सॉरी
सॉरीचा अर्थ पाहिला तर
"सॉरी"ला वाईट वाटत असते
त्याची आगतिकता त्यातून
पूर्णपणे दिसतच असते १
माफी किती सोपी असते
सॉरी म्हणून काम भागते
हल्लीच्या या आधुनिकतेत
सॉरीने सर्व जमून जाते २
म्हणणारा पटकन म्हणून जातो
ऐकणारा संभ्रमात पडलेला असतो
"सॉरी"चा कधीच तोटा नसतो
झेलणारा मात्र आगतिक होतो ३
"सॉरी"ने सॉरी म्हटल्या म्हटल्या
ऐकणाराच खरं तर सॉरी झाला
सॉरी म्हणणारा मात्र काठावरून
ऐकणार्याच्या गटांगळ्या पहात राहिला ४
स्कूटरवाल्याने धक्का दिला
तो, सॉरी म्हणत निघून गेला
धक्का खाणारा हताश होऊन
कुठे लागलय ते शोधत राहिला ५
सौ. कोमात गेलेली होती
काळ थांबून राहिला होता
पांढरा कोटवाला शांतपणे
पडद्याकडे बघत राहिला होता ६
अखेर सौ.ची लढाई संपली
पांढरा कोट सॉरी म्हणाला
हे ऐकले आणि, यमदूत मात्र
खदा खदा हसत राहिला ७
मनात हसत म्हणत राहिला
सॉरी म्हणणारा हुशार आहे
आणि ते ऐकणारा खरोखर
किती किती बिनडोक आहे ८
दोघानाही हे माहित आहे कां?
गोष्टी कुणाच्या हातात आहेत?
दोघेही कळसूत्री बाहुल्यांसारखे
नियतीच्या तालावर नाचत आहेत? ९
सॉरी म्हणणार्याला नेहमी
खरच सॉरी वाटते का?
ज्याला सॉरी वाटत असते
तो सॉरी सॉरी म्हणत राहतो का? १०
..........श्रीराम पेंडसे
शनिवार, २० मार्च, २०१०
आरोग्यम् धनसंपदा - हृदय विकार - भाग २
मागच्या भागात आपण हृदयाची रचना पाहीली. या भागात आपण हृदयच्या विकारची कारणे आणि लक्षणे यांचा विचार करूया. आपण मागच्या भागात पाहीले होते की सर्व शरीराकडून येणारे रक्त प्रथम हृदयात येते. तेथून ते Pulmaonary Artery किंवा महारोहिणीमधून फुफ्फुसाकडे जाते. शरीरातली ही एकमेव Artery की जी अशुद्ध रक्त वाहून नेते. तसेच हे रक्त फुफ्फुसात शुद्ध झाल्यावर ते हृदयाकडे महानीले (Pulmonary Vein) द्वारे येते आणि मग तिथून सर्व शरीराकडे फिरवले जाते. ही महा नीला शरीरातली एकमेव नीला की जी शुद्ध रक्त वाहते. शरीरातल्या बाकी रक्त वाहिन्यात रोहिणी ही शुद्ध रक्त तर नीला ही अशुद्ध रक्त वाहिनी आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्या असतात त्यांना Coronory Arteries म्हणतात. ही जरी बाहेरून नेहमीच्या आकाराची दिसली तरी आतून त्यात किटण जमते.आपल्या आहारातले तेल, चरबी (Fat) यांचे किटण असते. या किटणाला Atheroscelerotic Plaque असे म्हणतात. सहाजिकच त्यातून जाणारा रक्तप्रवाह कमी होतो. याला Angina Pectoris म्हनतात. या पुढील पायरी म्हणजे रक्तात गुठळी होते. आणि रक्तप्रवाह पूर्णपणे थांबतो. यालाच Myocardial Infarction किंवा सामान्यांच्या भाषेत Heart Attack म्हणतात. यालाच वैद्यकिय परिभाषेत Coronory Artery Spasm असे म्हणतात. ही विकृती कधी कधी थोडा वेळ टिकते विष्रांतीने बरे वाटतेआणि रूग्ण पुन्हा व्यवस्थित होतो. म्हणजेच Angina Pectoris कडे दुर्लक्ष झाले तर त्याचे रूपांतर Myocardial Infarction मधे होऊ शकते.
आता आपण ह्र्दयविकाराची सर्वसामान्य कारणे पाहूया. आधुनिक वैद्यकात डॉक्टरमंडळी चार प्रमुख कारणे सांगतात. ती म्हणजे अशी : Hurry, Marry, Curry and Brewary. आता हे काय प्रकरण आहे ते पाहूया. शब्दावरून अर्थ दिसतो आहेच. पण कसे ते पहा.
Hurry म्हणजे घाई. आपले जीवन हे वेगवान आहे हे आपण पाहतोच. कामाचा ताण आजच्या युगात खूप पडतो. मी अगदी पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे नोकरीला जाण्याची वेळ ठरलेली, येण्याची वेळ ठरलेली नाही. मग मनावर ताण येतो. याला Executive Syndrome असेही म्हणतात. तसेच स्वतःचा व्यवसाय आहे, अश्यावेळी पण मनावर प्रचंड ताण येतो. आणि या ताणाचा हृदयावर परीणाम होतो.
Marry म्हणजे अनुवांशिकता. जर आपल्या घराण्यात, आई वडिलांना जर हृदयाचा त्रास सेल तर तो त्यांच्या संततीत येऊ शकतो. अर्थात अगदी सुरूवातीपासून काळजी घेतली तर यावर संपूर्ण मात करता येऊ शकते. ही गोष्ट आपल्या हाता नाही. म्हणून याला वैद्यकात Uncontrollable Factor असे म्हणतात कारण या गोष्टी तुमच्या हातात नसतात. पण या गोष्टी थोड्याप्रमाणात नियंत्रणात आणता येतात. कारण माहीत असल्याने तुम्ही सुरूवातीपासून काळजी घेऊ शकता. आणि अनुवांशिकतेवर मात करता येते.
Curry म्हणजे आहार. आहारतल्या सवयी या बर्याच वेळा मारक ठरतात. मारक म्हणजे आहारातल्या काही पदार्थांचे अतीसेवन हे मारक ठरते. सर्वसामान्यपणे अती तेलकट पदार्थ, बटाटा, भात, तूप, लोणी, मांसाहारी पदार्थाचाचे अतीसेवन, मसालेदार पदार्थ या गोष्टी हृदयविकाराला आमंत्रण देणार्या असतात. यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. रक्तातली अपाचीत चरबी जायला जागा नसल्यामुळे रक्तवाहिन्यांच्या Walls वर आतल्या बाजूने साठून राहायला लागते. परीणामी रक्तवाहिन्यांचा आकार आतून कमी व्हायला लागतो. रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण व्हायला लागतो. परीणाम? हृदयावरचा ताण वाढतो.
Brewary म्हणजे आधुनीक युगातली समाजातली मद्य सेवनाची सवय. हे मद्य सेवन हे जवळ जवळ नेहमीच सामाजिक प्रतिष्ठेची गरज म्हणून केले जाते. तिथपर्यंत एक वेळ ठीक आहे. पण बर्याचवेळा आपल्या क्षमतेचा विचार न करता मद्यपान होते. आणि त्याच्या अतिरेकाचे पर्यावसान हृदयविकारात होते. जरी आपल्या संस्कृतीत सुरापान लिहीले असले तरी त्यालाही काही त्यात अटी आहेत. पुराणकथातही कोणी उठसुट सुरापान करताना दिसत नाही. त्याचे उल्लेखही नाहीत. आधुनिक कालाचा विचार केला तर असे दिसेल की ही आपल्याला गोर्या कातडीची देणगी आहे. ब्रिटिशांनी आपल्याला वाईटाबरोबर बर्याच चांगल्या गोष्टीही दिल्या आहेत. पण आपण त्या न घेता त्यांच्या वाईट गोष्टी नेमक्या उचलल्या आहेत. त्यांची शिस्त आपण कानाडोळा करतो. कारण कुठलीही शिस्त पाळायची असेल तर एक तर त्याची सवय व्हावी लागते नाहीतर प्रचंड मनोधैर्य तरी लागते. मद्यपान ही तशीच गोष्ट आहे. आपण त्यांचे अनुकरण करताना हे विसरतो की मद्यपान ही त्यांची संस्कृति आहे. त्यांच्याकडच्या हवामानाचा विचार करता त्यांच्याकडे ते योग्य आहे. त्यांच्या अतीथंड हवामानात ते बाधणारे नाही. त्यांच्या शरीर मानाचा विचार करता, त्यांच्या प्रकृतीचा विचार करता त्यांच्या हवामानाला ते योग्य आहे. पण ही आपली संस्कृती नाही. ही आपल्या इथल्या उष्ण हवामानात बाधणारी गोष्ट आहे. तो फक्त आपल्या संस्कृतीचा कधी काळी भाग होता. हे आपण विसरतो. आपण सोयिस्कररीत्या त्याचा स्विकार करतो. मानसिक ताण तणावाच्या नावाखाली त्याच्या आहारी जातो. आणि मग हृदयविकारासारख्या Silent Killer ला आमंत्रण देतो. तो Killerही आनंदाने त्याचा स्विकार करतो. तो त्याच्या सवयीप्रमाणे छुप्या, दबक्या, मांजरीच्या पावलानी येतो. आणि आपल्याला कळते तोपर्यंत उशीर झालेला असतो. उशीर अशासाठी की एकदा आला की तो जात नाही. त्याला नियंत्रणाखालीच ठेवावा लागतो. हा कधीच नियंत्रणात येत नाही का? येतो. पण ती नेहमीच तारेवरची कसरत असते. सततची डोक्यावर टांगती तलवार असते. हृदयविकार झाल्यावरच्या शिस्तीत जरासुद्धा इकडे तिकडे होणे जिवावर बेतू शकते. आणि इथे मानसिक धैर्याची गरज भासते. आहे ते स्विकारून त्याच्याशी लढण्याच्या मानसिकतेची गरज असते. यासंदर्भात माझ्या एका मित्राचे उद्गार बोलके आहेत. त्याला हृदयविकाराचा त्रास होता. तो म्हणायचा कि,
" मी पांच ब्लॉक्सचा मालक आहे. माझा एक ब्लॉक मॉडेल कॉलनीत आहे. बाकीचे चार माझ्या heart मधे आहेत. मला मॉडेल कॉलनीतला ब्लॉक ठेवायचा आहे. बाकीचे चार विकायचे आहेत. मी त्याला गिर्हाइक शोधतोय."
विनोदाचा भाग सोडला तर त्या उदगाराततून दिसणारे मानसिक धैर्य वाखाणण्यासारखे आहे. पुढे दुर्दैवाने हृदयविकारानेच या मित्राचा बळी गेला.
इथपर्यंत प्रमुख कारणे पाहील्यावर इतर कारणांचा विचार करू. इतर कारणात मधुमेह आणि रक्तदाब यांचा समावेश होतो. तंबाखूच्या सेवनाचा, सिगारेट ओढणे, म्हातारपण याचा समावेश होतो. मी मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक मधुमेही किंवा रक्तदाबाच्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका येईलच असे नाही. पण या रुग्णांनी हे लक्षात ठेवले पाहीजे की आपण याची सहज शिकार होऊ शकतो. त्यामुळे आपण Sitting Duck होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे. नंतरची जी दोन कारणे आहेत की तंबाखूचे सेवन, आणि सिगारेट ओढणे ता दोन गोष्टी मनोनिग्रहाने टाळता येण्यासारख्या आहेत. म्हणून याना controllable Factor असे म्हणता येईल. आणखी इतर कारणात अजून एक कारण सांगता येईल. ते म्हणजे लिंग भेद. म्हणजे असे की पुरूष आणि स्त्री यांच्या जननक्षमतेचा विचार केला तर स्त्री जननक्षम आहे तो पर्यंत तिला नैसर्गिक संरक्षण आहे. म्हणून स्त्री व पुरूष यांच्या हृदयविकाराचे प्रमाण १:२ असे असते. पण स्त्री म्हातारी झाल्यावर म्हणजे तिची जननक्षमता संपल्यावर मात्र ते १:१ येते. पण पुरूषाच्या बाबतीत असे नसते. त्याला कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अजून महत्वाचे कारण म्हणजे लठ्ठपणा आणि आळशी पणा (Obesity and Sedentaries).
या पुढच्या लेखात आपण हृदयविकारातल्या निरनिराळ्या अवस्थातल्या लक्षणांचा आणि त्या अनुशंगाने येणार्या तपासण्यांचा विचार करू.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)