सॉरी
सॉरीचा अर्थ पाहिला तर
"सॉरी"ला वाईट वाटत असते
त्याची आगतिकता त्यातून
पूर्णपणे दिसतच असते १
माफी किती सोपी असते
सॉरी म्हणून काम भागते
हल्लीच्या या आधुनिकतेत
सॉरीने सर्व जमून जाते २
म्हणणारा पटकन म्हणून जातो
ऐकणारा संभ्रमात पडलेला असतो
"सॉरी"चा कधीच तोटा नसतो
झेलणारा मात्र आगतिक होतो ३
"सॉरी"ने सॉरी म्हटल्या म्हटल्या
ऐकणाराच खरं तर सॉरी झाला
सॉरी म्हणणारा मात्र काठावरून
ऐकणार्याच्या गटांगळ्या पहात राहिला ४
स्कूटरवाल्याने धक्का दिला
तो, सॉरी म्हणत निघून गेला
धक्का खाणारा हताश होऊन
कुठे लागलय ते शोधत राहिला ५
सौ. कोमात गेलेली होती
काळ थांबून राहिला होता
पांढरा कोटवाला शांतपणे
पडद्याकडे बघत राहिला होता ६
अखेर सौ.ची लढाई संपली
पांढरा कोट सॉरी म्हणाला
हे ऐकले आणि, यमदूत मात्र
खदा खदा हसत राहिला ७
मनात हसत म्हणत राहिला
सॉरी म्हणणारा हुशार आहे
आणि ते ऐकणारा खरोखर
किती किती बिनडोक आहे ८
दोघानाही हे माहित आहे कां?
गोष्टी कुणाच्या हातात आहेत?
दोघेही कळसूत्री बाहुल्यांसारखे
नियतीच्या तालावर नाचत आहेत? ९
सॉरी म्हणणार्याला नेहमी
खरच सॉरी वाटते का?
ज्याला सॉरी वाटत असते
तो सॉरी सॉरी म्हणत राहतो का? १०
..........श्रीराम पेंडसे
क्या बात है......अगदी पटली कविता !!
उत्तर द्याहटवा