आरोग्यम् धनसंपदा
मागच्या लेखात आपण दोन आसनांचा विचार केला होता. ती म्हणजे सुप्तवीरासन आणि सुप्तबद्धकोनासन. आज आपण पुढील आसने बघणार आहोत. आजच्या लेखात आपण विपरितदंडासन, सेतुबंध सर्वांगासन आणि शवासन यांचा विचार करण्याचा प्रयत्न करुया. प्रयत्न म्हणालो इतक्यासाठीच की यातल्या शवासनाचा विचार करताना बर्याच इतर गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. म्हणून कदाचित शवासन पुढील लेखात पहावे लागेल. पुन्हा एकदा मागे सांगितलेल्या गोष्टीची आठवण करून देतो. आणि ती म्हणजे या पाचही आसनांचे एकत्रीत परिणामांची चर्चा सर्वात शेवटी करू.
विपरितदंडासन :
हे आसन तीन प्रकारने करता येते. तिन्ही प्रकारात वेगवेगळी अनुभूती येते. कारण या तिन्ही प्रकारात शरीराच्या अवस्थेत थोडा थोडा फरक होतो. आणि तितका थोडासा फरक वेगळा परिणाम साधण्यास, वेगळी अनुभूती देण्यास पुरतो. अजून एक गोष्ट. विपरीत म्हणजे उलट. आपण नेहमी उभे राहतो. तेंव्हा आपले डोके छातीच्या वर असते. परंतु हे आसन केल्यानंतर आपल्या डोक्याची अवस्था ही छातीच्या पातळीच्या खाली जाते. जवळ जवळ शीर्षासनासारखी स्थिती होते. चित्र पाहिल्यावर हे अधिक स्पष्ट होईल.
प्रकार १ : जमिनीवरील विपरितदंडासन
साहित्य : लोड, उशी, ब्लँकेट
कृति : लोड आणि उशीची रचना चित्रात दाखवल्याप्रमाणे करा.( चित्र क्र.१) म्हणजे उशी आडवी आणि त्यावर लोड उभा. म्हणजे वरून पाहिले तर + खुणेसारखी रचना व्हायला हवी. चित्र क्र.१ मधे दाखवल्याप्रमाणे ब्लँकेटची तिहेरी घडी करून ती लोडापुढे ठेवा. नंतर त्या लोडावर बसा.(चित्र क्र.२) गुडघ्यात पाय थोडेसे दुमडून ठेवा. हाताचे तळवे जमिनीवर टेकून कोपरे जमिनीवर आणा. आणि हळू हळू लोडावर झोपत पाठ लोडावर टेकवा आणि खांदे ब्लँकेटच्या घडीवर आणा. पाय सरळ करा. हाताचे तळवे छताकडे, कोपरे जमिनीवर टेकलेली आणि पावले उभी आणि जमिनीला काटकोनात.(चित्र क्र.३) या स्थितीत किमान १० मिनीटे पडून रहा.
या आसनावस्थेतून बाहेर येताना पाय गुढघ्यात दुमडा,हात कोपरात दुमडून छातीवर घ्या, ऊजव्या कुशीवर वळत लोडावरून खाली या, हात पाय लांब करत ताणून द्या आणि उठून बसा.
फायदे आणि परिणाम : छातीचा पिंजरा डोक्याच्याबाजूला जमिनीकडे कललेला असल्याने काही फासळ्या पायाकडे, काही वर्तुळाकार आणि काही मानेकडे ताणल्या जातात. उदरपोकळी जमिनीला समांतर राहते. पाठीचा कणा "विपरीत" दिशेने वक्र झाल्याने उदरपोकळीत साठलेले रक्त शुद्धिकरणासाठी विनासायास फुफ्फुसाकडे व ह्रदयाकडे जाऊ शकते. फासळ्या उघडल्यामुळे फुफ्फुसाच्या प्रसरणाला अधिक जागा मिळते आणि श्वासोश्वास सुलभ होण्यास मदत होते.
प्रकार २ : खुर्चीवरचे विपरितदंडासन - १
यात जमिनीवरच्या आसनापेक्षा यात पाठीच्या कण्याला वक्रता अधिक येते.
साहित्य : दोन लोड, उशी, ब्लँकेट, खुर्ची.
कृति : खुर्ची, दोन लोड व ब्लँकेटची चित्रात दाखवल्याप्रमाणे रचना करा. खुर्चीसमोर दोन लोड एकमेकांवर ठेवा. त्यावर ब्लँकेटची तिहेरी घडी ठेवा.(चित्र क्र.४) खुर्चीवर चित्रात दाखवल्याप्रमाणे पाय आत घालून बसा.(चित्र क्र.५) नंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे गुढघ्यात पाय दुमडून पाय आणि मांड्या यांचा काटकोन करा. आणि खुर्ची हाताने धरून ठेवत पाठीवर झोपत शरीर ब्लँकेटच्या दिशेने न्या. खांदे ब्लँकेटवर ठेवा. खुर्चीच्या आतील बाजूने हात घालून खुर्चीचे मागचे पाय धरा. छातीच्या तळापासून खुब्यापर्यंतचे शरीर खुर्चीच्या बैठकीवर आणि मान उशीवरून जमिनीकडे तिरकी ठेवा.(चित्र क्र.६) ही आसन स्थिती आपल्याला सहन होईल त्याप्रमाणे ५ मि. ते १० मि. ठेवा.
आसनातून बाहेर येताना हात बाहेर काढून खुर्चीची पाठ धरा, खांदे कोपरातून उचलत खुर्चीत सावकाश ऊठून बसा. व खुर्चीतून बाहेर या.
फायदे आणि परिणाम : लोडावरील आसनापेक्षा या स्थितीत शरीराला बाक अधिक मिळतो. छातीचा पिंजरा सर्व बाजूने उघडल्यामुळे फुफ्फुसाच्या प्रसरणाला अधिक जागा मिळते.
प्रकार २ : खुर्चीवरचे विपरितदंडासन - २
साहित्य : ब्लँकेट, खुर्ची.
कृति : यात वरील प्रकार १ पेक्षा फार फरक नाही. खांद्याखालचे दोन्ही लोड काढून टाकलेले आहेत.(चित्र क्र.७) डोक्याचा माथा ब्लँकेटवर टेकल्यावर दोन्ही हाताचे कोपरे खुर्चीच्या विरूद्ध दिशेला जमिनीवर टेकवून हाताचे तळवे डोक्यामागे ठेवा आणि बोटे एकमेकात गुंतवा. अशी आसनस्थिती ३ ते ५ मि. ठेवा. नंतर वर सांगितल्याप्रमाणे बाहेर या.
फायदे आणि परिणाम : या आसनात पाठीच्या कण्याला ताण बसल्यामुळे आणि छातीचा पिंजरा सर्वाधिक प्रसरण पावल्यामुळे फुफ्फुसे व ह्रदय यांची कार्यक्षमता वाढते तसेच ऊदरपोकळीचेही प्रसरण झाल्यामुळे तेथील अवयवांची क्षमता वाढते.
सेतुबंध सर्वांगासन :
साहित्य : लोड, ब्लँकेट
कृति : लोड उभा ठेवून त्यामागे ब्लँकेटची तिहेरी घडी आडवी ठेवा.(चित्र क्र.८) ब्लँकेटच्या विरूद्ध दिशेला तोंड करून पाय गुढग्यात दुमडून लोडावर बसा.(चित्र क्र.९) दोन्ही हातानी लोड धरून ठेवून त्यावर हळूहळू उताणे झोपा. झोपताना खांदे जमिनीवर आणा. मान व डोके ब्लँकेटवर आणा. पाय सरळ करा. हात शरीराला काटकोनात ठेवून तळवे आकाशाकडे करा.(चित्र क्र.१०) ५ ते १० मि. या स्थितीत पडून राहिल्यावर हात कोपरात दुमडून छातीवर घ्या, पाय गुढघ्यात दुमडून पोटाजवळ घ्या. ऊजवीकडे वळत लोडावरून खाली येत कुशीवर वळा आणि उठून बसा.
फायदे आणि परिणाम : या आसनात उदरपोकळी जमिनीला समांतर राहते. छातीचा आकार वक्राकार झाल्याने सर्व फासळ्या ताणल्या जातात. त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. मान व डोके जमिनीला समांतर राहिल्याने मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो.
हे आसन विश्रांतीचे आहे. याचा अभ्यास संध्याकाळी अवश्य करावा. दिवसभराचा थकवा याने दूर होतो व मेंदू ताजातवाना होतो. ह्रदयविकार असणार्या व्यक्तिंना संपूर्ण शारिरीक आणि मानसिक विश्रांती या आसनात मिळते.
पुढील लेखात आपण शवासनाचा विचार करू.
शनिवार, २५ जुलै, २००९
आरोग्यं धनसंपदा-५

आरोग्यं धनसंपदा
मागच्या लेखात मी म्हटले होते कि आपण पांच सोप्या आसनानी सुरूवात करूया. पण त्यात अजून एक आसन मी वाढवणार आहे. त्यामुळे आपण आता सहा आसनांचा विचार करणार आहोत. पण त्याआधी पुन्हा एकदा काही गोष्टींची आठवण करून द्यावीशी वाटते. एक म्हणजे प्रत्येक आसनाचा स्वतंत्र परिणाम सांगणे अवघड आहे. फारफारतर तुम्हाला काय जाणवेल हे सांगता येईल. याचा उपयोग काय हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. उदा. तिखटाची चव आपल्याला ठाउक आहे. पण भाजीत किंवा आमटीत तिखट का घालायचे याचे समाधानकारक उत्तर देता येणार नाही. फक्त चव येण्यासाठी इतकेच सांगता येईल. तसे आहे हे. सुप्तवीरासन केल्यावर काय जाणवेल हे सांगता येइल. उपयोग? नेमकेपणा अवघड आहे. कारण हा त्या चार पांच आसनांचा एकत्रित परिणाम आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहसा ही सर्व आसने कोणत्यातरी जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली करावी. म्हणजे गुरू पाहिजे. मग आपले काही चुकत नाही ना याची खात्री होते. आपल्या आसनावस्थेत काही सुधारणा हवी आहे का तेही समजते. आणि हवी असेल तर ती करता येऊ शकेल. समजा एखादा मुलगा शाळेत न जाता वर्षानुवर्षे तीच तीच उदाहरणे घरी सोडवत आहे. अगदी मन लाऊन अभ्यास करत आहे. पण ५ वी च्यापुढे काही जात नाही. कां? तर तो काय सोडवतो आहे, ते बरोबर आहे का ते पाहायला कोणी नाही. म्हणून या योगाभ्यासाला गुरू हवा. "आम्ही घरी करतो ना. अगदी नेमाने करतो." असे म्हणणारे खूपजण भेटतात. पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या काहीना काही छोट्या छोट्या तक्रारी चालूच असतात की हे असच होतय आणि तेच दुखतय वगैरे वगैरे. जर घरी करतोय तर मग असे का होतं? बरं तर वाटलच पाहिजे. पण वाटत तर नाही. कां? प्रमुख कारणे दोन. एक म्हणजे घरी करतो म्हणून घरी करणे होत नाही. व्यवधाने बरीच. अडथळे खूप. आज अमुक अमुक ठिकाणी जायचे आहे. योगाला सुट्टी. आज काय साखरपुड्याला जायचे आहे, बारश्याला जायचे आहे. सुट्टी. अश्या सुट्ट्या खूप आणि योग कमी अशी अवस्था होते. दुसरे म्हणजे तो म्हणतो त्याप्रमाणे खरंच घरी करत असतो. पण ते चूक की बरोबर हे तपासून पाहीले जात नाही. मी मागच्या लेखात म्हटले होते की आसन नीट झाले नाही तर अपाय होणार नाही. पण उपयोगही होणार नाही. आणि म्हणून आपण जे आसन करत आहोत ते योग्य आहेना, कुठे चुकत तर नाही ना, आसनस्थितीत कुठे बदल हवा आहे का हे तज्ञाने पाहणे गरजेचे आहे.
यानंतरच्या काही लेखात आपण प्रामुख्याने सुप्तवीरासन, सुप्तबद्धकोनासन, विपरितदंडासन, सेतुबंध, विपरितकरणी, आणि शवासन या आसनांबद्दल पाहू. सर्वसाधारणपणे यासाठी लागणारे साहित्य, कसे करायचे याची आकॄतीसह कॄती, आणि नंतर त्याचा ढोबळमानाने परिणाम आणि उपयोग असा क्रम राहिल. या गटातली सर्व आसने विश्रांतीच्या अवस्थेतली आहेत.शरीराला सर्वाधिक विश्रांति हे शरीर आडव्या अवस्थेत असताना मिळते. ही सर्व आसने झोपून स्थितितली आहेत, तेंव्हा ज्या व्याधित विश्रांतीची गरज आहे अश्या व्याधित ही आसने जास्त उपयोगी आहेत्.उद. ह्रदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब वगैरे की ज्यात नुसते पडून राहण्याने आराम मिळतो.
सुप्तवीरासन :-
हे आसन जमिनीवर झोपून करायचे आहे. पण ज्याना जमिनीवर बसणे, झोपणे कठीण जाते त्यांना घरातील दिवाण,बाक किंवा स्टीलची खुर्ची यांचा आधार घेऊन हे करता येईल.
साहित्य/साधने - लोड व उशी ( हे दोन्ही कापसाचे असावे. फोम किंवा कॄत्रिम धाग्याचे नको.), एक ब्लँकेट किंवा जाड सुती सोलापुरी चादर, बाक, दिवाण किंवा सोफा, खुर्ची वगैरे.
रीत - सर्वप्रथम जमिनीवरील आसनाचा विचार करू. जमिनीवर सतरंजी घालून त्यावर लोड ऊशी, ब्लँकेट याची चित्रात दाखवल्याप्रमाणे एखाद्या शिडीसारखी रचना करावी. (चित्र क्र. १) लोड भिंतीला टेकून ठेवावा म्हणजे त्यावर झोपताना तो मागे सरकणार नाही. लोडासमोर त्याच्या विरूद्ध बाजूला पाय करून बसावे. दोन्ही हात मागे नेऊन हातानी लोड धरून ठेवावा. (चित्र क्र. २) आणि कुल्ल्याचा खालचा भाग जमिनीवर, कंबर लोडावर, पाठ व छातीचा पिंजरा उशीवर आणि मान व डोके ब्लँकेटच्या घडीवर येईल अश्या तर्हेने त्यावर उताणे झोपावे.(चित्र क्र. ३) पाय लांब, ताठ सरळ ठेवावेत, पावलात साधारणपणे एक फूटाचे अंतर ठेउन पावले उभी, जमिनीला काटकोनात व समांतरअसावीत.
आता जर खाली झोपणे अवघड असेल तर काय करायचे ते पाहू.
भिंतीपासून दोन फूटावर बाक भिंतीला काटकोनात ठेवा. लोड उशी आणि ब्लँकेट चित्रात दाखवल्याप्रमाणे ठेवा. (चित्र क्र.४) बाकाच्या कडेवर बसा. (चित्र क्र.५) दोन्ही हाताने लोड धरून कंबरलोडावर टेकवतत्यावर झोपा. पाय लांब करा. टाचा जमिनीवर टेकून पावले भिंतीवर टेकवा.आसनात स्थिर झाल्यावर हात दुमडून डोक्याच्यामगे ठेवा. (चित्र क्र. ६)
या दोनही आसनस्थित सुमारे १० मिनीटे राहवे.
फायदे आणि परिणाम : यात छातीचा पिंजरा जमिनीला समांतर राहतो. साहित्याच्या रचनेमुळे पिंजरा दोन्हीबाजूनी ताणला जातो. पाठीला आधार मिळाल्यामुळे छातीचा पिंजरा विस्तारला जातो. ह्रदयाच्या आकुंचन प्रसरणाला पुरेशी जागा उपलब्ध होते. फुफ्फुसाच्या प्रसरणाला पूर्ण स्वातंत्र्य मिळून त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
सुप्तबद्धकोनासन :-
हे आसन जमिनीवर झोपूनच करायचे आहे.
साहित्य/साधने - लोड व उशी ( हे दोन्ही कापसाचे असावे. फोम किंवा कॄत्रिम धाग्याचे नको.), एक ब्लँकेट किंवा जाड सुती सोलापुरी चादर सुई पांढरा पट्टा.
रीत :- यात साधनाची मांडणी ही सुप्तवीरासनाप्रमाणेच करायची आहे. (चित्र क्र. १) लोडापुढे बसताना चित्रात दाखवल्याप्रमाणे पाय दुमडून पायाचा नमस्कार घालयचा सआणि तो सुटू नये म्हणून पट्टा बांधून ठेवायचा. (चित्र क्र. ७) मांड्याची मागची बाजू जमिनीलाटेकवण्याचा प्रयत्न करा. मांड्या नाही टेकल्या तर त्याखाली गुडघ्याच्याखाली चादरीची घडी किंवा उशीचा आधार द्या. आअणि दोन्ही हातानी लोड धरून सुप्तवीरासनाप्रमाणेच कंबर, पाठ मान डोकी टेकवत लोडवर झोपा. (चित्र क्र. ८) हात शरीराशी काटकोनात ठेवा. (चित्र क्र. ८) या अवस्थेत किमान ५ मिनिटे ते १० मिनिटे थांबा.
फायदे आणि परिणाम : या आसनात पायाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो, आणि उदरपोकळी आणि चातीच्या पिंजर्याकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो. ह्रदयाला विश्रांती मिळते. अन्नपचनही नीट होण्यास मदत होते.
पुढील लेखात उरलेल्या चार आसनांचा विचार करु.
ह्रदयविकार, अस्थमा, रक्तदाब,पोटाचे विकार, मणक्याचे विकार, मधुमेह, कंपवात, संधिवात इत्यादी आजारांवर पुण्यात कबीरबाग मठ संस्थेत उपचार केले जातात. तिथे पुण्याबाहेरील रूग्णाची राहण्याची सोयही केली जाते. ज्याना कोणाला योगावर आधारीत संजीवन उपचार घ्यायचा आहे त्यानी खालील पत्त्यावर संपर्क साधून चौकशी करावी. तसेच ज्यांना या क्षेत्रात अभ्यास करून स्वतंत्रपणे योगचिकित्सक म्हणून काम करण्याची इच्छा आहे अशांसाठी योगोपचाराचे शास्त्राशुद्ध शिक्षण देणारा अभ्यासक्रम संजीवन योग फाउंडेशनने सुरु केलेल आहे. हा अभ्यासक्रम योगतत्त्वज्ञान, पाश्चात्य वैद्यक (ऍलोपाथी), आयुर्वेद, योग प्रात्यक्षिके यावर आधारित आहे. हया अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा आहे. हा अभ्यासक्रम दर वर्षी जुलै महिन्यात सुरू होतो. या अभ्यासक्रमाच्या माहितीसाठीसुद्धा खालील ठिकाणी संपर्क साधावा.
संजीवन योग फाउंडेशन
कबीरबाग मठ संस्था
५१, नारायण पेठ
पुणे ४११ ०३०
दूरध्वनी : ०२०-२४४५०१८१, २४४८४४२३, २४४८०४२४
फॅक्स : ०२०-२४४८१९३७
इ मेल : drkarandikar@hotmail.com
ॐ तत्सत
जय श्रीराम

आरोग्यं धनसंपदा-४
मागच्या लेखात मी दिनचर्या आणि ऋतुचर्या यावर लिहिले होते. त्यात आपण आजच्या युगास पोषक दिनचर्या कशी असावी हे पाहिले होते. आजच्या लेखात मानवी मन, त्याचा शरीराशी संबंध व त्याअनुशंगाने संपूर्ण स्वास्थ्यासाठी योगाभ्यास याचा विचार करू.
मी मागे म्हटल्याप्रमाणे मानवी मन ही अतिशय क्लिष्ट व समजण्यास अवघड गोष्ट आहे. माणसाच्या मनात काय विचारांची आंदोलने आहेत ते फक्त त्या व्यक्तिलाच समजेल. दुसर्या व्यक्तिला त्या व्यक्तिच्या चेहेर्यावरून, बोलण्याच्या पद्धतीवरून, लिहिण्याच्या पद्धतीवरून, अक्षराच्या वळणावरून, स्वाक्षरी करण्याच्या पद्धतीवरून मनातले विचार हे थोड्याफार प्रमाणात समजू शकतात. पण ते निश्चित नाही. ते म्हणजे हवामानखात्याच्या अंदाजासारखे आहे. मानवी मन एखाद्या बॅंकेच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्टसारखे आहे. तो व्हॉल्ट फक्त त्याच्या मालकालाच उघडता येतो. आणि त्यात काय आहे हे फक्त त्या मालकालाच माहित असते. बँकेच्या व्हॉल्टमधे प्रथम बँक किल्ली लावून पहिले कुलूप उघडते आणि नंतरच मग तो व्हॉल्ट फक्त मालकाच्या किल्लीनेच उघडतो. इथे तसे नाहीये. फार फार तर इतपत म्हणता येईल की इथे मानवी मनाच्या बाबतीत मनोविकारतज्ञ आपल्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या किल्लीने तुमच्या मनाचे पहिले कुलूप उघडण्याचा प्रयत्न करतो. मी प्रयत्न अश्यासाठी म्हणतो कि ते मनाचे कुलूप उघडले जाईल याची खात्री नसते. अंधारात तीर मारण्यासारखे आहे ते. कारण काही व्यक्ती आपल्या मनाची दारे इतक्या घट्ट बंद करतात की कोणत्याही किल्लीने ती दारे उघडत नाहीत.
हे असं का होते? तर त्याला निश्चित कारणे नाहीत. ३+२=५ असे वैज्ञानिक गणिती उत्तर त्याला नाही. पुष्कळ कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून एखादी व्यक्ती स्वतःभोवती एक अभेद्य भिंत बांधते. अनियमीत दिनचर्या, अनियमित आहार, जेवणाच्या अनियमित वेळा, विश्रांतीचा आभाव, कॉटुंबिक समस्या, कामाचा ताण आणि त्यामुळे येणार्या कार्यपद्धतीच्या समस्या अश्या अनेक कारणांनी मनाचे संतुलन बिघडते. त्या व्यक्तिची जडण घडण कशी आहे, स्वभाव कसा आहे, तो स्वभाव लहानपणापासून कसा आणि कोणत्या वातावरणात विकसित झाला आहे, त्यावर कोणते संस्कार झाले आहेत, कॉटुंबिक वातावरण कसे आहे त्यावर त्याच्या मनोकोषाची जडण घडण, त्याची अभेद्यता अवलंबून आहे. निरोगी, निरामय, आनंदी व्यक्तिच्याबाबतीत हा मनोकोष, ही भिंत त्रासदायक ठरत नाही.
मागच्या लेखात मी म्हटलं होतं की शरीर हे वस्तूरूप आहे. पण मन मात्र तसे नाही. ते वस्तूरूप नाही. त्याला आकार नाही. जडत्व नाही. ती एक उर्जा आहे. पंचेंद्रिये, पंचकर्मेंद्रियेही भॉतिक आहेत. त्यांच्या संरचनेत अडथळा आला की शारीरीक व्याधि निर्माण होतात. व्याधी हे 'विघटन' या शब्दाचे रूप आहे. आणि या संरचनेत बदल होण्याची पूर्वसूचना मनाला, चित्ताला मिळते. चित्त तुमच्या मेंदूत धोक्याची घंटा वाजवतं. पण आपण कामाच्यामागे आणि पैश्याच्या मागे पळण्याच्या नादात या धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करतो. मग शारीरीक व्याधि, दु:ख व त्यातून मानसिक अशांतता निर्माण होते.
मन ही एक उर्जा आहे. म्हणून ती प्रवाही आहे. तिचा निश्चित मार्ग आहे. योगशास्त्रात या उर्जेला 'चित्त' म्हणतात. आणि या उर्जेच्या नैसर्गिक संचाराला 'वृत्ति' म्हणतात. आणि या नैसर्गिक संचारात, त्याच्या मार्गात बाधा आली, अडथळा आला कि मग व्याधिची निर्मिती होते. ही वृत्ति म्हणजे उर्जेची नैसर्गिक ओढ. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे व कर्मेंद्रियाचे कार्य हे एक उर्जेवर चालते. त्या इंद्रियाची विशिष्ट विषयाकडे नैसर्गिक ओढ असते. जसे शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध या विषयांकडे अनुक्रमे कान, त्वचा, जिभ, डोळे व नाक यांची नैसर्गिक ओढ आहे. मग तो विषय आणि इंद्रिय याबरोबर मन आले, सुख-दु:ख या संवेदना आल्या. सुख ही अनुकूल आणि दु:ख ही प्रतिकूल संवेदना आहे. आणि दु:ख या संवेदनेमुळे व्याधी शरीरात आली हे जाणवते.
दु:ख या संवेदनेची जाणिव त्या व्यक्तिला बर्याच आधी झालेली असते. डॉक्टरना ते जाणवेलच असे नाही. पण मनाला ती जाणिव मात्र होते. पण त्यातून मार्ग काढण्याची मनाची क्षमता नाही. ती क्षमता बुद्धिची आहे. सार-असार म्हणजे चांगले वाईट बुद्धिला समजतं. पण एकट्या बुद्धीचं ते काम नाही. मग यातून मार्ग काढण्यासाठी मन व बुद्धी एकमेकांशी समन्वीत झाल्या पाहीजे. एकत्र आल्या पाहिजेत. त्याला "चित्ताचे समत्व" म्हणतात. व्याधि ही मनोव्यथा या अवस्थेत असतानाच त्यावर वार झाला पाहिजे. म्हणजे व्याधि समूळ जाईल. आणि योगशास्त्राने हे शक्य आहे. यालाच योगशास्त्र "चित्तवृत्ती निरोध" असं म्हणतं.
आणि हा वृत्तीनिरोध, अभ्यास आणि वैराग्य याच्या सहाय्याने करता येईल असे महामुनी पतंजली म्हणतात. यातील वैराग्या क्षणभर बाजूला ठेवूया. कारण हा आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या कक्षेतला विषय नाही. पण अभ्यास मात्र शक्य आहे. अभ्यास पुस्तकाच्या सहाय्यानेही करता येईल. पण मग ते फक्त शाब्दिक ज्ञान होईल. त्यात आनुभविक ज्ञान येणार नाही. जसे पुस्तके वाचून पोहता येणार नाही. किंवा पाकशास्त्रावरची पुस्तके वाचून केलेला पदार्थ त्याच्या चित्रात दाखवल्यासारखा होईल याची खात्री नसते. त्यापेक्षा तो भलताच निघतो. म्हणून तो पदार्थ किंवा पाककला जसे आईच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी शिकणे गरजेचे आहे, तसा इथे गुरुपदेश आवश्यक आहे. गुरू असणे, प्रशिक्षक असणे गरजेचे आहे. माझे गुरुजी डॉ. करंदीकर उर्फ आचार्य योगानंद म्हणतात, "कोणत्याही आसनाचा अभ्यास हा पायरी पायरीने केला पाहिजे. एकदम १००% अवस्था प्राप्त होणार नाही. प्रथम शारीरिक अवस्था, नंतर शरीरांतर्गत होणार्या बदलांची जाणिव, त्यातून होणारे मानसिक व बौद्धिक बदल आणि सर्वात शेवटी अनुभवाला येणारी "आनंदावस्था" असा हा कष्टसाध्य व दीर्घ प्रवास असला तरी यात यश निश्चित आहे. अशी अवस्था चांगल्यापैकी जमू लागली व जास्त वेळ टिकवता आली म्हणजे आपोआप वेगळे वृत्तिनिरोध अनुभवता येतात. शुद्धता, संतोष, तप आणि स्वाध्याय याही अवस्था अनुभवता येतात. प्रत्येक आसनात चालू असणार्या श्वासावर चित्त ठेवून प्राणायाम ही साधतो आणि मन निर्विचार होवून कोणत्याही विषयोपभोगाची इच्छा मनात उरत नाही. श्रद्धा, निष्ठा ठेवून अनुष्ठानपूर्वक केलेला दीर्घ अभ्यास 'आसनजय' अवस्था प्राप्त करून देतो. महामुनी पतंजलीनी आसनजयाच्या व्याख्येत सांगितले आहे कि "ततो द्वंन्द्वानभिघातः॥" म्हणजे सुख-दु:ख शीत-ऊष्ण अश्या द्वंद्वापासून वेगळे असलेले स्वास्थ्य अनुभवता येते. ही अवस्था अनुभवण्याची आहे. व म्हणुन ती "शब्दातीत" आहे."
म्हणुन आपण पांच सोप्या आसनांनी सुरूवात करणार आहोत. नेहमी योगासनाचा विचार करताना अमुक तमुक आसनाचा उपयोग काय याचे नेमके उत्तर देणे शक्य नसते. आसनांच्या बाबतीत जो परिणाम अपेक्षित आहे, तो सर्व, किंवा त्या गटात असणार्या सर्व आसनांचा एकत्रित परिणाम असतो हे लक्षात ठेवावे. त्यामुळे अमुक एखादे आसन कश्यासाठी आहे हे सांगणे अवघड आहे. ढोबळ मानाने सांगता येईल. पण नेमका परीणाम, ज्याला इंग्रजीत "पिन पॉइंट इफेक्ट" म्हणतात, तसे सांगणे कठिण आहे. कारण मी याच लेखात म्हटल्याप्रमाणे गणिती तत्त्व लागू पडणार नाही. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेले तरी ३+२=५ हेच उत्तर येईल. पण एखाद्या आसनाचे तसे नाही. सुप्तवीरासनाचा उपयोग एखाद्या व्यक्तिला होईल पण तशाच प्रकारच्या व्याधिने त्रस्त असणार्या दुसर्या व्यक्तिस त्याचा तितकाच उपयोग होईलच असे नाही. जरी आसन तेच असले, करण्याची पद्धत तीच असली तरीही.
ही पांच आसने म्हणजे सुप्तवीरासन, सुप्तबद्धकोनासन, विपरीत दंडासन, विपरीत करणी, आणि सेतुबंधसर्वांगासन. यासह शवासन केल्यास ही आसने मानसिक शांतता, स्वास्थ्य आणि शरीराला तसेच मनाला विश्रांती देतील. वरीलपैकी शवासनासह तीन आसने प्रत्येकी २० मिनीटे केल्यास मनाला आणि शरीराला आनंददायी विश्रांती मिळू शकेल. या पुढील लेखात वरील आसने करण्याच्या पद्धती, साहित्य व आसनांचा स्थूल मानाने परिणाम याचा विचार करू.
॥ ॐ तत्सत ॥
॥ जय श्रीराम ॥

आरोग्यं धनसंपदा - १
आजचे जीवन हे वेगवान जीवन आहे. आपण पाहतो कि , माहिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे, त्यांच्याशी निगडित उद्योग वाढू लागले आहेत. या उद्योगांचा एक पैलू पाहिलात तर असे लक्षात येईल की सकाळी जाण्याची वेळ ठरलेली असते, पण संध्याकाळची परत येण्याची वेळ निश्चित नाही. तुम्ही जितके जास्त वेळ काम कराल, जितका जास्त वेळ कंपनीत थांबाल, तेव्हधे तुम्ही अधिक निष्ठावंत, अधिक यशस्वी, अधिक कार्यक्षम असे सध्याचे गणित झाले आहे. य गणितीसूत्रात बसणार्यांवर मग पैशांचा, वेतनाचा वर्षाव होत असतो. आणि या वर्षावाकडे पाहून कामाचे तास किती याकडे काणाडोळा करण्याची वृत्ती निर्माण होते. व परीणाम म्हणजे शरीराकडे दुर्लक्ष! विश्रांतीचा आभाव आणि काम व पैसा याच्या शर्यतीत 'टॉप'ला येण्याची धडपड यात मनःस्वास्थ्य हरवत चालले आहे.
या धडपडीच्या, धकाधकीच्या जीवनात, विश्रांतीचा आभाव याचबरोबर आहार व व्यायामाकडे दुर्लक्ष हे अनेक रोगांचे मूलभूत कारण बनले आहे. साधी एक गोष्ट विचारात घ्यायची झाली तर सुमारे ४० वर्षांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात फरक आहे. कारणे काहीही असोत, पण आज कामामुळे मानसिक ताण वाधला आहे व त्यातून उच्च रक्तदाब, ह्रदयविकार मधुमेह असे विकार वाढण्याची प्रवृत्ती वाढली आहे.
आयुर्वेदांत ॠतुचर्या, दिनचर्या निरोगी जीवनासाठी सांगितली आहे. जरी क्षणभर गृहित धरलं की हजारो वर्षापूर्वीचे निकष आज लागू पडणार नाहीत. तरीही त्यातील निम्मा भाग हा त्यात कालानुरूप थोडाफार फरक करून आपल्या स्वास्थ्यासाठी वापरता येइल. आयुर्वेदात सांगितलेले आहार विहार आपण कालबाह्या समजून त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. दमनूक करणारे खेळ व दिशाहीन व्यायामप्रकार आज आपण महत्त्वाचे मानतो. प्राणायाम व योगासने या सारख्या शारीरीक आणि मानसिक विश्रांती देणार्या व्यामप्रकारांना तुच्छ लेखतो. "फास्ट फूड"लामहत्व येत चालले आहे. आणि याचे प्रमुख कारण कुतुंबातील प्रमुख व्यक्तींना उपलब्ध असणारा वेळ. आज दोघेही "मिया-बिबी" नोकरी करण्याच्या जमान्यात वरील गोष्टींना वेळच मिळत नाही. मग अजार, ताण तणाव, त्रास यांची मालिका सुरू होते. या दुष्टचक्रातून बाहेर पडले पाहीजे याची जाणिव मनाच्या कोपर्यात कोठेतरी होते. पन पैसा आणि काम याच्या दलदलीत पाय घट्ट रूतून बसलेला असतो. तो काही बाहेर निघता निघत नाही. आपण यात हळू हळू अडकत जातो. आणि या दुष्टचक्रातून बाहेर पडतो तेंव्हा चरकातून बाहेर पडणार्या उसासारखी आपली अवस्था होते.
जर चक्रातून बाहेर पडणारा उंस व्हायचे नसेल तर थोड्याश्या प्रयत्नाने काळ काम वेग यांच्या शर्यतीत राहून हे साध्य करता येऊ शकेल. त्यासाठी थोडा वेळ आणि प्रचंड मनोनिग्रहाची गरज आहे. यागोष्टी आपल्या दिनचर्येचा भाग झाल्या पाहिजेत. आपण रोज अंघोळ करतो हा एक आपल्या दिनचर्येचा भाग झाला. असं होत नाही की " आज अंघोळ केली आहे. आता चार दिवस नाही केली तरी चालेल." किंवा असेही होत नाही की, " काय बुवा, कामाच्या व्यापात आठवडाभर अंघोळीला वेळच झाला नाही." अंघोळ हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे.
हा शारीरीक ताण तणाव कमी होउन आप्लले "फास्ट" जीवन सुखी, सुसह्य आणि आनंदी करण्याचा हेतु या लेखमालेत आहे. रोजचा आहार-विहार, सर्वसामान्यांना सहज जमतील अशी पथ्ये, व्यायामप्रकार आणि योगासने यांच्या वापराने आपले दैनंदिन जीवन कसे सुखकर करता येईल हे सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न.
ही लेखमाला म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे. फक्ता एक दिशादर्शक असा त्याचा तारतम्याने वापर करायचा आहे. व्यक्ति तितक्या प्रकृती. एखादी गोष्ट मला योग्य आहे, ती दुसर्याला योग्य आहे म्हणजे ती तिसर्याला योग्य असेलच असे नाही. त्याच्या प्रकृतीनुसार त्याला ती योग्य-अयोग्य ठरणार आहे. पण तरीही इथे सांगितलेल्या गोष्टी, आसने, पथ्ये सामान्यपणे सर्वांना उपयुक्त ठरतील, सहज जमतील अशीच घेण्याचा प्रयत्न असेल. यात क्षणभर गृहित धरूया कि एखाद्याला उपयोग होणार नाही. पण अपायही नक्की होणार नाही. " अहो, तुम्ही सांगितले. आम्ही केले. पण उपयोग काय झाला? शून्य." असे होऊ नये यासाठी ही धोक्याची छोटीशी सूचना !!
पुढील भागात मानवी मन, मनाचे महत्त्व, त्याचे दैनंदिन जीवनातले स्थान व त्याच्या स्वास्थ्यासाठीचे प्रयत्न याविषयी थोडीशी चर्चा करू.

शब्द
माझी मैत्रिण प्राजक्ता पटवर्धन. एक कवियत्री आणि ललित लेखक. खूपच छान लिहिते. तिचा ब्लॉग वाचणे हा एक निखळ आणि निर्मळ आनंद आहे. "शब्द" ही कविता केवळ तिच्या प्रेरणेने आणि सततच्या प्रोत्साहनानेच लिहिणे जमले आहे. त्यामुळे याचे श्रेय तिला आहे. मी निमित्तमात्र आहे.
शब्द
मला कधीच कळले नाही
कवीला शब्द कसे सुचतात
इथे तर गदिमांच्या समोर
शब्द हात जोडून उभे राहतात ॥१॥
पु. ल. म्हणतात,
शब्दावाचून कळले सारे
शब्दांच्या पलिकडले
पण इथे आम्हाला
शब्दांच्यापलिकडले सोडाच
पण काहीही नाहि कळले अलिकडले ॥२॥
शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द शब्द म्हणजे एकापुढे एक अक्षर?
पण मग आपल्या भावना कशा सांगेल निरक्षर? ॥३॥
शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द म्हणजे मनाच्या अथांग जलाशयाचे तरंग
शब्द दाखवतात माणसाच्या व्यक्तिमत्वाचे रंग
जसा उथळ पाण्याला फार खळखळाट
तसे शब्द दाखवतात मनाचा खळबळाट ॥४॥
शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द ही मनाची फुले आहेत
शब्द हे भावनांचे तरंग आहेत
शब्द हे विकारांचे धुमारे आहेत
शब्द हा जीवनाचा आधार आहे ॥५॥
शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द विचारांचा आकृतीबंध आहे
शब्द संस्कारांचा आकार आहे
शब्द वार्याची झुळूक आहे
शब्द सोसाट्याचे वादळ आहे ॥६॥
शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द हे प्रभावी हत्यार आहे
शब्द हा भात्यातला बाण आहे
भावना आणि वाणी यांचा आधार आहे
शब्द हे मनाचे द्वार आहे॥७॥
शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द हा प्रणव आहे
शब्द हा ॐकार आहे
शब्द हा मन चित्ताच्या
अस्तित्वाचा साक्षात्कार आहे ॥८॥
शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द हा सप्त सुरांच्या
अस्तित्वाचा आधार आहे
शब्द हा जीवन संगिताचा
भव्य दिव्य गंधार आहे ॥९॥
शब्द शब्द हे काय आहेत?
शब्द शब्द हा वाक्यांचा त्राता आहे
शब्द शब्द हा अर्थाचा आधार आहे
शब्द शब्द हा व्याकरणाचा गाभा आहे
शब्द शब्द हा शब्दकोषाचा आत्मा आहे ॥१०॥
पण मग या शब्दांनी काय घडलं?
शब्दशब्दांनी सारे जीवन समजलं?
आयुष्याच्या परमेश्वरी देणगीचं
अवघं अबोध रहस्य उलगडलं? ॥११॥
पहा काय झालं ते :-
शब्दांनी सारी दु:खे सुसह्य झाली
शब्दांनी अवघी सुखे अधिक फुलली
शब्दाशब्दाच्या गाभार्यातून
आयुष्याची वाटचाल सोपी झाली ॥१२॥
पण आयुष्याच्या एका टप्प्यात
एक वेळ अशी येते
की शब्द तिथे संपून जातात
आणि मन अंतर्मुख होते ॥१३॥
एकदा शब्द संपले
की मन अज्ञातात जाते
शब्दांच्या पलिकडच्या
अथांग पोकळीत हरवते ॥१४॥
त्या शब्दांच्या पलीकडे
आपण नेहमी एकटेच असतो
नाही तिथे कोणी सखे सोयरे
आपणच आपले मित्र असतो ॥१५॥
तिथे आपले व्यक्तिमत्व हरवते
तिथे आपले अस्तित्वच संपते
तिथे आपले जीवनच संपते
ती न परतीची वाट असते ॥१६॥
म्हणून शब्दावाचून फक्त कळते
संगितातली एक वीराणी
कोण जाणे आहे का ती
कदाचीत आयुष्याची भैरवी ॥१७॥
श्रीराम पेंडसे

गुरुवार, २३ जुलै, २००९
निसर्गायन
निसर्गायन
वळ्वी पावसाचा शिडकावा
आसमंतात आणी गारवा
देई दग्ध तन मनास
मोहक शीतल थंडावा ॥१॥
परिसर कुंद झाला
निसर्ग बहरू लागला
अशा या धुंद समयी
आसमंत भारला ॥२॥
रानवाटा खुणावती
वनकिन्नर बोलावती
बहरलेली नटलेली वनश्री
आम्हा आनंदे आमंत्रिती ॥३॥
प्रसन्न वनश्रीने भरलेल्या
हिरवी शाल पांघरलेल्या
वळणी रानवाटेवर
निसर्गानंद लुटूया ॥४॥
जलप्रवाह खळखळती
ओढे मंद झुळझुळती
पवनांच्या झुळूकीवर
तरु शिखरे डोलती ॥५॥
हिरवा शालू नेसूनी
फुलांचे दागिने लेवूनी
नटली आमुची वनदेवी
वातावरण भारूनी ॥६॥
लता वेलींनी द्वार सजले
सारे वनचर तिथे जमले
मनमोहक परिसरी
स्वागतास सज्ज झाले ॥७॥
असे इथे वनचरांचे
तरू नभ-चरांचे
सर्वत्र दिसतसे
साम्राज्य आनंदाचे ॥८॥
लता वृक्ष खुणावती
सांबर मयुर मोहवती
पक्षी मधुर गात
जणू यक्ष बोलवती ॥९॥
हे शहरी चरांनो
नीरस जनांनो
फक्त काम आणि काम
करणार्या भूमिपुत्रांनो ॥१०॥
दूषिततेतून बाहेर पडूया
तन पिडा मागे ठेवूया
या जादुई परिसरात
निरोगी मन घडवूया ॥११॥
श्रीराम पेंडसे
वळ्वी पावसाचा शिडकावा
आसमंतात आणी गारवा
देई दग्ध तन मनास
मोहक शीतल थंडावा ॥१॥
परिसर कुंद झाला
निसर्ग बहरू लागला
अशा या धुंद समयी
आसमंत भारला ॥२॥
रानवाटा खुणावती
वनकिन्नर बोलावती
बहरलेली नटलेली वनश्री
आम्हा आनंदे आमंत्रिती ॥३॥
प्रसन्न वनश्रीने भरलेल्या
हिरवी शाल पांघरलेल्या
वळणी रानवाटेवर
निसर्गानंद लुटूया ॥४॥
जलप्रवाह खळखळती
ओढे मंद झुळझुळती
पवनांच्या झुळूकीवर
तरु शिखरे डोलती ॥५॥
हिरवा शालू नेसूनी
फुलांचे दागिने लेवूनी
नटली आमुची वनदेवी
वातावरण भारूनी ॥६॥
लता वेलींनी द्वार सजले
सारे वनचर तिथे जमले
मनमोहक परिसरी
स्वागतास सज्ज झाले ॥७॥
असे इथे वनचरांचे
तरू नभ-चरांचे
सर्वत्र दिसतसे
साम्राज्य आनंदाचे ॥८॥
लता वृक्ष खुणावती
सांबर मयुर मोहवती
पक्षी मधुर गात
जणू यक्ष बोलवती ॥९॥
हे शहरी चरांनो
नीरस जनांनो
फक्त काम आणि काम
करणार्या भूमिपुत्रांनो ॥१०॥
दूषिततेतून बाहेर पडूया
तन पिडा मागे ठेवूया
या जादुई परिसरात
निरोगी मन घडवूया ॥११॥
श्रीराम पेंडसे
सोमवार, १३ जुलै, २००९
आरोग्यं धनसंपदा - 3
॥ आरोग्यं धनसंपदा ॥
आपण मागच्या लेखात मानवी मनाचे व्यापार आणि त्याचे महत्त्व पाहिले होते. या लेखमालेचा उद्देश हा आपले दैनंदिन जीवन ताण तणावमुक्त व्हावे, शारिरीक स्वास्थ्य लाभावे हा आहे. आणि मी त्यावेळी असेही सांगितले होते कि यात मनाचा सहभाग बराच आहे. मन व शरीर एकमेकांवर अवलंबून असणार्या गोष्टी आहेत. एक बिघडले कि दुसरे बिघडतेच. आणि म्हणून दोन्हीचे स्वास्थ्य राहणे गरजेचे आहे. दोन्हीपैकी एक चाक पंक्चर होउन चालणार नाही. आणि दोन्ही तर नाहिच नाही. म्हणून स्वास्थ्याचा विचार करताना दोन्हीचा विचार झाला पाहीजे. दोन्हीचे स्वास्थ्य लाभले तर त्याला "संपूर्ण स्वास्थ्य" म्हणता येइल.
मागच्या लेखात मी म्हटले होते कि आपण मनस्वास्थ्यासाठी योगासनात आसनांचा राजा म्हणता येइल अश्या "शवासना"चा विचार आपण करू. पण नंतर विचार करताना मला वाटले कि त्याही आधी दिनचर्या सांगितली पाहिजे. जेंव्हा आपण दैनंदिन दृष्टीकोनातून स्वास्थ्याचा विचार करतो त्यावेळी पहिली गोष्ट प्रामुख्याने विचारात घेतली पाहिजे ती अशी कि आहार विहार किंवा दिनचर्या. दिनचर्येची व्याख्या अशी कोणत्याही ग्रंथात सापडणार नाही. शब्दकोषात त्याचा अर्थ सापडेल. पण मला अपेक्षित असलेला अर्थ आणि यालेखमालेचा उद्देश याचा विचार करता मी त्याची व्याख्या अशी केली आहे कि " आपल्या मनाच्या आणि शरिराच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने रोजच्या रोज विशिष्ट क्रमाने केलेली कृत्ये." अर्थात अशी कृत्ये कि जी केल्यावाचून पर्याय नाही. आज हे केलं नाही तर चालेल हा निकष ज्या कृत्यांच्याबाबतीत लागू पडणार नाही अशी कृत्ये. एक छोटेसे उदाहरण देतो कि ज्यामुळे क्रम आणि अनिवार्यता या दोन्हीचे स्पष्टीकरण मिळेल. सकाळी फिरणे हे अनिवार्य कृत्यात बसत नाही. सकाळी फिरले तर उत्तमच. पण नाही फिरलात तर तोटा नाही. तोटा होउ शकेल पण तो दीर्घकालिन असेल. पण सकाळी उठल्याबरोबर दात घासणे हे मात्र अनिवार्य कृत्यात बसते. आज दात घासले आहेत. आता तीन दिवस घासले नाहित तरी चालेल. असे चालेल का? नाही. चालणार नाही. म्हणून हे अनिवार्य कृत्यात बसेल. आता एकदा दात सकाळी घासल्यावर नंतर प्रत्येक खाण्यावर दात घासले तर उत्तमच. पण गरज नाही. प्रत्येक वेळी खाण्यानंतर नाही घासले तरी चालतील. मात्र सकाळी उठल्यावर गरजेचे आहे.
आता या दिनचर्येत कशाचा समावेश होउ शकेल ते पाहू. आयुर्वेदात याला आहार विहार म्हणतात. आहार म्हणजे खाण्या-पिण्याच्या सवयी, वेळावगैरे. आणि विहार म्हणजे हालचाल, राहणीमान व इतर दैनंदिन कृत्ये. मगाशी आपण स्वास्थ्य या एका शब्दाचा उल्लेख केला. स्वास्थ्य हे 'स्वस्थ' या शब्दाचे रूप आहे. जरा विचार करायला लावणारी एक गोष्ट सांगतो. एखादी व्यक्ती शरीराने सुदृढ आहे, मनाने स्वस्थ आहे. मग त्या व्यक्तिला आरोग्यसंपन्न म्हणता येइल का? जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) स्वास्थ्याची काय व्याख्या केली आहे पहा. "अशी अवस्था की ज्यात शारीरीक, मानसिक आणि अध्यात्मिक समाधान लाभले आहे." ( It is a state of physical, mental and spititual well being.) यातल्या अध्यात्मिक या भागावर आपण सध्यातरी चर्चा करणार नाही. फक्त त्यासंदर्भात काही गोष्टी सांगतो. शारीरीक आणि मानसिक या शब्दाबरोबरच अध्यात्मिक या शब्दालाही खूप महत्त्व आहे. "अध्यात्म म्हणजे चित्ताचे समत्व" असे ज्ञानेश्वर म्हणतात. हे काय आहे ते समजाऊन सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात कि "समत्व म्हणजे जेथे मन आणि बुद्धिचे ऐक्य झाले आहे अशी अवस्था." सध्याची उपचारपद्धति पाहिली तर असे लक्षात येइल कि आधुनिक वैद्यक शरीराचा मळ काढून टाकणे, शरीरावरील आणि मनावरील आघातांची तीव्रता कमी करणे यातच समाधानी असते. ज्ञानेश्वरांना अपेक्षित असलेले चित्तचे समत्व इथे नाहीच. आधुनिक वैद्यकात चित्त ही संकल्पनाच नाही. आधुनिक वैद्यक मन यापलिकडे जातच नाही. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आणि अंतःकरण यामुळेच शरीराचे व्यापार चालू राहतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त पहिल्या दोनांवरच आधुनिक वैद्यकात सध्या उपचार करतात. तिसर्यावर त्यांच्याकडे उपाय नाहीत. पण अंतःकरण किंवा चित्ताचा विचार योगशस्त्रात होतो. आणि या विचाराचा अभ्यास हा वेगळा विषय आहे. त्याबद्दल नंतर चर्चा करू. सध्या दिनचर्या यापुरतीच चर्चा मर्यादित ठेउ.
यावर आयुर्वेदात सखोल चर्चा आहे. आहार-विहाराचे बरेच नियम सांगितलेले आहेत. काय करावे, काय करू नये याचा दीर्घ विचार त्यात आहे. मी पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे हे ग्रंथ अतिप्राचिन आहेत्. त्यामुळे त्यातील आहार विहाराच्या कल्पना त्या काळच्या आहेत. आजच्या काळासाठी त्या कालबाह्य असतील. पुन्हा त्यातले आजच्या काळाला काय अनुरूप करता येइल ते पाहू. त्या काळचे उल्लेख आणि संदर्भ न देता त्याचे आजच्या परिस्थितीनुरूप रूपांतर केले आहे. यातले आपण किती घ्यायचे, काय सोडून द्यायचे, काही गोष्टी कालनुरूप कश्या आज चपखल बसतील याचे बदल कसे करायचे ते तुम्ही ठरवायचे आहे.
आयुर्वेदात असे सांगितले आहे की, सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. प्रातःविधीनंतर वड, करंज वगैरे झाडाच्या कडू तुरट तिखट रसाच्या मऊ मृदू टोकांच्या काड्या हिरड्यांना न दुखवता चावाव्यात. आजही गुजराथी लोक हे करतात. याला "दातण" म्हणतात. आधुनिक काळात याची जागा "ब्रशिंग"ने घेतली आहे. परिणाम एकच. मुख आणि दांत स्वच्छ व्हावेत. खाण्यानंतर दांतात काही अन्नकण अडकून राहतात. सर्वसामान्यपणे आपण रात्री जेवणानंतर दांत ब्रशने घासत नाही. (हे वाचल्यावर काहीजण म्हणतील आम्ही घासतो. एकदम मान्य. म्हणूनच मी सर्वसामान्य हा शब्द वापरला.) अशावेळी या दांतात अडकलेल्या कणाचे दुर्गंधीत रूपांतर होते. मी या लेखात दिनचर्येची व्याख्या सांगताना म्हटले होते त्याप्रमाणे रात्री दांत घासणे हा दिनचर्येचा भाग होउ शकणार नाही, ते एक शरीराला लागलेले चांगले वळण असेल. पण सकाळी उठल्यावर दांत घासणे हा दिनचर्येचा भाग होइल.
यानंतर आयुर्वेदाने सांगितलेला उपचार म्हणजे सर्वांग अभ्यंग. अभ्यंग म्हणजे तेलाने मर्दनकरणे. यासाठी निरनिराळी औषधीसिद्ध तेलं वापरायला सांगितली आहेत. आजच्या जगात हे शक्य नाही. हा प्रकार आज काल फक्त बाळंतिणिच्याबाबतीत केला जातो. पण याचा ग्रंथोक्त उपयोग असा सांगितला आहे कि याने वार्धक्य, श्रम, वात यांचा नाश होतो. दृष्टी स्वच्छ होते. आयुष्य वाढते. यानंतर व्यायाम सांगितला आहे. व्यायाम कधी करावा, किती करावा, कोणी करावा तसेच अति व्यायामाचे दुष्परिणाम याचे विस्तृत विवेचन प्राचीन ग्रंथातून आढळते. अतिव्यायामाने तृष्णा, श्रम, श्वास, ग्लानी, शक्तिपात, खोकला आणि प्रसंगी वांतीही उत्पन्न होऊ शकते.
नंतर येतो तो क्रम स्नानाचा. स्नान करताना ऊन पाणी वापरावे. ऊन पाण्याने स्नान करताना गळ्याखालून स्नान करावे. केसाला आणि मस्तकालामात्र थंड पाणी वापरावे. कारण ऊन पाण्याने डोक्यावरून स्नान केल्यास केसांस आणि दृष्टीस धक्का पोहोचतो. स्नान कधी करू नये याबद्दल सांगताना म्हटलं आहे कि स्नान भोजनानंतर तसेच ज्वर व इतर विकारांत करू नये.
भोजन कोणत्या काळी, कोणाबरोबर करावे याबद्दलची मार्गदर्शक तत्त्वेही या ग्रंथातून सांगितली आहेत. सध्या ही कालबाह्य असली तरी त्यातला घेण्यासारखा भाग म्हणजे भोजन शांतपणे बसून, सावकाश आणि चवीने घ्यावे. घाई गडबड केल्याने अपचनाचा धोका होऊ शकतो. ग्रंथातून चर्चा करताना त्यात काय खावे, कोणत्या काळात खावे, कोणत्या ऋतूत काय खावे आणि काय खाऊ नये याची सखोल चर्चा केलेली आहे. उदाहरणादाखल एक दोन गोष्टी सांगतो. थंडीत (हेमंत ऋतुत) खूप भूक लागते व म्हणून अशावेळी मधुर आम्ल, लवण रसाचे तसेच स्निग्ध पदार्थांचे सेवन करावे. परंतु उन्हाळ्यात म्हणजे वसंत आणि ग्रीष्म ऋतुत उन्हामुळे शरीरातील कफदोष कमी होऊन वायुदोषाची वृद्धी होते. म्हणून या काळात तिखट, खारट व आंबट पदार्थांचे सेवन अत्यल्प प्रमाणात करावे तसेच व्यायामही करू नये.
थोडक्यात वाग्भटाचार्यांच्या शब्दात सांगायचे तर :
" नक्तं दिनानि मे यान्ति , कथंभूतस्य संप्रति ॥
दु:खमांग न भवत्येवं , नित्यं सन्निहितस्मृती: ॥
इत्याचारः समासेन, यं प्राप्नोति समाचरत ॥
आयुरारोग्य ऐश्वर्यं यशोलोकांश्च शाश्वताम ॥
म्हणजे
" मी काय करतोय, कोठे आहे, माझे वय काय, माझे मन कोठे गुंतले आहे हे क्षणोक्षणी ध्यानात असू द्यावे, म्हणजे दु:ख होत नाही. हा थोडक्यात सदाचार सांगितला आहे. याप्रमाणे जो आपली वर्तणूक ठेवेल तो दीर्घायुष्य, आरोग्य, ऐश्वर्यं, यश अणि मोक्ष पावेल."
पुढील लेखात मन आणि शरीर यांच्या स्वास्थ्यासाठी योगाच्या माध्यमातून सहज सुलभ काय करता येइल हे पाहू.
॥ ॐ तत्सत ॥
॥

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)