गझल
माझेच प्रतिबिंब मी त्या गझलेत पाहीले
त्या बिंबात माझे, मन चित्त जणू हरवले
माझीच जीव नौका, कशी वेगात भिरभिरे
अती वेग त्या तरेचा, देई तनास शिरशिरे
स्वप्नी ते जगण्याचे, स्वप्न कधिच विरले
वास्तवी अस्तित्वाचे, सत्यच फ़क्त उरले
अश्या या कातरवेळी, अवघे सखेजन जमले
त्या अप्रूप सहवासी, जीवन पुन्हाच फ़ुलले
त्या सर्व न-स्वप्नांना, नव अर्थ स्पर्शू झाला
त्या चित्त विद्ध "मी"चा, मन आत्मा शांत झाला
........श्रीराम पेंडसे
सोमवार, २१ डिसेंबर, २००९
दु:ख
दु:ख
सखी विरहाचे दु:ख नेहमी
सतत ठुस ठुस करत असते
मधुमेहीच्या न भरणार्या
जखमेसारखे भळभळत असते ॥१॥
आठवणी काही सरत नाहीत
जखमा काही भरत नाहीत
नको त्या आठवणींचे लोंढे काही
थोपवून धरता येत नाहीत ॥२॥
श्रावण झर झर सरींसारखे
दु:ख....येते, दु:ख.... थांबते
आणि मात्र जाता जाताना
तुमचे मन झाकोळून टाकते ॥३॥
आठवणींची भानगड अशी की,
त्या यायच्या काही थांबत नाहीत
जणू साबणाच्या पाण्यावरचे
बुडबुडे जाता जात नाहीत ॥४॥
दु:ख नेहमीच कसे असते?
भूकंपाने तडकलेल्या जमिनीसारखे
तुमचे रूपडे मात्र दिसते
पाणी नसलेल्या प्रपातासारखे ॥५॥
सुख आणि दु:ख या
एकाच नाण्याच्या बाजू असतात
नेहमी नेहमी हीच नाणी
आपल्याला कधीच सापडत नसतात ॥६॥
ही नाणी नेहमीच घडतात
जग नियंत्याच्या टांकसाळीत
नंतर त्यांची बरसात होताना
थोडीच पडतात आपल्या ओंजळीत ॥७॥
या नाण्यांची खरी गम्मत ही
छाप - कांटा उडवल्यावर दिसते
आपल्या आयुष्यात नेहमी नेहमी
कांट्याचीच बाजू वर येते ॥८॥
मला आधी कळलेच नाही की
नेहमी नेहमीच असे का होते
नाणे उचलल्यानंतर समजले
की दोन्ही बाजूला कांटेच होते ॥९॥
सखीच्या आयुष्यात नेहमीच
कांट्याचीच बाजू वर आली
नंतर नंतर तिला मात्र
त्याची सवयच होत गेली ॥१०॥
सखीच्या मनोवृत्तीने मात्र
कांट्याचे जाईत रूपांतर केले
त्या कंटक पुष्पांनी तिचे
अवघे जीवन सुगंधी केले ॥११॥
सखी सदा झिजत राहीली
रक्तचंदनाच्या खोडा परी
आम्ही मात्र समजलो तिला
जंगली आंब्याच्या लाकडा परी ॥१२॥
दिवस गेले, महीने गेले,
संवत्सरही उलटून गेले
सखी नसण्याचे परीणाम मात्र
अजिबात कमी नाही झाले ॥१३॥
आता मागे वळून पाहताना
सत्य समजू लागले आहे
सखी या जन्मीतरी दिसणार नाही
ही काळ्या दगडावरची रेघ आहे ॥१४॥
तुम्ही म्हणाल की वर्षापूर्वीच
हे सत्य का नाही कळले?
मित्रा, विज्ञान युगातला तू?
इतके तुझे डोके कसे संपले ॥१५॥
अनपेक्षित अश्या त्या धक्क्याने
काळ थबकल्या सारखे वाटले
विचार संपले, मन थांबले
चित्त गोठले, डोके झोपले ॥१६॥
होते असे कधी.... कधी
विचार करून करून होते
यावर मात केलीच पाहीजे
हेच वारंवार जाणवत होते ॥१७॥
अश्या विचित्र कातर क्षणी
जिवलगाची वाट पाहत आहे
उषःप्रभे नंतर येणारा
सूर्योदय मला दिसत आहे ॥१८॥
सूर्याची ती प्रभात किरणें
आनंद सयी जागवतील का?
त्यांच्या सुवर्णमुलाम्याने त्या
चिरंतर ठेवा होतील का? ॥१९॥
अश्या या सुवर्ण ठेवीमुळे
जीवन सार्थकी लागेल का?
या चिरंतर ठेवीच्या व्याजावर
मी जगी उपयोगी असेन कां? ॥२०॥
.............श्रीराम पेंड्से
सखी विरहाचे दु:ख नेहमी
सतत ठुस ठुस करत असते
मधुमेहीच्या न भरणार्या
जखमेसारखे भळभळत असते ॥१॥
आठवणी काही सरत नाहीत
जखमा काही भरत नाहीत
नको त्या आठवणींचे लोंढे काही
थोपवून धरता येत नाहीत ॥२॥
श्रावण झर झर सरींसारखे
दु:ख....येते, दु:ख.... थांबते
आणि मात्र जाता जाताना
तुमचे मन झाकोळून टाकते ॥३॥
आठवणींची भानगड अशी की,
त्या यायच्या काही थांबत नाहीत
जणू साबणाच्या पाण्यावरचे
बुडबुडे जाता जात नाहीत ॥४॥
दु:ख नेहमीच कसे असते?
भूकंपाने तडकलेल्या जमिनीसारखे
तुमचे रूपडे मात्र दिसते
पाणी नसलेल्या प्रपातासारखे ॥५॥
सुख आणि दु:ख या
एकाच नाण्याच्या बाजू असतात
नेहमी नेहमी हीच नाणी
आपल्याला कधीच सापडत नसतात ॥६॥
ही नाणी नेहमीच घडतात
जग नियंत्याच्या टांकसाळीत
नंतर त्यांची बरसात होताना
थोडीच पडतात आपल्या ओंजळीत ॥७॥
या नाण्यांची खरी गम्मत ही
छाप - कांटा उडवल्यावर दिसते
आपल्या आयुष्यात नेहमी नेहमी
कांट्याचीच बाजू वर येते ॥८॥
मला आधी कळलेच नाही की
नेहमी नेहमीच असे का होते
नाणे उचलल्यानंतर समजले
की दोन्ही बाजूला कांटेच होते ॥९॥
सखीच्या आयुष्यात नेहमीच
कांट्याचीच बाजू वर आली
नंतर नंतर तिला मात्र
त्याची सवयच होत गेली ॥१०॥
सखीच्या मनोवृत्तीने मात्र
कांट्याचे जाईत रूपांतर केले
त्या कंटक पुष्पांनी तिचे
अवघे जीवन सुगंधी केले ॥११॥
सखी सदा झिजत राहीली
रक्तचंदनाच्या खोडा परी
आम्ही मात्र समजलो तिला
जंगली आंब्याच्या लाकडा परी ॥१२॥
दिवस गेले, महीने गेले,
संवत्सरही उलटून गेले
सखी नसण्याचे परीणाम मात्र
अजिबात कमी नाही झाले ॥१३॥
आता मागे वळून पाहताना
सत्य समजू लागले आहे
सखी या जन्मीतरी दिसणार नाही
ही काळ्या दगडावरची रेघ आहे ॥१४॥
तुम्ही म्हणाल की वर्षापूर्वीच
हे सत्य का नाही कळले?
मित्रा, विज्ञान युगातला तू?
इतके तुझे डोके कसे संपले ॥१५॥
अनपेक्षित अश्या त्या धक्क्याने
काळ थबकल्या सारखे वाटले
विचार संपले, मन थांबले
चित्त गोठले, डोके झोपले ॥१६॥
होते असे कधी.... कधी
विचार करून करून होते
यावर मात केलीच पाहीजे
हेच वारंवार जाणवत होते ॥१७॥
अश्या विचित्र कातर क्षणी
जिवलगाची वाट पाहत आहे
उषःप्रभे नंतर येणारा
सूर्योदय मला दिसत आहे ॥१८॥
सूर्याची ती प्रभात किरणें
आनंद सयी जागवतील का?
त्यांच्या सुवर्णमुलाम्याने त्या
चिरंतर ठेवा होतील का? ॥१९॥
अश्या या सुवर्ण ठेवीमुळे
जीवन सार्थकी लागेल का?
या चिरंतर ठेवीच्या व्याजावर
मी जगी उपयोगी असेन कां? ॥२०॥
.............श्रीराम पेंड्से
चित्त विद्ध
चित्त विद्ध
आज दीपावलीच्या शुभ दिनी
मन खूप खूप अस्वथ होतं
तुझ्यासाठी दिवाळी कधीच सरली
हेच जणू ओरडून सांगत होतं ॥१॥
ऐन दिवाळीच्या कानठळी कल्लोळात
जन जल्लोशापासून अलिप्त होतो
मन भावविश्वाच्या अंधारकोषात
केविलवाण्या गटांगळ्या खात होतो ॥२॥
शुभेच्छांचे छोटे छोटे संदेश
मोबाईलवर सारखे किणकिणत होते
मन भावनेच्या कल्लोळात ते
खूपच अर्थहीन भासत होते ॥३॥
शेवटी छापील शब्दच ते
मनोलाटा त्यात दिसतील कशा?
चित्त खळबळाटीचा सारा प्रकोप
मनात पसरला दाहीदिशा! ॥४॥
सगे सोयरे विचारत होते की
आज दिवाळीचे काय काय केले?
काय खरेदी, गोड काय होते?
फराळाचे काय काय खाल्ले? ॥५॥
स्वरात उसने बळ आणून
जाणिवी थरथर लपवत होतो
अमुक अमुक खाल्ले, तमुक केले
सर्वांना हसत खेळत सांगत होतो ॥६॥
सर्व काही ठीक असल्याचा
केविलवाणा प्रयत्न करत होतो
अस्थिर मनाचा दाहक आगलोळ
विझून जाण्याची वाट पाहात होतो ॥७॥
आठवणींचा दरबार भरला होता
आरोपीच्या पिंजर्यात उभा होतो
सुखी दु:खी आठवणींनी मात्र
आतल्या आत जळत होतो ॥८॥
त्या आठवणींच्या आगडोंबाची
भली मोठ्ठी ज्योत झाली
काळ्या पांढर्या सर्व सयींची
क्षणार्धात राख रांगोळी करून गेली ॥९॥
तरीही डोळ्यातून सुख दु:खाचा
पाणलोटी ओहोळ झरझरू लागला
प्रतिपदेच्या शुभ स्वागतासाठी
चित्तगाभारा रिकामा करून गेला ॥१०॥
आणि मग चंचल चित्ताने जणू
आत्मसंयमिनीचा धावा केला
त्या माउलीने अति तत्परतेने
विद्धात्म्याला प्रतिसाद दिला ॥११॥
संयमिनीच्या सूक्ष्म तरल वृत्तीला
विद्धचिताची थरथर जाणवली
त्या थरथर लाटेतूनच तिने
विद्ध-भग्न वृत्ती शांत केली ॥१२॥
शब्द आणि स्वर लहरी इथे,
आश्वासक आणि कोमल होत्या
संयमिनीच्या वृत्तीसारख्या
धीर-गंभीर आणि तरल होत्या ॥१३॥
श्रीराम पेंडसे
आज दीपावलीच्या शुभ दिनी
मन खूप खूप अस्वथ होतं
तुझ्यासाठी दिवाळी कधीच सरली
हेच जणू ओरडून सांगत होतं ॥१॥
ऐन दिवाळीच्या कानठळी कल्लोळात
जन जल्लोशापासून अलिप्त होतो
मन भावविश्वाच्या अंधारकोषात
केविलवाण्या गटांगळ्या खात होतो ॥२॥
शुभेच्छांचे छोटे छोटे संदेश
मोबाईलवर सारखे किणकिणत होते
मन भावनेच्या कल्लोळात ते
खूपच अर्थहीन भासत होते ॥३॥
शेवटी छापील शब्दच ते
मनोलाटा त्यात दिसतील कशा?
चित्त खळबळाटीचा सारा प्रकोप
मनात पसरला दाहीदिशा! ॥४॥
सगे सोयरे विचारत होते की
आज दिवाळीचे काय काय केले?
काय खरेदी, गोड काय होते?
फराळाचे काय काय खाल्ले? ॥५॥
स्वरात उसने बळ आणून
जाणिवी थरथर लपवत होतो
अमुक अमुक खाल्ले, तमुक केले
सर्वांना हसत खेळत सांगत होतो ॥६॥
सर्व काही ठीक असल्याचा
केविलवाणा प्रयत्न करत होतो
अस्थिर मनाचा दाहक आगलोळ
विझून जाण्याची वाट पाहात होतो ॥७॥
आठवणींचा दरबार भरला होता
आरोपीच्या पिंजर्यात उभा होतो
सुखी दु:खी आठवणींनी मात्र
आतल्या आत जळत होतो ॥८॥
त्या आठवणींच्या आगडोंबाची
भली मोठ्ठी ज्योत झाली
काळ्या पांढर्या सर्व सयींची
क्षणार्धात राख रांगोळी करून गेली ॥९॥
तरीही डोळ्यातून सुख दु:खाचा
पाणलोटी ओहोळ झरझरू लागला
प्रतिपदेच्या शुभ स्वागतासाठी
चित्तगाभारा रिकामा करून गेला ॥१०॥
आणि मग चंचल चित्ताने जणू
आत्मसंयमिनीचा धावा केला
त्या माउलीने अति तत्परतेने
विद्धात्म्याला प्रतिसाद दिला ॥११॥
संयमिनीच्या सूक्ष्म तरल वृत्तीला
विद्धचिताची थरथर जाणवली
त्या थरथर लाटेतूनच तिने
विद्ध-भग्न वृत्ती शांत केली ॥१२॥
शब्द आणि स्वर लहरी इथे,
आश्वासक आणि कोमल होत्या
संयमिनीच्या वृत्तीसारख्या
धीर-गंभीर आणि तरल होत्या ॥१३॥
श्रीराम पेंडसे
चांद राती
चांद राती
रिमझीम रिमझीम श्रावणसरीत
अंग माझे भिजले गं
सय तुझी येता येता
मन मोहरून आले गं
मन उफाळ वार्याच्यासंगे
उंच ऊंच उधळले गं
आठवणींच्या हिंदोळ्यावर
मस्त झुलून आले गं
चांदण्यांची बकुळफुलें मी
तुझ्याचसाठी खुडली गं
त्यांचा मोहक गजरा मी
तुझ्या केसात माळला गं
त्या बकुळीच्या दरवळाने मी
धुंद कुंद झालो गं
तुझ्या गहिर्या मिठीत मी
खोल खोल हरवलो गं
तुझ्या विद्युत् स्पर्शाने मी
धुंद स्वप्नी बुडालो गं
तारकांच्या जाईसड्यात मी
आकंठ न्हालो बुडालो गं
माझे घायाळ चित्त तन
तुझ्या नाजुक मिठीत निमाले गं
तुझ्या मलमली स्पर्शाने
ते पार विरघळून गेले गं
तुझ्या माझ्या मिलनास
चंद्र साक्षी होता गं
टिपूर चांद लोटात मी
देह भान विसरलो गं
काळ थांबला, पळे थांबली
पण धुंदी न ओसरली गं
मन माझे हरवून मी
स्वर्गी डुंबत होतो गं
................ श्रीराम पेंडसे
रिमझीम रिमझीम श्रावणसरीत
अंग माझे भिजले गं
सय तुझी येता येता
मन मोहरून आले गं
मन उफाळ वार्याच्यासंगे
उंच ऊंच उधळले गं
आठवणींच्या हिंदोळ्यावर
मस्त झुलून आले गं
चांदण्यांची बकुळफुलें मी
तुझ्याचसाठी खुडली गं
त्यांचा मोहक गजरा मी
तुझ्या केसात माळला गं
त्या बकुळीच्या दरवळाने मी
धुंद कुंद झालो गं
तुझ्या गहिर्या मिठीत मी
खोल खोल हरवलो गं
तुझ्या विद्युत् स्पर्शाने मी
धुंद स्वप्नी बुडालो गं
तारकांच्या जाईसड्यात मी
आकंठ न्हालो बुडालो गं
माझे घायाळ चित्त तन
तुझ्या नाजुक मिठीत निमाले गं
तुझ्या मलमली स्पर्शाने
ते पार विरघळून गेले गं
तुझ्या माझ्या मिलनास
चंद्र साक्षी होता गं
टिपूर चांद लोटात मी
देह भान विसरलो गं
काळ थांबला, पळे थांबली
पण धुंदी न ओसरली गं
मन माझे हरवून मी
स्वर्गी डुंबत होतो गं
................ श्रीराम पेंडसे
भूत
सूर्य बुडाला ऊजेड निमाला
काळ्या शाईची दौत फुटली
टच्च शांततेच्या टीपकागदावर
मावळतीकडे पसरू लागली
शांत खोल जलाशयावर
गूढ बोचरी शांतता पसरली
पक्शी थांबले, प्राणी लपले
अवघी सृष्टी थिजून गेली
भयाण बोचर्या काजळी शांततेत
रातकिडे सुरात किरकिरू लागले
काळ्याकुट्ट काजळरातीने
सार्या आसमंतास मिठीत घेतले
त्या जलडोहाच्या काठावरती
वट वृक्षांच्या मजल्यांवरती
सर्व अतृप्त भुतावळींची
विराट महासभा भरली होती
कुणाची कुजबुज, फिदीफिदी हसणे
आरडा ओरडा, भयाण रडणे
सर्व भुतांचे तारस्वरांचे
गर्जू लागले एकसुरी तराणे
आणि अचानक फटक्यासरशी
आसमंत सारा गोठून गेला
संथ संथ मंद पदरवाचा
काळ्या काचेला तडा गेला
टॉक्ss टॉक्ss टप्ss टप्ss
पदरव तिथे शांत ssझाला
बुळुकss डुबुकss गूढ आवाज
ताणलेल्या शांततेला चिरत गेला
अरे ss बापरे ss लई भारी
आपल्यापेक्षा आहे कोणीतरी
महासमंधराज आला वाटतं
कबंधे पाहती भिरी भिरी
पुन्हा बुळुकss पुन्हा डुबुकss
पिशाच्च दुनिया टरकून गेली
असंख्य वट-पारंब्यांवर
उलटी होऊन लटकू लागली
आणि अचानक सारा परिसर
लख्ख उजेडाने नाहून गेला
मोठ्ठा विजेचा डोंब लोळ
आसमंती कल्लोळ माजवून गेला
पाऊस कोसळला आभाळ फुटले
वातावरण धुंद धूसर झाले
काळ्या गडद जलपृष्ठावर
ढोल ताशे वाजू लागले
निसर्गाचे तांडव पाहून
सारी भुते पसार झाली
जलप्रपाती त्या प्रकोपात
गूढ छाया एकटी राहीली
टॉक्ss टप्ss नादाचा स्वामी
वट-तरूंच्या आश्रयास गेला
जलतांडवातून सुटकेसाठी
काळोखी ढोलीत जाऊन बसला
घटीका गेल्या पळे चालली
पाऊस बदाबद कोसळतच होता
ढोलीमधला अस्वस्थ आत्मा
तास मिनीटे मोजतच होता
अखेर पाऊस कंटाळून थांबला
निसर्ग प्रकोप शांत झाला
तिकडे उगवतीच्या गालांवरती
मंद रक्तिमा पसरू लागला
रविकिरणांच्या आगमनाने
तरूवर सोन्-नुलामा पसरला
कोवळ्या मृदू किरण उबेने
अवघा आसमंत लपेटून गेला
काळ्या ढोलीतून हळू हळू
एक वाटसरू बाहेर आला
आळोखे पिळोखे देत देत
सृष्टी बहर न्याहाळू लागला
जलाशयावर तजेला होऊन
आदीदेवास वंदन करून
शांत शांत पावले टाकत
परतीची वाटचाल करू लागला
श्रीराम पेंडसे
काळ्या शाईची दौत फुटली
टच्च शांततेच्या टीपकागदावर
मावळतीकडे पसरू लागली
शांत खोल जलाशयावर
गूढ बोचरी शांतता पसरली
पक्शी थांबले, प्राणी लपले
अवघी सृष्टी थिजून गेली
भयाण बोचर्या काजळी शांततेत
रातकिडे सुरात किरकिरू लागले
काळ्याकुट्ट काजळरातीने
सार्या आसमंतास मिठीत घेतले
त्या जलडोहाच्या काठावरती
वट वृक्षांच्या मजल्यांवरती
सर्व अतृप्त भुतावळींची
विराट महासभा भरली होती
कुणाची कुजबुज, फिदीफिदी हसणे
आरडा ओरडा, भयाण रडणे
सर्व भुतांचे तारस्वरांचे
गर्जू लागले एकसुरी तराणे
आणि अचानक फटक्यासरशी
आसमंत सारा गोठून गेला
संथ संथ मंद पदरवाचा
काळ्या काचेला तडा गेला
टॉक्ss टॉक्ss टप्ss टप्ss
पदरव तिथे शांत ssझाला
बुळुकss डुबुकss गूढ आवाज
ताणलेल्या शांततेला चिरत गेला
अरे ss बापरे ss लई भारी
आपल्यापेक्षा आहे कोणीतरी
महासमंधराज आला वाटतं
कबंधे पाहती भिरी भिरी
पुन्हा बुळुकss पुन्हा डुबुकss
पिशाच्च दुनिया टरकून गेली
असंख्य वट-पारंब्यांवर
उलटी होऊन लटकू लागली
आणि अचानक सारा परिसर
लख्ख उजेडाने नाहून गेला
मोठ्ठा विजेचा डोंब लोळ
आसमंती कल्लोळ माजवून गेला
पाऊस कोसळला आभाळ फुटले
वातावरण धुंद धूसर झाले
काळ्या गडद जलपृष्ठावर
ढोल ताशे वाजू लागले
निसर्गाचे तांडव पाहून
सारी भुते पसार झाली
जलप्रपाती त्या प्रकोपात
गूढ छाया एकटी राहीली
टॉक्ss टप्ss नादाचा स्वामी
वट-तरूंच्या आश्रयास गेला
जलतांडवातून सुटकेसाठी
काळोखी ढोलीत जाऊन बसला
घटीका गेल्या पळे चालली
पाऊस बदाबद कोसळतच होता
ढोलीमधला अस्वस्थ आत्मा
तास मिनीटे मोजतच होता
अखेर पाऊस कंटाळून थांबला
निसर्ग प्रकोप शांत झाला
तिकडे उगवतीच्या गालांवरती
मंद रक्तिमा पसरू लागला
रविकिरणांच्या आगमनाने
तरूवर सोन्-नुलामा पसरला
कोवळ्या मृदू किरण उबेने
अवघा आसमंत लपेटून गेला
काळ्या ढोलीतून हळू हळू
एक वाटसरू बाहेर आला
आळोखे पिळोखे देत देत
सृष्टी बहर न्याहाळू लागला
जलाशयावर तजेला होऊन
आदीदेवास वंदन करून
शांत शांत पावले टाकत
परतीची वाटचाल करू लागला
श्रीराम पेंडसे
आरोग्यम् धनसंपदा १२ - पाठदुखी उपचार भाग २

मागच्या लेखात पाठदुखीच्या आणि मानेच्या विकारांच्या उपचारांच्या संदर्भात आपण आयुर्वेदिक औषधोपचार, पथ्यापथ्य विचार पाहीले. या आणि या पुढील भागातून आपण यावरील योगोपचार पहाणार आहोत. मी मागेच सांगितले होते त्याचा पुनःरुच्चार करतो. या लेखमालेत शस्त्रकर्म याचा विचार केलेला नाही. कारण या लेखमालेचा तो हेतू नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे असे की मला शस्त्रकर्म याविषयावर लिहीण्याचा अधिकार नाही असे मला वाटते. तसा विचार केल्यास योगोपचार यावरही लिहायला मला अधिकार आहे की नाही माहीत नाही. पण मला जी माहिती आहे ती मी सांगणार आहे. तुम्ही त्यातले जे जमेल ते, आणि जमेल तसे पडताळून पाहून स्विकारायचे आहे. असो. आपण मागच्या लेखात पाहिले होते की या व्याधीवर सर्वसामान्यपणे विश्रांती देऊन मणक्यातली हालचाल थांबवणे, वेदनाशामक औषधे, कमरेला व मानेला बेल्टस् व काही पथ्ये वगैरे उपचार केले जातात. आणि आपण हेही पाहिले होते की या उपचारांना मर्यादा आहेत. आयुर्वेदिक औषधे दीर्घकाळ घेता येतात पण परीणाम व्हायला खूप वेळ लागतो. ऍलोपाथीची औषधे दीर्घकाळ घेता येत नाहीत. त्यांचे वाईट परीणाम होतात. तिच गोष्ट विश्रांतीची आहे. तिचे वाईट परीणाम होत नाहीत पण विश्रांती दीर्घकाळ घेता येत नाही. आपापले उद्योग, व्यवसाय यामुळे विश्रांती किती काळ घ्यायची याच्यावरही मर्यादा येतात. आणि मग या सर्वातून आपण हे दुखणे एकदाचे कायमचे संपवावे म्हणून शस्त्रक्रियेपाशी येऊन पोहोचतो. आपल्याला आधुनिक तज्ञ सांगतात की शस्त्रक्रिया याशिवाय आता इलाज नाही. शस्त्रक्रियेने दुखणे कायमचे जाईल. शस्त्रक्रियेच्या मर्यादा सांगितल्या जात नाहीत. कधी कधी असेही सांगितले जाते कि शस्त्रक्रिया करून पाहू. उपयोग झाला तर झाला. पण रूग्णाची अवस्था इतकी वाईट झालेली असते आणि तो इतका हतबल झालेला असतो, की तो म्हणतो, "काय वाटेल ते करा पण माझी यातून सुटका करा." शस्त्रक्रिया या विषयात मी तज्ञ नाही हे मी आधी सांगितले आहेच, पण मला जे माहित आहे ते सांगतो. या शस्त्रक्रियेला आधुनिक वैद्यकात "डिकॉम्प्रेशन" असे गोंडस नाव आहे. यात सरकून बाहेर आलेल्या चकतीचा भाग कापून काढतात. म्हणजे ज्यामुळे कॉम्प्रेशन आले आहे ते कारण दूर केले जाते. पण त्यामुळे स्नायूंची बिघडलेली संरचना सुधारत नाही. पाठीच्या कण्याला असलेला नैसर्गिक बाक वेडावाकडा झालेला असतो. तो काही शस्त्रक्रियेने जात नाही. मग रुग्ण झोपून आहे, विश्रांती घेत आहे, तोपर्यंत ठीक असते. हालचाल सुरू झाली की, पुन्हा गाडी मूळपदावर येते. अशावेळी डॉक्टर म्हणतात की, "मी आधीच सांगितले होते कि शस्त्रक्रिया करून पाहू. उपयोग झाला तर झाला." मग रूग्णाला असे वाटू लागते की शस्त्रक्रियेने काही उपयोग झाला नाही. पैसा वाया गेला असेही वाटू लागते. मूळ कारण तसेच राहते. आणि मग ती व्याधी पुन्हा पुन्हा उपटते. पण योगोपचारात व्याधीचे परीणाम दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. स्नायूंची बिघडलेली संरचना सुधारण्याचा प्रयत्न करतो.
मग काय केले पाहीजे? कोणते तत्त्व स्विकारले पाहीजे? तर मूळ कारणावर मात केली पाहीजे. पाठीच्या कण्याच्या नैसर्गिक वक्रतेत झालेला बिघाड सुधारला पाहीजे. पाठीच्या कण्याच्या विकृत वक्रतेत बदल केला पाहीजे. पाठीच्या कण्याची बिघडलेली वक्रता पुन्हा नैसर्गिक केली पाहिजे. मग हे कसे होणार? कसे करायचे? काय करायचे? तर स्पर्श, दाब, वेदना, घर्षण तपमानात होणारी वाढ आणि नाश ही साखळी उलट झाली पाहीजे. म्हणजे घर्षण कमी झाले पाहीजे, त्यासाठी दोन मणक्यातले अंतर वाढले पाहीजे. त्यासाठी स्नायूंची लांबी वाढली पाहीजे. पाठीच्या कण्याची नैसर्गिक वक्रता परत आणता आली पाहीजे. आपल्या रोजच्या जीवनात पाठीच्या कण्याची नैसर्गिक अवस्था बिघडलेली असते. प्रत्येक सांध्याची हालचाल करणारे स्नायूंचे दोन गट असतात, जे ऐकमेकांच्या विरुद्ध दिशेने हालचाल करतात. त्यात समतोल असला की आपोआपच शरीराची बैठक, हालचाल सुधारते. जेंव्हा पाठदुखीचा रुग्ण तिरपा उभा राहतो, तेंव्हा त्याच्या या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने काम करणार्या स्नायूंचे संतुलन बिघडलेले असते. त्याचे ते तसे उभे राहणे, हे त्याने आपल्या वेदनेचे शमन करण्यासाठी त्याच्या स्वतःच्या नकळत परीस्थितीशी जुळवून घेण्यातून आलेले असते. हळूहळू तीच त्याची नैसर्गिक अवस्था व्हायला लागते. कमरेतल्या कण्याची वक्रता वाढली किंवा सपाट झाली तर पाठदुखी सुरू होते. आणि हे थांबवायचे असेल तर ती पाठीच्या कण्याची नैसर्गिक वक्रता परत आणता आली पाहीजे. आणि हे योगोपचाराने शक्य आहे. हेच पाठदुखीसाठीच्या योगोपचाराचे तत्त्व आहे. पाठदुखीचे योगोपचार आणि मानेकरिता योगोपचारात बराच फरक आहे. म्हणून या लेखात फक्त पाठदुखीचा विचार केला आहे. मानेतील मणक्याच्या व्याधीवरील उपचार पुढील लेखात पाहू.
ही लेखमाला लिहीताना मी वारंवार एका गोष्टीचा इशारा दिला होता. यापूर्वीचे लेख ज्यांनी वाचले नाहित आणि हा लेख नव्याने वाचत आहेत त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो, की त्यातील उपचार हे तुमच्या माहितीसाठी आहेत. हे वाचून आणि चित्र पाहून करण्याचा प्रयत्न करू नये. ते करताना एखाद्या तज्ञ योगशिक्षकाकडून शिकून घ्यावेत. त्या शिक्षकासमोर ते काही महिने करावेत. म्हणजे आपण करत आहोत ते बरोबर आहे का हे कळेल. अन्यथा कुठे चुकीच्याठिकाणी ताण बसला तर व्याधी बरी व्हायच्या ऐवजी भलतेच होऊन बसेल. म्हणून मुद्दाम ही धोक्याची सूचना देत आहे. यासंबंधी पुढे दिलेल्या पत्त्यावर किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यास अधिक माहिती अधिकृतरीत्या मिळेल या सर्व व्याधींवरचे उपचारही तेथे दिले जातात याची कृपया नोंद घ्यावी.
संजीवन योग फाउंडेशन
कबीरबाग मठ संस्था
५१, नारायण पेठ
पुणे ४११ ०३०
दूरध्वनी : ०२०-२४४५०१८१, २४४८४४२३, २४४८०४२४
फॅक्स : ०२०-२४४८१९३७
इ मेल : drkarandikar@hotmail.com
मग यासाठी योगोपचाराचा क्रम कसा असला पाहिजे ते पहा. सर्वप्रथम कमरेला ताण (Lumber Traction), पादांगुष्ठासन, पाठीच्या कण्याला पिरगळण्याचा ताण(Rotational Stretch to Spine or Twisting), शशांकासन आणि सगळ्यात शेवटी शवासन हा असा क्रम असला पाहीजे. आणि व्यवस्थित हे शिकून घेतल्यनंतर आठवड्यातून किमान एक दिवसा आड एक असे, तीन दिवस प्रत्येकी एक तास असे केले गेले पाहिजे. यानंतर विचारला जाणारा अतिशय लोकप्रिय प्रश्न म्हणजे हे आम्हाला किती दिवस करावे लागेल? याचे मी मागे उत्तर दिले होते. परत एकदा सांगतो. ही आसने, हे उपचार हा आपल्या दिनचर्येचा भाग झाला पाहिजे. मागे मी म्हटल्याप्रमाणे आपण अंघोळ रोज करतो. तो अपल्य दिनचर्येचा एक भाग आहे. आपण जिवंत आहोत तो पर्यंत. तसे ही योगसने ही कायम करण्याची गोष्ट आहे. नैमित्तीक नाही. तरच त्याचे कायमस्वरूपी परीणाम दिसतील.
पाठीच्या कण्याचा ताण : (आता सर्वप्रथम पाठीच्या कण्याच्या ताणाबद्दल पाहू या. हा ताण म्हणजे Lumber Traction. आधुनिक वैद्यकात दिले जाणारे Traction आणि योगोपचारातले Traction ताय फरक आहे. इथे रुग्णाच्या कमरेला दोर बांधून तो दोर भिंतीतल्या हूकला अडकवला जातो. (चित्र क्र.१) चित्रात तुम्हाला दिसेल की ती व्यक्ती पायाने भिंत ढकलत आहे. डाव्या आणि उजव्या बाजूचे संतुलन संभाळत ती व्यक्ती स्वतःचे स्वत:च Traction घेत आहे.त्यामुळे कमरेच्या मणक्याच्या स्नायूंची लांबी हळू हळू वाढते आणि चेतांवरील दाब नाहीसा होतो. हेच Traction दोर न लावताही घेता येते. चित्रात तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती भिंतीला टेकून उभी आहे. रूग्ण जमिनीवर उताणा झोपलेला असून भिंतीला टेकून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या गुढघ्यावर जोर देत आहे. यात खुब्याच्या सांध्यातून Traction दिले जाते. आणि यात कोणत्याही प्रकारचा अतिरीक्त ताण मणके किंवा चेतांवर येत नाही. (चित्र क्र.२)
शरीरात तीन प्रकारचे स्नायू असतात. एक म्हणजे शरीराची ठेवण करणारे (Structral), बैठक निर्माण करणारे (Postural), आणि हालचाल करणारे (Movement).या सर्वाना पूर्ववत नैसर्गिक अवस्थेत आणणे हे योगशास्त्राचे धेय्य आहे. मग यावर काम करणारी आसने आता पाहू.
पादांगुष्ठासन : कधी कधी मांडीच्या मागिल बाजूने विजेचा शॉक बसल्यासारख्या वेदना सुरू होतात. याला "सायटिका" म्हणतात. बैठे काम सतत करण्याने मांडीचे स्नायू आखडून जातात. आणि त्यामुळे सायटिक चेता (Nerve) दाबली जाते. या आसनामुळे मांडीच्या मागच्या स्नायूची लांबी वाढते.मैदानी खेळ खेळणार्या खेळाडूंना याची गरज भासते. कारण त्यांचे मांडीत असलेले "Hamstring" या नावाचे स्नायू नेहमीच आखडतात. हे आसन करताना चित्रात दाखवल्याप्रमाणे भिंतीला काटकोनात झोपावे. (चित्र क्र. ३) दोन्ही पावले भिंतीला टेकून ठेवावी. नंतर उजवा पाय गुढग्यात दुमडून पोटाजवळ घ्यावा. दोन्ही हातानी पाऊल पकडून ठेवावे. मांडी भिंतीला समांतर ठेवत संपूर्ण पाय भिंतीला समांतर करण्याचा प्रयत्न करावा. त्याच वेळी कमर आणि कुल्ले जमिनीवर घट्ट टेकवून ठेवावेत. जर हाताने पाऊल पकडणे जमत नसेल तर चित्रात दाखवल्याप्रमाणे पावलाभोवती दोर किंवा मुलीची पंजाबी ड्रेसची ओढणी गुंडाळावी. आणि पाय गुढ्ग्यातून सरळ करत मांडीसह संपूर्ण पाय भिंतीला समांतर करण्याचा प्रयत्न करावा.
मेरूदंडासन : म्हणजे पाठीच्या कण्याला पिरगळणारा ताण. A Rotational Stretch to Spine or Twisting. चित्रात दाखवल्याप्रमाणे भिंतीजवळ दोन्ही गुढग्यावर बसावे. पावले पालथी ठेवावीत. (चित्र क्र.४) हळूहळू गुढग्यावर उभे राहत डावा गुढगा आणि पाऊल तसेच ठेवत उजवे पाऊल जमिनीवर टेकवावे. आणि मांडी जमिनीला समांतर आणि पाय काटकोनात ठेवत श्वास घेत घेत दोन्ही खुब्यातून धड घट्ट धरून ठेवत पोट छाती मान उजव्याबाजूला वळवावे.या ताणामुळे पाठीच्या कण्याला लवचीकपणा येतो. मणक्यातून बाहेर येणार्या चेतांवरचा ताण नाहिसा होतो. ज्याना गुडघेदुखीचा त्रास आहे त्याना हे आसन लोखंडी खुर्चीवर बसूनही करता येते. यात चित्रात दाखवल्याप्रमाणे खुर्ची भिंतीकडे पाठ करून ठेवा.आणि त्यात चित्रात दाखवल्याप्रमाणे बसावे. पाय काटकोनात ठेवावेत. पोट चित्रात दाखवल्याप्रमाणे खुर्चीच्यापाठीला टेकवून ठेवावे. मांडी हलू नये म्हणून एक ब्लँकेटची घडी मांडी आणि खुर्चीची दांडी यात ठेवावी म्हणजे दोन्ही मांड्या स्थिर राहतील. उजवा हात दुमडून खुर्चीची कड पकडा. (चित्र क्र.५) डावा हात पाठीवर ठेवा. आणि शरीर कमरेतून हळू हळू डावीकडे, बाटलीचे फिरकीचे झाकण आपण उघडतो तसे फिरवायला सुरूवात करा. आणि संपूर्ण पाठीचा कण उभ्या अक्षाभोवती ९० अंशात वळवा (Rotation around the vertical axis). हीच क्रिया शरीराच्या विरूद्ध बाजूला करा. हीच क्रिया उभे राहूनही करता येते. त्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पाय जमिनीला समांतर ठेवावा. त्यासाठी घरच्याघरी करायचे असल्यास टीपॉयवर किंवा डायनिंग टेबलावर किंवा स्टूलावर पाय जमिनीला समांतर ठेवावा. जमिनीला पाय समांतर राहण्यासाठी आवष्यकता असेल तर पायाखाली उशी किंवा चादरीची घडी ठेवावी. आणि जो पाय वर आडवा ठेवला असेल त्याबाजूला शरीर कमरेतून चित्रात दाखवल्याप्रमाणे वळवावे. (चित्र क्र.६)
शशांकासन : या आसनात पाठीचा कणा खुब्याच्या सांध्यातून पुढे आणावा लागतो. (चित्र क्र,७) त्यासाठी खिडकी असलेल्या भिंतीकडे पाठ करून गुडघ्यावर बसावे. पुढे सरकू नये म्हणून कमरेला दोर लावावा. आपल्यासमोर लोड उभा ठेवावा. सरळ बसून हात वर न्यावेत. आणि मग कमरेतून वाकत पुढे जात पोट व छाती लोडावर टेकवावे. ही कृती करताना सर्व हालचाल खुब्याच्या सांध्यातच झाली पाहीजे या कडे लक्ष ठेवावे. पाठीला पोक येऊ देऊ नये. सामान्यपणे सांगितले जाते की पाठीचे दुखणे असताना पुढे वाकू नये. मग शशांकासनात तर नेमके तेच आहे. मग खरे काय? दॉक्ट्र सांगततकी पुढे वाकू नये म्हणजे पाठीच्या कण्यात बाक आणू नये असे आहे. पण आपल्या आसनात खुब्याच्या सांध्यात हालचाल घडवणे हा हेतू आहे. पाठीच्या कण्यातून वाकणे तिथे अपेक्षित नाही. त्यामुळे त्यात पाठीच्या कण्यावर कुठेच ताण येत नाही.
अश्या तर्हेने आपण पाठीच्या कण्याविषयी लागणारे उपचार पाहीले. पुधील लेखात आपण मानेच्या दुखण्यावरचे योगोपचार पाहूया.
ॐ तत्सत्
श्रीराम पेंडसे
डिसेंबर २००९

आरोग्यम् धनसंपदा - ११ : पाठ दुखी आणि मान दुखीचे उपचार -भाग १

मागच्या लेखात आपण पाठदुखीची कारणे, आणि लक्षणे पाहिली होती. आणि त्यादष्टीने शरीर रचनेचाही विचार केला होता. त्यावेळी त्यात मान दुखी आणि गुडघेदुखी यांचा समावेश केला नव्हता. पाठ दुखी, गुडघे दुखी आणि मान दुखी यांच्या योगोपचारात फरक असतो. म्हणजे या तिन्हीवर वेगवेगळे उपचार आहेत. पण आयुर्वेद आणि आहारातील पथ्यापथ्य, दिनचर्या किंवा आधुनिक उपचार यांचा विचार करता फारसा फरक नाही. म्हणून मला असे वाटले की उपचारांची चर्चा करण्यापूर्वी मान दुखी आणि गुडघेदुखी याच्याही कारणे आणि लक्षणे यांचा विचार व्हावा. आणि म्हणून उपचार, दिनचर्या यांची चर्चा करण्याआगोदर या मणके आणि हाडांच्या या दुखण्यात मान दुखी आणि गुडघेदुखी याचा विचार आधी करू. आणि मग उपचारांबद्दल पाहूया.
मानेच्या दुखण्याचा विचार करताना आधी त्याची रचना पाहू. आणि मग या दुखण्याचे परीणाम कुठे कुठे होतात ते पाहू. मानेत एकंदर सात मणके असतात. आणि पाठीच्या मणक्याप्रमाणे दोन मणक्यात छोटीशी रबरी चकती असते. मानेतल्या मणक्यातले सर्वात वरचे दोन मणके यांना महत्त्व आहे. कारण पहिला मणका, ज्याला Atlas असे म्हणतात, त्यावर मस्तक तोललेले असते. हा मणका एखाद्या रिंगसारखा असतो. त्याच्या खालचा दुसरा मणका जो असतो, ज्याचे नाव आहे Axis, तो या पहिल्या मणक्याला तोलून धरतो. तो दिसयला एखद्या विट्टीच्या टोकासारखा असतो. आणि हे टोक त्या पहिल्या मणक्याच्या रिंगसारख्या भागात एखाद्या दरवाज्याच्या कडीसारखे जाऊन बसते, आणि एखाद्या पाचरेसाखे काम करते. याला Atlanto Axial Joint म्हणतात. आणि या रिंगमधून मुख्य मज्जारज्जू जातो. सहसा या पहिल्या दोन मणक्यातल्या सांध्याला काही इजा होत नाही. फक्त अपवाद एखाद्या जबर अपघाताचाच. मानेच्या दुखण्यांची रोजच्या व्यवहारामुळे जी देणगी आपल्याला मिळते त्यात सहसा तिसर्या ते सातव्या मणक्यात दोष निर्माण होतो. पहील्या दोन मणक्यात नाही. या मानेतल्या मणक्यात दोष निर्माण झाला की त्याचा परीणाम मानेच्या हालचालीवर, खांद्याच्या हालचालीवर आणि हाताच्या हालचालीवर होतो.
आता आपण याची कारणे पाहू. कारणांमधे, मणक्यातील अंतर कमी-जास्त होणे, मणके झिजणे, मणके एकावर एक चढणे अशी कारणे असतात. ही व्याधी व्यवसायाभिमुख आहे. म्हणजे कारकुनी काम करणारे, कॉम्पुटरसमोर बसून तासनतास काम करणारे, आचारी, पुढे वाकून काम करणारे, सतात वाहन चालवणारे अशांना हा त्रास अधिक होतो. रोज दीर्घकाल वाहन चालवणार्यात दोन चाकी चालवणार्यांना सहसा पाठदुखी होते आणि चार चाकी चालवणार्यांना मानेचे दुखणे होते. कारण त्यामानाने, दुचाकी वाहनांची धक्केरोधक यंत्रणा (Shock Absorbers) ही त्यामानाने कमजोर असते. म्हणजेच रस्त्यातील खड्ड्यांचा पाठीच्या मणक्यावरील विपरीत परीणाम हा दुचाकीस्वारांच्यात अधिक प्रमाणात दिसतो. कारकुन मंडळी किंवा कॉम्पुटरवर काम करणार्यांच्यात वर्षानुवर्षे सतत एकाच अवस्थेत मान कलती राहील्याने ती दुखायला लागते.
लक्षणांच्यात मान दुखणे, खांदे दुखणे, खांद्याच्या हालचालींवर मर्यादा येणे, दंड दुखणे, कोपर दुखणे. हाताला, हाताच्या बोटांना मुंग्या येणे, डोके दुखणे, चक्कर येणे असे प्रकार होउ लागतात. कधी कधी हात जड होतो, बधीरता येते, हात अवघडल्यासारखा होतो. खांदे दुखतात. हाताच्या खांद्यातून हालचालीवर मर्यादा येते. हात वर जात नाही. आपण कसा डोक्यातून शर्ट काढतो तसा अजिबात काढता येत नाही. या सर्वांच्या जोडीला सामान्यपणे तीव्र वेदना असतात.
आता यावरील उपचाराची दिशा पाहूया. यात औषधॉपचार आणि इतर उपचार (Non distructve), आणि शस्त्र कर्म (distructve) असे दोन भाग असतात. यातला शस्त्र कर्म हा भाग आत्ता तरी यालेखाचा हेतू नाही आणि तूर्तास आपल्या लेखमालेच्या हेतूशी विसंगत आहे. शिवाय शस्त्र कर्म या विषयावर मतप्रदर्शन करण्याचा मला कोण्ताही नैतिक अधिकार नाही. म्हणून मी त्यावर काही भाष्य करणार नाही. Non distructve उपचारात बर्याच वेळी विश्रांतीने फरक पडतो. पण विश्रांती ही सध्याच्या वेगवान आणि व्यवसायाभिमुख युगात सहसा शक्य नसते. व्यायाम किंवा आसने हाही उपाय आहे. पण तो भाग आपण पुढच्या लेखात पाहू. औषधी उपचारात मान दुखी आणि पाठ दुखी या दोन्हीवर उपचार सारखेच असतात. प्रथम बाह्य उपचार पाहू या. यात प्रामुख्याने लेप अणि तेलचे मर्दन असते. लेप गोळी किंवा "दु:ख दबाव लेप" या नावने हा लेप बाजारात मिळतो. भुकटीच्या स्वरूपात किंवा गोळीच्या स्वरूपात हा मिळतो. भुकटी असेल तर पाण्यात कालवून त्याचा दाट गंधासारखा लेप करवा. लोखंडी पळीत घेउन तो अगदी जेमतेम सोसवेल-सोसवणार नाही इतपत गरम करून दुखर्या भागावर लावावा. तेलाने मर्दन करायचे असल्यास महानारायण तेलाचा मसाज करावा. मसाज करताना चोळण्याची दिशा नेहमी खालून वर म्हणजे हृदयाच्या दिशेने ठेवावी. मान किंवा पाठीचे दुखणे खूप तीव्र असेल तर. महानारायण तेलात गवती चहाचा अर्क (Lemon grass Oil) मिसळून त्याचा मसाज करावा. मसाज करताना हलक्या हाताने मसाज करावा. लावलेले तेल जिरवावे. साधारण १०० मि.ली. महानारायण तेलात ५ मि.ली. अर्क मिसळावा.
पोटात औषधे घेताना प्रधान औषध आहे लाक्षादी गुग्गुळ. शिवाय सिंहनाद गुग्गुळ हे औषध सूज, व दु:ख कमी करण्यासाठी उपयोगी असते. त्रिफळा गुग्गुळ हे ही औषध सूज करण्यासाठी वापरतात. या सर्वाच्या जोडीला जे अशक्त आहेत त्यांनी अस्कंद चूर्ण घ्यावे. किंवा अश्वगंधा पाक घ्यावा. ज्यांना हाताला मुंग्या येतात त्यानी लाक्षादी वटीसह संधीवातादी वटी, चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी या गोळ्या घ्याव्यात. मी मागे सांगितल्याप्रमाणे गोळ्या कुटून पाण्याबरोबर, मधातून घ्याव्यात. गिळू नयेत. पाठ दुखी ही मूतखड्यामुळे आहे असे असेल तर गोक्षुरादि गुग्गुळ आणि रसायन चूर्ण घ्यावे. पोटात वायू धरल्याने पाठ दुखत असेल तर सौभाग्य सुंठ, अभयारिष्ट, आणि एरंडेल तेलाची पोळी याचा उपयोग करावा. जर वजन हिसक्याने उचलल्यास पाठीत उसण भरते. अशावेळी विश्रांती घ्यावी, गरम पाणी प्यावे. कमरेच्या मणक्यात झीज असेल तर एरंड पाक आणि काल्शा चूर्ण वापरावे.पाठीचे दुखणे असणार्यांनी आपल्या नेहमीच्या जेवणात आले, पुदिना आणि लसूण यांच्या चटणीचा वापर करावा. याच्या पथ्यापथ्याचा विचार करताना थंड पदार्थ, दही केळे, किंवा केळ्याची शिकरण, फरसान , मिठाई, मांसाहार, अंडी, मीठ पापड हे पदार्थ टाळावेत. आणि अपुनर्भव चिकित्सेत म्हणजे दुखणे टाळण्याच्या दृष्टीने त्रिफळा गुगूळ, गोक्षुरादि गुग्गुळ, आणि लाक्षादि गुग्गुळ याचा वापर करावा.
या पुढच्या लेखात आपण यावरील योगोपचाराचा विचार करू.
ॐ तत्सत्
श्रीराम पेंडसे
अंतर्याम नोव्हेंबर २००९

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)