे सुंदर ताना. आणि हातखंडा सरगम. त्यांच्यावर काही जणांचा असा आक्षेप असे की ते फार ठाय लयीत गातात. त्यामुळे त्यांचे गाणे खूप संथ आहे. मला कळत नसल्यामुळे, हे मला फारसे मान्य नाही. माझ्यासारख्या अस्सल कानसेनाला ते गाणे ऐकताना असे वाटते कि त्यावेळी त्या ठाय लयीची गरजच आहे. रागाचा शास्त्राशुद्ध विस्तार, रंजक मांडणी आणि श्रोत्यांना गुंगवून ठेवण्याचे कसब ही त्यांची वैशिष्ट्ये. त्यांचे दुसरे मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रागातल्या बंदिशींचे बोल हे यावनी नसतात. हिंदू देवतांच्या स्तुतीपर बोल असतात. मला माहित असलेला अपवाद म्हणजे त्यांची भैरव रागामधली "मेरो अल्ला मेहेबान" ही बंदिश आणि तोडी रागामधली "अल्ला जाने अल्ला जाने" ही बंदिश. इतर असतील तर निदान मला तरी माहित नाहियेत. पण माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे यावनी बंदिशी नाहित. जर असतील तर कृपया जाणकारांनी माझ्या ज्ञानात भर घालावी ही विनंती. जसराजांचे गाणे कधीही आक्रमक वाटलेच नाही. मला ते नेहमी आईच्या मायेसारखे वाटत आले आहे. आपण दु:खात असलो की आईने पदराखाली घेतल्यावर जशी मनाला शांतता मिळते तसे, मला त्यांची मैफल ऐकत असताना आपल्याला आईने पदराखाली घेतले आहे असे मला सारखे वाटायचे. गेल्या काही महिन्यांपूर्वी हा मला अनुभव आला. माझ्यावर माझी प्रिय व्यक्ती सोडून देवाघरी जाण्याचा दु:खद प्रसंग ओढवला. त्यावेळी असाच सकाळी फिरायला गेलो असता पंडितजींचा एक नितांतसुंदर भैरव ऐकत होतो. हुबळीतली मैफल होती. ५० मिनिटांच्या त्या मैफलीत हा मला अनुभाव आला. मी पूर्णपणे स्वतःला विसरून गेलो. मी कुठे आहे, काही मला काही आठवत नाही इतका मी ब्लँक झालो होतो. मा़झे सर्व दु:ख तेव्हढ्यापुरते तरी पूर्णपणे मी विसरलो. वास्तविक भैरव हा तसा उग्र प्रकृतीचा, प्रवृत्तीचा राग. इतका उग्र राग हा इतका मुलायम होऊ शकतो यावर इतके दिवस माझा विश्वास नव्हता. त्यादिवशी तो बसला. आणि ही पंडितजींच्या मधुर रेशमी आवाजाची करामत होती.
तर असे हे चार प्राण. पांचवा प्राण अर्थात श्रोते. भारतीय शस्त्रिय संगीत या चॉघांशिवय अपुरे आहे. इतरही खूप कलाकार आहेत. त्यात प्रामुख्याने नाव घ्यायचे म्हणजे मालीनीताई राजूरकर, बेगम परवीन सुलताना, पंडित राजन साजन मिश्रा, पंडित जितेंद्र अभिषेकी, किशोरताई आमोणकर, अजय चक्रवर्ती, गुंदेचा बंधू, वीणाताई सहस्रबुद्धे, आरती अंकलीकर. ही सारी दिग्गज मंडळी आहेत. पण या सर्वात सध्या आपल्या गाण्याने श्रोत्यांवर मोहिनी घातली आहे ती अजयजींची बुद्धीवान कन्या कौशिकी चक्रवर्ती. अफाट तयारी, अतिशय सुरेल आवाज, ताल आणि सरगम वर प्रचंड प्रभुत्व या जोरावर ती खूपच लोकप्रिय झाली आहे. तिची मैफल ऐकणे हा एक प्रचंड आनंददायी आणि सुखद अनुभव आहे. विशेषतः तिचा "सुंदर ते ध्यान..." हा अभंग तर खास लोकप्रिय आहे. हा अभंग गाताना ती अमराठी आहे, तिला मराठीचा गंध शून्य आहे हे जाणवतही नाही.
असेच अनेक तरूण कलाकार आहेत की जे बर्याच जणांना ठाऊकही नाहीत. पण अफाट गुणवत्ता त्यांच्याकडे आहे. मी ऐकलेल्या काही कलाकारांपैकी गोव्याची आरती नायक ही सुरेल गायिका. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगित अलंकार (एम.ए.) ही पदवी तसेच "सूरसिंगार संसद"च्या सूरमणी पुरस्काराने सन्मानीत, वसंतराव आचरेकर सांस्कृतीक प्रतिष्ठानचा "वामनदाजी" पुरस्कार. अशी ही गुणी कलाकार. अत्यंत सुरेल आवाज, अफाट तयारी, ख्यालाची नेटकी आणि सुबक मांडणी नीटस सादरीकरण ही तिच्या गायनाची प्रमुख वैशिष्ट्ये. तिची मैफल ऐकणे हा एक निखळ आनंददायी अनुभव आहे. नाव न सांगता हिचे गाणे ऐकले तर आपण एखाद्या दिग्गज कलाकाराचे गाणे ऐकतोय असे वाटावे. हेमा उपासनी ही मी ऐकलेली आणखी एक तरूण कलाकार. सवाई गंधर्वमधले तिचे गाणे खूपच छान झाले होते.
कुठल्याही मैफलीचा शेवट हा नेहमी भैरवीने होतो. भैरवी हा हुरहूर लावणारा राग आहे. जरी त्यात गाणे संपल्याची आर्त जाणिव असली तरी अशीच मैफल पुन्हा रंगण्याची खात्रीही असते. भैरवीचे हे वैशिष्ट्य आहे. भीमसेनांची "बाबुल मोरा..." असो किंवा " हरीका भेद न पाये..." असो, वसंतरावांचे "ना मारो पिचकारी..." असो ही सर्व हुरहूर लावतात. लावतात. जसराजांचे "निरंजनी नारायणी..." आणि "माई सावरे रंगराची..."तर अतिशय आनंद-भैरवी आहेत. पण मैफलीची सांगता भैरवीने करायची नाही ही गोष्ट सहसा आढळत नाही पण गेल्या महिन्यात कौशिकीची पुण्यातली मैफल मात्र भैरवीशिवाय संपली. लोकांना ती आणखी गाईल असे वाटतानाच तिने प्रेक्षकांना नमस्कार केला आणि रंगपटात निघूनही गेली. नंतर लोकाना कळले की मैफल संपलीये.
तर ही अशी मी सदर केलेली आठवणींची एक मैफल. यात लिहिलेली ही पूर्णतया माझी मते आहेत. सर्व रसिक माझ्यामताशी सहमत असतीलच असे नाही किंबहुना नसतीलच. असे जे रसिक माझ्या मताशी सहमत नसतील अश्या सर्व रसिकांच्या बहुमूल्य मतांचा मी आदर करतो. त्या रसिकांनी आपली मते अवश्य मांडावीत. आणि हे माझे निवेदन हिच माझ्या लेखाची भैरवी आहे.
ॐ तत्सत

आरोग्यं धनसंपदा-८
मागिल काही लेखात आपण दिनचर्या आणि काही आसने पाहिली. त्या आसनांचे परिणाम आणि उपयोग मी सांगितले होते. त्यावेळी मी असेही म्हणालो होतो की प्रत्येक आसनाचा स्वतंत्ररीत्या उपयोग सांगणे कठीण आहे. मागिल लेखात जी आसने पाहीली त्यात आपण विपरीत करणी या आसनचा विचार केला नव्हता. म्हणजे ते राहून गेले नव्हते. मी ती आसने सांगताना हे आसन गाळले होते. कारण त्यात आणि शवासनात थोडासाच फरक होता. म्हणून त्याचा स्वतंत्र विचार केला नव्हता. या लेखात त्याचा विचार नंतर करुया.
या सर्व आसनांबद्दल लिहिताना त्या त्या आसनाचा उपयोग सांगितला होता. त्यावेळी मी म्हटले होते की प्रत्येक आसनाचा स्वतंत्र परिणाम सांगणे अशक्य आहे. या सर्व आसनांच्या एकत्रित परिणामाचा विचार केला पाहिजे. आणि त्यावेळी एक गोष्ट सांगितली नव्हती. ती सांगतो. ती म्हणजे ही सर्व आसने काहीही झाले नसताना , काहीही होऊ नये म्हणूनही करावीत. सर्वसाधारण स्वास्थ्यासाठीही ही आसने करावीत. सर्वसामान्य स्वास्थ्यासाठी किंवा ही आसने ज्यासाठी सांगितली आहेत त्यासाठी करताना काही शंका उपस्थित होतील. त्यासंबंधी पाहूया. सर्वप्रथम नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे आसने कधी करावीत. कुठे करावीत वगैरे.
सर्वसाधारणपणे सकाळी आसने करावीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी वातावरण स्वच्छ असते. वाहनांनी सोडलेल्या धूराचे साम्राज्य नसते, माणसांची वर्दळ अजिबात नसते. वातावरणातली धूळ जमिनीवर बसलेली असते. त्यामुळे हवा शुद्ध असते. शिवाय आपल्याकडे येणार्या लोकांची वर्दळही नसते. त्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय आपणास आसने करता येतात. संध्याकाळी वाहने माणसे यांच्या रहदारीमुळे वातावरणातले प्रदूषण वाढलेले असते. म्हणून सहसा हा योगाभ्यास संध्याकाळी करू नये. अर्थात आपला व्यवसाय, नोकरी, शिक्षण वगैरेमुळे सकाळी वेळ होणे शक्य होईल असे नाही. मग त्यांनी हा अभ्यास करायचा नाही का? करायचा. अवष्य करायचा. संध्याकाळी करायचा. मी फक्त योग्य वेळ सांगितली. मग संध्याकाळी आसने करायची असतील तर वेळ निवडताना शक्यतो अशी वेळ निवडावी की हा अभ्यास करताना कोणाचा व्यत्यय येणार नाही. तुम्ही सुरूवात केली आणि बेल वाजली, कोणीतरी आले. असे झाले की मग ते जे एक वातावरण निर्माण झालेले असते ते बिघडते. आपल्या आसनांची, आपल्या आसनात जाण्याच्या मनस्थितीची, लय बिघडते. एक मजेदार उदाहरण सांगतो. क्रिकेटची आवड असणार्यांना हे पटकन कळेल. एखादा फलंदाज सुंदर खेळत असताना मधेच शीतपेये आली की त्याची एकाग्रता भंग पावते, लय सुटते आणि तो नंतर लगेचच बाद होतो. तशी आपल्या मनाची एकाग्रता भंग पावते. दुसरी गोष्ट म्हणजे जिथे आपण हा अभ्यास करणार ती खोली बर्यापैकी मोकळी असावी. हवेशीर असावी. त्यात खेळती हवा असावी. कसे आहे की पंखा लावला की हवा खेळेल की. पण जर खोलीत सामानाची फार गर्दी असेल तर पंखा लावूनही हवा खेळती राहणार नाही. जरी खिडक्या असल्या तरी. आता, १ बीएचके, २ बीएचके च्या युगात हे जरा कठीणच आहे हे मला मान्य. पण नक्की काय असावे हे जर कळले तर आपण त्या दिशेने त्यातल्यात्यात साध्य करण्याचा प्रयत्न करू शकू. कोणत्याही योगाभ्यासात शरीर आणि मन याला महत्त्व आहे. आणि म्हणून या योगाभ्यासाचा मानसिक आणि शारीरीक आनंद, जर हा अभ्यास विनाव्यत्यय झाला तर घेता येईल आणि त्याचा योग्यतो उपयोग होईल. हा योगाभ्यास करताना शांतता असावी. संगित ऐकत योगासने करू नयेत. आणि संगित हवेच असेल तर ते इतपत असावे की कानावर काहीतरी सूर पडत आहेत. पण ते काय आहेत ते कळत नाहीये. भाजी आमटीतल्या मिठासारखे आहे हे. मीठ जास्त झाले तर पदार्थाचा आस्वाद घेता येणार नाही. त्या मिठाकडेच लक्ष जाईल. पण जर मीठ योग्यप्रमाणात असेल तर त्यामिठाचे अस्तित्व जाणवणार नाही. पण पदार्थाचा आस्वाद घेता येईल. संगीत वाद्य संगीत असावे. कंठ्य संगीत असू नये. कारण मग आपल्या शरीरावर लक्ष न राहता त्या संगितावर लक्ष केंद्रित होईल. मंद आवाजात रवीशंकरांची सतार, किंवा हरीप्रसादांची बासरी, किंवा शिवकुमारांचे संतूर असे असावे. की ज्यायोगे वातावरणही प्रसन्न असेल आणि आपल्याला आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. जे या अभ्यासच्या परिणामाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.
दुसरा प्रश्न मम्हणजे पोषाख काय असावा. महत्त्वाचे म्हणजे पोषाख हा सैलसर असावा. पुरूषानी "टी शर्ट" आणि ट्रॅक सूट पेहेरावा. स्त्रियांनी पण असाच पोषाख करायला हरकत नाही. पण याला पर्याय म्हणून सलवार कुडता हरकत नाही. बाकी इतर साहित्य त्यात्या आसनात आले आहेच.
तिसरा लोकप्रिय प्रश्न म्हणजे काय खावे. म्हणजे या व्यायामाआधी खाल्ले तर चालेल का? त्याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्हीही आहे. कसे ते सांगतो. खाल्ले तर चालेल. कारण या सर्व स्थिती स्थिर अवस्था असल्याने खाण्याचा संबंध येत नाही. पण खाल्ले तर सामान्यपणे आपल्या मनावर पेंग येते. झोप लागण्याची शक्यता असते. म्हणून खाऊ नये. पण खायचेच असेल तर त्याला पर्याय असा की हा अभ्यास करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर हलका आहार घ्यावा.
नंतरचा येणारा प्रश्न म्हणजे किती वेळ आसने करावीत? खरे तर याचे निश्चित उत्तर देणे अवघड आहे. सर्वसामान्यपणे ढोबळमानाने रोज तासभराचा सराव करावा. आणि प्रत्येक आसनाला कमीतकमी १५ मिनिटे तरी द्यावीत. आता १५ मिनिटे दिल्यास तासात ही सर्व आसने बसणार नाहीत. मग तासाभरात आसने करून मग १० मिनिटे शवासन करावे. हे वेळेचे गणित ज्याचे त्याने ठरवायचे आहे. तुम्हाला उपलब्ध असलेला वेळ, आणि हा योगाभ्यास करण्याची तुम्हाला कितपत गरज वाटते आहे, किती निकड आहे त्यावर हे अवलंबून आहे. कशाला प्राधान्य द्यायचे - आपल्या प्रकृतीला की काम आणि पैसा याला हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.
आणि आता थोडेसे विपरित करणी या स्थितीबद्दल पाहूया. बरीचशी शारीरीक दमणूक झाली कि या आसनात बरे वाटते. तसेच उच्च रक्तदाब असणार्या व्यक्तींना रक्तदाब वाढलेल्या काळात या आसनात आराम मिळतो. या आसनात कसे जायचे हे दाखवणारी दोन चित्रे दिली आहेत. त्या चित्रावरून सहज कळेल की त्या अवस्थेत कसे जायचे. बाकी इतर माहिती मागील लेखात आली आहे. म्हणून फक्त चित्रे इथे दिली आहेत.
या अवस्थेत १५ मिनिटे ते अर्धा तासपर्यंत राहता येते. शरीर अणि मनावर आलेला थकवा, मरगळ याने दूर होण्यस मदत होते. चांगली विश्रांती मिळते. ह्रदयविकार असणार्या व्यक्तींना गुरुत्वाकर्षणामुळे ह्रदयावर येणारा ताण या आसनात कमी होतो.
या पुढील लेखात आपण पुन्हा एकदा दिनचर्या, पथ्यापथ्य यावर चर्चा करू.
॥ ॐ तत्सत् ॥
॥ जय श्रीराम ॥

आरोग्यं धनसंपदा-७
मागच्या दोन लेखात आपण काही आसने पाहिली. ती सर्व आसने ही विश्रांतीची आसने समजली जातात. आणि त्यावेळी मी म्हटले होते की या विश्रांतीच्या आसनांचा राजा म्हणता येईल असे आसन म्हणजे शवासन. आपले आयुष्य आनंदी करायचे असेल तर शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळाली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की झोपेत शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळेलच की. पण तसे नाहीये. झोप ही नेहमी अनियंत्रीत असते. झोपेत शरीर आणि मनावर ताबा ठेवता येत नाही. आणि म्हणून झोप हा विश्रांतीचा हुकूमी एक्का ठरू शकत नाही. शास्त्राशुद्ध पद्धतीने केलेले शवासन शरीर आणि मनावरचा ताण काढून टाकण्यात प्रभावी ठरते.
शवासनात आपण शरीर आणि मनावर लक्ष ठेवत असल्याने पूर्णपणे जागे असतो. हाच झोप आणि शवासन यातला फरक आहे. शवासन ही नियंत्रित आणि विचारपूर्वक शरीराला, मनाला दिलेली विश्रांती आहे. हठयोग प्रदिपीकेत म्हटलय की :
उत्तानं भूमॉ शयनं शववत् तद् शवासनम् ॥
शवासनं शांतीहरं चित्त विश्रंतीकारकम् ॥
एक गोष्ट ध्यानात ठेवावी की शवासन हे दिसयला खूप सोपे पण करायला अतिशय कठीण आसन आहे. \"त्यात काय मोठेसे? नुसते पडून तर राहायचे आहे." इतके ते सोपे नाहिये. आता आपण प्रत्यक्ष शवासन कसे करायचे ते पाहू. यात नेहमीप्रमाणे साहित्या, कृती, परिणाम वगैरे पद्धतीने पाहू.
साहित्य :
दोन ब्लँकेट, ऊशी, दोन विटा.
कृती :
दिलेले साहित्य सर्व एकदम वापरायचे नाही. निरनिराळ्याप्रकारचे साहित्य वापरून आप्ल्य शरीरास जे योग्य वाटेल, चालेल त्याप्रमाणे सहित्य निवडायचे आहे. दोन ब्लँकेट, दोन विटा, एक ब्लँकेट आणि एक उशी, एक ब्लँकेट आणि एक वीट किंवा नुसते एक ब्लँकेट अश्या निरनिराळ्याप्रकारे सहित्याच्या रचना करून शवासन करता येते. त्यापैकी दोन ब्लँकेटवर हे आसन कसे करायचे ते पाहूया.
एका ब्लँकेटची लांबीच्या बाजूने तिहिरी घडी करा. भिंतीपासून तीन फूट अंतर सोडून ब्लँकेट भिंतीला काटकोनात ठेवा.दुसर्या ब्लँकेटची रूंदीच्या बाजूने तिहेरी घडी करून ती घडी पहिल्या ब्लँकेटवर एका टोकाला इंग्रजी 'टी' अक्षरासारखी काटकोनात ठेवा. आणि चित्रात दाखवल्यासारखे बसा.( चित्र क्र.१) पाय गुडघ्यात वाकवून उभे करून ठेवा. हाताचे तळवे मागे जमिनीवर टेकवा. नंतर कोपरे जमिनीवर टेकवत संपूर्ण पाठ ब्लँकेटवर टेकवा. कुल्ले किंचीत उच्लून पायाकडे किंचित ढकलत जमिनीवर आणा.दोन्ही पावलात साधारण एक फूटाचे अंतर ठेवा. पावलाच्या करंगळ्या जमिनीकडे आणायचा प्रयत्न करा.दोन्ही हात आपल्या शरीरापासून सुमारे फूटभर अंतरावर ठेवा. हाताचे तळवे आकाशाकडे. बोटे पसरलेली. हाताचे आंगठे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. (चित्र क्र.२) डोळ्याच्या पापण्या, वरची पापणीखाली आणत डोळे हळूवार मीटा. ओठ थोडेसे विलग, जीभ जबड्यात सैल सोडा. श्वासोत्श्वास हा नैसर्गिक चालू द्या. ही स्थिती १० ते १५ मिनिटे ठेवा.
आसनातून बाहेर येताना प्रथम हात दुमडून छातीवर घ्या, पाय दुमडून पोटाजवळ घ्या. सावकाशपणे ऊजव्या कुशीवर वळा. कुशीवर वळताना तुम्ही पाठीखाली जे काही घेतले असेल त्यावरून पूर्णपणे खाली या. नंतर सावकाश पोटावर पालथे वळा. हात आणि पाय लांब ताणून द्या आणि मग आपले तळहात आणि गुढगे यांचा वापर करत सावकाश ऊठून बसा.
परिणाम आणि चिंतन :
आपण मागे पाहिलेच आहे की या आसनामुळे शरीराचा थकवा दूर होतो आणि मनाला शांती मिळते. प्रत्यक्ष या आसनात आपण १५ मिनिटे असताना काय करायचे आहे ते पहा.
डोळे मिटल्यानंतर सर्वप्रथम आपल्या खोलीबाहेरून येणारे आवाज ऐका. आपल्या खोलीतले आवाज ऐका. आपल्या श्वासावर आपले लक्ष केंद्रित करा.ञानंतर आपल्या शरीराची जाणिव होते आहे का ते पहा. आपल्या शरिराचे कोणते अवयव जमिनीला टेकलेले आहेत त्ते स्पर्शाने जाणवते का ते पहा. म्हणजे आपले शरीर जमिनीवर कसे पडले आहे त्याची जाणिव त्या स्पर्शातून होइल. कोणता अवयव कमी जास्त टेकला आहे ते जाणवेल. नंतर सर्व अवयव शिथील करण्याचा सराव करा. बंद डोळ्यापुढे असे दृश्य आणा की आपल्याला जो अवयव शिथील करायचा आहे त्या अवयवातून आपला श्वास बाहेर पडतोय अशी कल्पना करा. प्रत्यक्ष श्वास हा नाकातूनच बाहेर पडणार आहे. आपल्याला फक्त कल्पना करायची आहे. ट्यमुळे तुम्ही ज्या अवयवातून श्वास बाहेर पडतोय अशी कल्पना कराल, ते ते अवयव शिथील होऊ लागतील. यात गुडघे, कोपरे. खांदे,कमरेतले खुब्यातले सांधे शिथील होतील. नाभी हळू हळू जमिनीकडे ढकलत उदरपोकळिचे स्नायू ढिले करा. सर्व शारीरीक क्रिया शांत झाल्यावर श्वासावर लक्ष केंद्रित करा.
मागील दोन लेखात सांगितलेली आणि शवासन असे मिळून रोज केल्यास शरीर आणि मनावरचा ताण नाहीसा होइल. या पांच आसनांचा संच सर्वसाधारण स्वास्थ्यासाठी वापरावा.
यापुढील लेखत आपण पुन्हा दिनचर्या याबद्दल पाहणार आहोत.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)